मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|शब्दालंकार| वृत्यनुप्रास शब्दालंकार छेकानुप्रास वृत्यनुप्रास यमक श्रुत्यनुप्रास व अंत्यानुप्रास पुनरुक्तवदाभास लाडानुप्रास चित्र शब्दालंकार - वृत्यनुप्रास काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात. Tags : grammermarathiअलंकारमराठीव्याकरण वृत्यनुप्रास Translation - भाषांतर आर्या - जेव्हां व्यंजन एकचि अनेक अथवा पुन: पुन्हां येतीं ॥त्याहो अलंकृतीतें विबुध अनुप्रास वृत्तिचा ह्नणती ॥१॥श्लोक - कदां नेणो ओढी शरधिंतुनि काढी शर कदां ॥कदां धन्वीं जोडी वरिवारिहि सोडी तरी कदां ॥विपक्षाच्या वक्षावरि विवरलक्षास्तव रणीं ॥कळे राजेंद्राची त्वरित शरसंधानकरणी ॥२॥रघुनाथपंडित.गद्य - जेव्हां एक किंवा एकापेक्षा अधिक व्यंजनें पुन: पुन्हां पुष्कळ वेळां येतात, तेव्हां हा अलंकार होतो. भूषा-भुजंग-भक्ता. भीतिद भव्य प्रभाव तुज भार ॥भावी-भयें भवानी-भर्ता भगवान् भुले भला फार ॥३॥बृहद्दशम. दुसरे श्लोकांत द् व् क्ष हीं व्यंजनें पुष्कळ वेळां आलीं आहेत ह्नणून हा अलंकार झाला आहे. ती साध्वी सीतेच्या दिव्यादेहासि दे उटी भव्या ॥पुष्पांची माळाही कीं जी वाळो नये सदा नव्या ॥४॥दिव्यरामायण. N/A References : N/A Last Updated : February 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP