मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव| अद्वैतबोध निरंजन माधव काव्य स्तोत्र आत्मचरित्र श्रीरामकर्णामृत श्री ज्ञानेश्वरविजय चिद्बोधरामायण सुभद्राचंपू प्राकृत गद्याचा नमुना श्री भार्गवरामजन्मचरित्र अद्वैतबोध यतिनृपतिसंवाद श्रीअद्वैतभावनापंचदशी वशिष्टसुशर्मासंवाद चरित्र व कवित्व प्रस्तावना निरंजन माधव - अद्वैतबोध निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे. Tags : niranjan madhavpoemsongकवितागाणीनिरंजन माधव अद्वैतबोध Translation - भाषांतर अद्वैतबोध घडला बरवा मनाला ॥ तो काय मीं कथिन बाह्यमुखी जनाला ॥विश्वास ज्यासि न वसे गुरुतत्वबोधीं ॥ चिद्वस्तु जे परम त्याप्रति कोण बोधी ॥१॥श्रीसज्जनांघ्रिकमळी नत जो घडेना ॥ त्याला कदापि गुरुतत्व दिठीं पडेना ॥जो साधुसंग धरि त्यासचि लाभ होतो ॥ चित्सार सेउनि निरंतर तृप्त होतो ॥२॥अतितर परमार्थी वेधलें चित्त ज्याचें ॥तरिच सफल झालें जन्म या मानवाचें ॥त्यजुनि सकल दृश्याभास आत्माचि डोळां ॥निरखिल तरि जीवन्मुक्त तो साच झाला ॥३॥आत्मा देह नव्हे खरें जग नव्हे चैतन्य नाना नव्हे ॥माया सत्य नव्हे गुरु नर नव्हे तद्वाक्य वाणी नव्हे ॥हा जीवेश्वरभेद वास्तव नव्हे कांहीच कांही नव्हे ॥वेदांताविण शास्त्र शास्त्र शास्त्रचि नव्हे सिद्धांत मित्या नव्हे ॥४॥ज्ञानी श्रीभगवंत मानव असें मानू नये त्याजला ॥स्वच्छंदें विचरे म्हणोनि जगती बोलों नये माजला ॥राजा हो अथवा अकिंचन घडो विताढ्य भोगी तरी ॥वानप्रस्थ करो महाव्रत धरो सानंद राहो घरीं ॥५॥जातीचा भलता असो द्विज नसो सत्कर्मकर्ता नसो ॥वैराग्यें विषयी उदास विलसो सप्रेम चित्तीं असो ॥सर्व ब्रह्म म्हणोनि निश्चय असा अद्वैतबोधीं असो ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 28, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP