मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|श्री स्वामी समर्थ सप्तशती| अध्याय आठवा श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा स्वामी समर्थ सप्तशती - अध्याय आठवा श्री दत्तावधूत विरचित ' श्री स्वामी समर्थ सप्तशती ' ही उपासना करण्यासाठी खूप दिव्य पोथी आहे. Tags : dattavadhootpothisamarthaदत्तावधूतपोथीसमर्थ अध्याय आठवा Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा । श्री ब्रह्मचैतन्य । गोंदवलेकर महाराज । नववे वर्षी घेत । आशीर्वाद समर्थांचा ॥१॥रामकृष्ण परमहंस । स्वामी दर्शन देती त्यांस । ब्रह्मचारी लोकनाथांस । सिध्दपदी बैसविले ॥२॥विष्णुबुवा ब्रह्मचारी ।वृत्ती ब्रह्मतदाकारी । श्री समर्थ लीलाधारी । नाना लीला करिती ते ॥३॥काळबुवा पुण्यात । साटम सावंतवाडीत । रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात । ऐसे शिष्य तयांचे हो ॥४॥ताजुद्दीनबाबा नागपुरात । साईबाबा शिर्डीत । सीतारामबाबा खर्डीत । ऐसे शिष्य तयांचे हो ॥५॥ऐसा स्वामी समर्थ । सदैव राही लीला करीत । तयांचे चरित्र अद्भुत । कोणी कैसे वर्णावे ॥६॥गोविंदराव नामे भक्त । असे व्याधीने पीडित । गाणगापुरी सेवा करीत । होता पाहा तेधवा ॥७॥त्यासी दृष्टांत होत । जावे अक्कलकोटात । स्वामी समर्थ श्री दत्त । कलियुगी पाहा अवतरले ॥८॥ऐसा होई दृष्टांत । मग येई अक्कलकोटात । कृपा स्वामींची होत । व्याधी जाई निघोनिया ॥९॥मल्हारराव गायकवाड । बडोद्याचा राजा असत । श्री स्वामीसी विनवीत । यावे बडोद्यासी म्हणोनिया ॥१०॥स्वामी काही न बोलत । राजा दानधर्म करीत । सुवर्ण रौप्य अर्पित । प्रसन्न करण्या स्वामींसी ॥११॥प्रयन्त करी बहुत । परी स्वामी न जात । निराश होऊनी परतत । बडोद्यासी माघारा ॥१२॥जाऊनी दरबार भरवीत । विडा तेथे ठेवीत । म्हणे जो कोणी स्वामींसी आणीत । त्यासी जहागीर देईन मी ॥१३॥एक विडा उचलीत । म्हणे मी स्वामींसी आणीत । ऐसे म्हणोनी येत। अक्कलकोटा माझारी ॥१४॥येऊनी अक्कलकोटात । स्वामीसी धन अर्पित । सेवका अन्नदान करीत । प्रसन्न करण्या स्वामींना ॥१५॥मग हळूच पुसत । चला म्हणे बडोद्यात । स्वामी काही न बोलत । उगेच राहती बैसोनिया ॥१६॥एक महिना राहत । प्रयत्न करी बहुत । अंति निराश होत । जाई परतोनी माघारा ॥१७॥ऐसे अनेक दरबारी । करिती अक्कलकोटी वारी । बडोद्यास न्यावे अंतरी । हेतू धरोनी येती ते ॥१८॥प्रतिवर्षी प्रयत्न करीत । विडा उचलोनी येत । अंति निराश होत । ऐसे पाहा होतसे ॥१९॥राजा दरबार भरवीत । आणि विडा ठेवीत । सर्व दरबार्यांसी म्हणत । श्रोते तुम्ही अवधारा ॥२०॥स्वामी समर्थ भगवान । येथे आणावे म्हणोन । बहुत वर्षे प्रयत्न करोन । निराश आम्ही जाहलो ॥२१॥जो कोणी समर्थांस । घेऊन येईल बडोद्यास । मोठी जहागिरी त्यास । देऊ आम्ही निश्चये ॥२२॥ऐसे जाहीर करत । तात्यासाहेब उठत । मी आणतो समर्थांस । म्हणोनी विडा उचलला ॥२३॥राजासी आनंद होत । द्रव्य देई बहुत । अक्कलकोटासी पाठवीत । लव्याजम्यासहित हो ॥२४॥तात्यासाहेब अक्कलकोटासी येत । सेवकासी अन्न वस्त्र देत । चोळाप्पासी द्रव्य देत । सुंदराबाईसी तैसेची ॥२५॥सेवका ऐसे वश करीत । सर्व सेवक स्वामींसी म्हणत । तात्यासाहेब खरा भक्त । जाऊ आपण बडोद्याला ॥२६॥करावया स्वामीसी प्रसन्न । नित्य करी अन्नदान । गरिबांसी वस्त्रदान । स्वामी हस्ते करीत असे ॥२७॥चार मास ऐसे चालत । परी स्वामी न काही बोलत । म्हणोनी चोळाप्पासी म्हणत । तात्यासाहेब अवधारा ॥२८॥स्वामींसी घेऊनी सांगात । जर बडोद्यासी तुम्ही चलत । जहागिरी देईन तुम्हाप्रत । दहा हजार रुपयांची ॥२९॥ऐकोनी ऐसी मात । चोळाप्पासी लोभ सुटत । येवोनिया स्वामीप्रत । हात जोडोनी विनवितो ॥३०॥स्वामी तुम्ही बडोदा चलत । मज मोठी जहागिरी मिळत । ऐकोनी स्वामी म्हणत । नाही भक्ती तेथवरी ॥३१॥भक्ती नसता भगवंत । कैसा जाईल तेथ । ऐकोनी निराश होत । तात्यासाहेब तेथवरी ॥३२॥तात्या आणि सर्व भक्त । बैसोनी विचार करीत । श्री स्वामींसी बडोद्यास । न्यावे कैसे उचलोनी ॥३३॥सर्व मिळोनी ठरवीत । स्पेशल ट्रेन करावी म्हणत । स्वामींसी घालोनी मेण्यात । ट्रेनमध्ये ठेवावे ॥३४॥ऐसे करिता अकस्मात । स्वामी काही करु न शकत । ट्रेन सरळ थांबत । बडोद्यासी जाऊनिया ॥३५॥ऐसा विचार ठरवत । भाडयाने रेल्वे ठरवत । स्वामींनी बैसावे मेण्यात । म्हणोनी प्रार्थिती स्वामींना ॥३६॥स्वामी चला राजवाड्यात । चला स्वामी खास बागेत । स्वामींनी बसावे मेण्यात । म्हणोनी पाहा ते विनविती ॥३७॥परी स्वामी टाळत । न बैसती पालखीत । ऐसे चार दिवस जात । काय करावे कळेना ॥३८॥एकदा बैसता पालखीत । नेऊ रेल्वे स्टेशनात । ऐसा विचार करीत । सेवक तेथे बैसले ॥३९॥चोळाप्पा स्वामींसी विनवीत । बाळाप्पाही स्वामींसी म्हणत । सुंदराबाईही सांगत । बसा पालखीत म्हणोनिया ॥४०॥ऐसे गेले चार दिवस । काय आले समर्थ मनास । जाऊनी बसले पालखीत । भक्त उचलती पालखी ॥४१॥पालखी उचलोनी त्वरित । पळत रेल्वे स्टेशन गाठत । स्टेशन जव जवळ येत । मेणा हलका लागतसे ॥४२॥म्हणूनी भूमिवरी ठेवीत । पडदा उघडोनी पाहत । स्वामी अदृश्य होत । पाहोनी विस्मय सर्वांना ॥४३॥अदृश्य होऊनी समर्थ । कोठे गेले न कळत । म्हणोनी सर्व दु:ख करीत । काय करावे कळेना ॥४४॥एक पोस्टमन इतक्यात । जेऊर गावाहूनी येत । तो सांगे सेवकाप्रत । स्वामी तिकडे आहे ती ॥४५॥येथोनी दोन मैलांवर । जेऊर गावच्या वाटॆवर । समर्थ एका शिळेवर । बैसलेले पाहिले मी ॥४६॥ऐसे भक्ता सांगत । भक्त जाती धावत । पाहोनी स्वामींसी तेथ । क्षमा मागती सर्वही ॥४७॥बैसवोनिया पालखीत । अक्कलकोटासी आणीत । तात्यासाहेब बडोद्यास । निराश होवोनी जातसे ॥४८॥अनेक ऐसे प्रयत्न करीत । परी स्वामी बडोद्यास न जात । ऐसा स्वामी समर्थ । राजासही मानीना ॥४९॥दरबारी यशवंतराव । त्यासी पाठवी मल्हारराव । बडोद्यासी चलावे । म्हणोनी प्रार्थी स्वामींना ॥५०॥त्यासी पाहता क्रोधित । होती समर्थ अकस्मात । ‘बेड्या ठोका ’ म्हणत । समर्थ तेव्हा जोराने ॥५१॥तिसरे दिवशी हूकूम येत । जाई बडोद्यासी परत । ‘ बेड्या हाती पडत । शिक्षा त्यासी होतसे ॥५२॥ऐसा स्वामी समर्थ । सद्भक्ता हवे ते देत । मग्रुरा दंड करीत । ऐसा महिमा तयाचा ॥५३॥वटवृक्ष नव्हे कल्पवृक्ष । आजही तेथे साक्ष देत । परब्रम्ह दत्त प्रत्यक्ष । अक्कलकोटात राहिला ॥५४॥दत्तात्रेयाचे दर्शनार्थ । एक साधू तप करीत । द्त्त तयासी सांगत । अक्कलकोटात आहे मी ॥५५॥ऐसा आदेश होता प्राप्त । साधू निघाला चालत । बहुत प्रवास करीत । अक्कलकोटी पोचला ॥५६॥येता साधू दर्शनार्थ । स्वामी उभे राहत । तीन शिरे सहा हात । दर्शन देती तयाला ॥५७॥पूर्णब्रह्म दत्तात्रेय । ऐसे स्वामींचे स्वरुप होय । साधू होई तन्मय । पाहोनी लीला स्वामींची ॥५८॥जन्मांध सूरदास भक्त । होता व्दारकेत राहत । श्री स्वामी समर्थ । दर्शन देती तयालागी ॥५९॥तयासी दिव्यदृष्टी देत । मीच कृष्ण म्हणोनी सांगत । सदेहाने सांप्रत । अक्कलकोटी आहे मी ॥६०॥भुर्याबुवा व्दारकेत । द्त्त दर्शनार्थ तप करीत । स्वामी समर्थ दर्शन देत । एके दिनी तयालागी ॥६१॥मस्तकी वरदहस्त ठेवीत । बुवा होती समाधिस्थ । ऐसी लीला अद्भुत । करिती समर्थ श्री स्वामी ॥६२॥भुर्याबुवा गुजराथेत । समर्थांचा प्रचार करीत । लोक येती दर्शनार्थ । दूरदुरोनी स्वामीच्या ॥६३॥ऐसा स्वामी समर्थ । ज्या जे हवे ते ते देत । कल्पवृक्ष तेथे असत । अक्कलकोटा माझारी ॥६४॥कुलकर्णी नामे दत्तभक्त । उदरव्यथेने असे पीडित । गाणगापुरी मास सात । सेवा करीत राहिला ॥६५॥त्यासी होई दृष्टांत । जरी परब्रह्म भेटत । व्याधी जाईल निश्वित । परब्रह्माच्या दर्शनाने ॥६६॥होऊनिया जागृत । म्हणे परब्रह्म कोठे राहत । जे योग्यांसीही न भेटत । मजला कैसे भेटावे ॥६७॥पुन्हा दृष्टांत होत । अक्कलकोटा जावे म्हणत । तेथे परब्रह्म साक्षात । स्वामी रुपे राहतसे ॥६८॥अक्कलकोटा येई भक्त । पाहे परब्रह्म साक्षात । तत्क्षणी होई व्याधी मुक्त । ऐसा महिमा स्वामींचा ॥६९॥त्याच्या लीला अनंत । कथा त्यांच्या अनंत । महिमा त्यांचा अनंत । कोणी कैसा वर्णावा ॥७०॥॥ अध्याय आठवा ॥ ॥ओवी संख्या ७०॥स्वामी एका हत्तीसमोर उभे आहेत व रागाने हत्तीकडे पहात आहेत व रागाने हात वारे करीत आहेत. N/A References : N/A Last Updated : January 14, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP