मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७३ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ७३ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ अध्याय ७३ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर भवन्त एतद्विज्ञाय देहाद्युत्पादमन्तवत् । मां यजन्तोऽध्वयैर्युक्ताः प्रजाधर्मेण रक्षथ ॥२१॥सन्तन्वंतःप्रजातंतून्सुखं दुःखं भवाभवौ । प्राप्तं प्राप्तं च सेवन्तो मच्चित्ता विचरिष्यथ ॥२२॥कर्मसंस्कारें उत्पाद्य देह । देहभोगार्थ ऐश्वर्यसमूह । जाणोनि नाशवंत हें सर्व । मातें अगर्व भजा तुम्ही ॥२३५॥क्षात्रधर्में प्रजापालन । समरीं शत्रु विभाण्डून । साङ्गविधानें करूनि यज्ञ । मातें संपूर्ण यजा तुम्ही ॥३६॥प्रमत्त न होनि सर्व काळ । सर्वदा मदंघ्रिभजनशीळ । होवोनि क्रमिजे उरला काळ । यावरी बोल अवधारा ॥३७॥धर्मपत्न्यांचे गर्भकोशीं । संतति वाढवा स्वधर्मेंसीं । भजोनि विध्युक्त ऋतुकाळासी । न होतां कामासि वशवर्ती ॥३८॥याच न्यायें प्रजाराष्ट्र । राजवर्गीं मंत्रिप्रवर । वर्तविजे स्वधर्मपर । प्रजाविस्तार करवूनी ॥३९॥मत्पदचिन्तनीं चित्त रमवा । जे जे काळीं ज्या ज्या विभवा । प्राप्त होतां विषयभावा । न भजोनि सेवा समबोधें ॥२४०॥समबोध म्हणाल कैसिये परी । तरी दुःख मानिजे सुखाचिपरी । जें जें प्राप्त जे अवसरीं । तत्स्वीकारीं सम होणें ॥४१॥ऐशिया बोधें विचरा मही । तैं मग न बाधे राज्यपदही । अंतीं पावाल सुख अक्षयी । ऐका तेंही निरूपितों ॥४२॥उदासीनाश्च देहादावात्मारामा धृतव्रताः । मय्यावेश्य मनः सम्यङ मामन्ते ब्रह्म यास्यथ ॥२३॥देहादि समस्त संसारभरण । नश्वर निश्चयें जाणोन । सहजचि तेथें उदासीन । समाधान स्वस्वरूपीं ॥४३॥इंद्रियनिग्रहा नांव दम । मनोनिग्रहा नाम शम । स्वात्मप्रत्यय तो उपरम । सांडूनि भवभ्रम वृत्तीचा ॥४४॥प्रपंचीं रमली असतां वृत्ति । नामें बोलिजे ते प्रवृत्ति । स्वरूपीं रमतां तयेप्रति । म्हणती उपरति सज्ञान ॥२४५॥विषयी प्रेमा प्रवृत्ति लावी । निवॄत्ति निजात्मप्रेमा रुचवी । तत्साधनें व्रतस्थ जीवीं । होऊनि उर्वी सुखें विचरा ॥४६॥ऐशिया साधनें बरव्यापरी । मनें प्रवेशा मझमाझारी । मदेकनिष्ठा चराचरीं । यावीण दुसरी स्थिति न बणो ॥४७॥ऐसे होऊनियां मत्पर । संततिमाथां राज्यभार । देऊनि वर्ततां निरंतर । प्रारब्धपर तनुयात्रा ॥४८॥प्रारब्धक्षयीं शरीरें पडती । तेव्हां पावाक अमृतावाप्ती । ब्रह्मनिर्वाण श्रुति मज म्हणती । त्या मजप्रति मिळाल ॥४९॥श्रीशुक उवाच - इत्यादिश्य नृपान्कृष्णो भगवान्भुवनेश्वरः । तेषां न्ययुङ्क्त पुरुषान्स्त्रियो मज्जनकर्मणि ॥२४॥तया नृपांतें ऐसियापरी । आज्ञानुग्रह करूनि हरी । काराग्रहींचे श्रम परिहारी । शुकवैखरी वर्णितसे ॥२५०॥विप्रवेशें तिघेजण । श्रीकृष्ण वृकोदर अर्जुन । शत्रुनगरीं सेवकाविण । करिती शासन केंवि म्हणा ॥५१॥तरी भगवान आणि भुवनेश्वर । दोहीं विशेषणीं व्यासकुमर । ये शंकेचें रहस्यसार । वदला प्रकार तो ऐका ॥५२॥श्रीमंत एकाकी न म्हणावा । देशीं विदेशीं जेव्हां तेव्हां । पाहिजे तितुका जनमेळावा । त्यातें वोळगे सर्वत्र ॥५३॥आणि यशस्वी प्रतापवंत । देखूनि होती जन अंकित । अनन्यभावें अतंद्रित । वर्तती नियत सेवेसी ॥५४॥अभीष्टदानीं जो उदार । त्याचे किङ्कर होती थोर । भूतभविष्यज्ज्ञानपर । मोही चतुर चमत्कारें ॥२५५॥विरक्त तितिक्षु क्षमावंत । सुरनर तयाचे अंकित । पूर्णैश्वर्यें कृष्णनाथ । न्यून सामर्थ्य त्या कोण ॥५६॥प्रकट श्रीकृष्ण भुवनेश्वर । चतुर्दशभुवनांचा ईश्वर । विधि हर सुरवर शशि भास्कर । ज्याचे किङ्कर अनुयायी ॥५७॥तें केंवि म्हणावे एकाकी । शंका किमर्थ इयेविषीं । मंत्री अमात्य सैन्यप्रमुखीं । सेवक होऊनि सेवेजती ॥५८॥वीस सहस्र शतें अष्ट । मागधबंघींचें राजे श्रेष्ठ । मुक्त करूनि त्यांचे कष्ट । निरसी अभीष्टसुखदानें ॥५९॥नापितांचीं आणूनि शतें । करवी नृपांच्या श्मश्रुकर्मातें । सुगंध द्रव्यें उपचारयुक्तें । अभ्यंगातें प्रयोजवी ॥२६०॥अभ्यंगकर्माच्या ठायीं निगुती । योजूनि कुषळ पुरुषांप्रति । सुतप्तजळदानें ओळंगती । उपपुरंध्री नृपवर्गा ॥६१॥समस्त राजे बंधविमुक्त । श्मश्रुकर्मादिमळनिर्मुक्त । उद्वर्तनाम्यंगसुस्नात । निदेशमात्रें करविले ॥६२॥नवीन मगधेश्वर सहदेव । त्यासि आज्ञापी वासुदेव । नृपापचारीं राजे सर्व । देऊनि गौरव पूजावे ॥६३॥सपर्यां कारयामास सहदेवेन भारत । नरदेवोचितैर्वस्त्रैर्भूषणैः स्रग्विलेपनैः ॥२५॥आज्ञापूनि सहदेवातें । करविता झाला नृपार्चनातें । तें सविस्तर सावधचित्तें । परीक्षितीतें शुक सांगे ॥६४॥मनुष्यदेव म्हणीजे राजे । यथोचित तयाचे पूजे । वस्त्रें भूषणें उपचांर जे जे । ते तद्वोजे समर्पूनी ॥२६५॥दिव्यपरिधानीं क्षौमाम्बरें । उत्तरीयार्थें अनर्ध्यें अपरें । विचित्र निर्मिलीं कार्तस्वरें । अर्पी आदरें सहदेव ॥६६॥मुकुट कुण्डलें कंठमाळा । अंगदें कंकणें मुद्रिक सकळा । अमूल्य पदकें कटिमेखळा । अर्पी नृपाळां मगधेश ॥६७॥कंठीं आपादपुष्पहार । मुकुटीं अवर्तसगुच्छ विचित्र । चंदनकस्तूरीसह केशर । तिलक मनोहर रेखियले ॥६८॥अंगीं मलयागुरु चर्चिला । सुगंध धूसर वरी उधळिला । दशाङ्गशलाका योजूनि अनळा । स्थापी नृपाळां द्वय भागीं ॥६९॥कनकपात्रीं घृताक्तवाती । उजळूनि केली एकारती । समस्त बैसवूनि एकपंक्तीं । नैवेद्य निगुती तें ऐका ॥२७०॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP