मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५५ वा| आरंभ अध्याय ५५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ५५ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥जय जय कल्याणकल्पतरो । जय जय जगज्जनकादिजगद्गुरो । चिद्विलासाध्वरचरो । प्रबोधमेरो गोविन्दा ॥१॥तव कृपेच्या प्रसादबळें । चौपन्न अध्याय वाखाणिले । पंचावनीं जें प्रमेय आलें । तें द्योतिलें पाहिजे ॥२॥पंचावन्नामाजि कथा । रुक्मिणीजठरीं मन्मथा । त्यातें हरूनि शंबरें नेता । पितरीं व्यथा अनुभविली ॥३॥मनुष्यनाट्यसंपादणी । करूनि दावी चक्रपाणि । पुत्रोत्पत्तिलाभहानि । तदनुकरणीं जन मोही ॥४॥कुटुंबवत्सल जे संसारी । संततिलाभें तोषती भारी । प्रजाहानीची शोकलहरी । तेचि श्रीहरि स्वयें दावी ॥५॥रुक्मिणीचें पाणिग्रहण । त्यावरी जाम्बवतीचें लग्न । न निरूपितां मन्मथजनन । काय म्हणून हें कथिलें ॥६॥श्रोतीं सांडूनि ऐसा भ्रम । श्रवण कीजे अनुक्रम । आधीं रुक्मिणीपोटीं काम । शंबराधम ज्या हरिता ॥७॥यावरी जाम्बवतीचें लग्न । जालियानंतर शंबरा वधून । पूर्वपत्नी रति घेऊन । मन्मथें येऊन हरि नमिला ॥८॥ऐसें असतां बादरायणि । शंबराख्यान उपसंहरूनी । रति घेऊनि आला कार्ष्णि । हें गेला वदोनी प्रसंगें ॥९॥तेंचि व्याख्यान ये अध्यायीं । श्रवण कीजे श्रुतज्ञांहीं । परीक्षितीच्या श्रवणालयीं । जें द्रवोनि हृदयीं शुक वोपी ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP