मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|लघुभागवत| मंगलाचरण लघुभागवत मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा उपसंहार रुक्मिणीहरणगीत सावित्रीगीत सीतागीत लघुभागवत - मंगलाचरण लघुभागवत हे एक उपपुराण आहे. Tags : laghubhagavatmarathipuranपुराणमराठीलघुभागवत मंगलाचरण Translation - भाषांतर आर्या. आजन्म तुझे झाले मजवरि अगणित अखंड उपकार ।त्या तुज मंगलरुपा करितों साष्टांग मी नमस्कार ॥१॥त्वन्नाम सुप्रभातीं देवा स्मरतांचि कामना पुरती ।शमती समस्त दुरितें नानाविध रोग संकटे हरती ॥२॥अन्नाच्छादन देउनि करुनी जलवृष्टि रक्षिसे सृष्टी ।ही केवढी तुझी बा आह्मां जीवांवरी कृपादृष्टी ॥३॥करुणेशा सर्वेशा सर्वांची काळजी तुला आहे ।परि मन अधीर अमुचें भलतें योजूनि तुजकडे पाहे ॥४॥मोह कलह कपट नको द्वेष नको भीरुता वृथा गर्व । मज योग्य तेंचि देईं सर्वज्ञा कळतसे तुला सर्व ॥५॥करुनी दया क्षमा मज व्हावी देवा कृतापरधांची ।न शिवो मच्चित्तांतें केव्हांही कल्पना विरोधाची ॥६॥काय अधिक मागावें जनतेची धर्मबुद्धि वाढावी ।वेद विभो रक्षावे दु:खातुनि आर्यभूमि काढावी ॥७॥(पद - ऊठिं गोपालजी जाइं धेनूकडे - या चालीवर.)देवि दुर्गे तुला जोडितों मी करां । रक्षिं या पामरा पदरिं घेईं ॥ धृ.॥धर्म गेला लया दाविती रिपु भया । अंबिके करिं दया अभय देंई ॥१॥विषयसुख नावडो काम मदही झडो । चित्त माझें जडो आत्मरुपीं ॥२॥क्रोध मत्सर जळो दुरित दूरी पळो । द्वैतबाधा टळो सर्वभूतीं ॥३॥बुद्धि सुस्थिर असो शांति हृदयीं वसो । लोभ अथवा नसो मोह कांहीं ॥सर्व मंगल करीं षडरितापां हरीं । तुजसि माहेश्वरी प्रार्थना हे ॥५॥दुष्ट संगति सदा भोगवी आपदा । सोडवीसी कदा देवि अंबे ॥६॥भक्तजनपालके दुष्टसंहारके । चरणिं तव कालिके ठाव देईं ॥७॥भक्त गोविंद मी संसृतीच्या भ्रमीं । पडुनि झालों श्रमी मुक्ति देईं ॥८॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP