कृष्ण कृष्णाप्रमेयात्मन्योगेश जगदीश्वर । वासुदेवाखिलावास सात्वतां प्रवर प्रभो ॥११॥

कृष्ण कृष्ण द्विरुक्तिनामें । आदरपुरस्सर सप्रेमें । संबोधिलें मुनिसत्तमें । तें नृपोत्तमें परिसावें ॥१३॥
नवां संबोधनीं अर्थ । सूचिला संशयनिवृत्त्यर्थ । ऐकोनि येथींचा गुह्यार्थ । शंका किमर्थ राहील ॥१४॥
कृष्ण सर्वज्ञ ईश्वर । जाणे सर्वांचें अंतर । नारदाचा प्रेमादर । सत्य साचार त्या विदित ॥११५॥
किमर्थ बोधिलें कंसातें । हेंही विदित सर्वज्ञातें । म्हणोनि संशयरहितचित्तें । मुनि कृष्णातें भेटला ॥१६॥
कृष्णरूपा कालात्मका । तुज मृत्यूचा कायसा धोका । किमर्थ वयसेचा आवांका । दावूनिलोकां चाळविसी ॥१७॥
अप्रमेयात्मा तूं ईश्वर । तुझा अमोघ मंचविचार । केंवि जाणती ते पामर । कंसासुरप्रमुख जे ॥१८॥
अथवा आत्मा म्हणिजे देह । तो हा तुझा अप्रमेय । वृथा कंसादिकांचें भय । हा अभिप्राय सूचिला ॥१९॥
परिच्छिन्न असतां जरी । तरी हा जन्मता देवकीउदरीं । स्वेच्छा लीलाविग्रहधारी । स्वेच्छा आदरी तैं मरण ॥१२०॥
कंसासि कथिलें गुह्य सर्व । तेणें रचिला मंत्र वाव । तरी तूं योगीश्वरांचा राव । अचिंत्य अभिमात्र पैं तुझा ॥२१॥
कंस प्रतापि वाटेल चित्ता । तरी तूं त्रिजगाचा नियंता । जगदीश्वर या संबोधनार्था । माजि तत्त्वता हें सूचिलें ॥२२॥
कंसें करावया स्वरक्षण । बळिष्ठ ठेविले म्हणसी गण । त्यांमाजि तुझें वसतिस्थान । वासुदेव पूर्ण सर्वग तूं ॥२३॥
सर्वाश्रय तूं अखिलावास । सात्वतप्रवर स्वभक्तईश । सर्वशक्तीचा परेश । प्रभुत्वें जगदीश प्रभुवर तूं ॥२४॥
म्हणविसी नंदाचा बाळक । हें मायावी नाट्यकौतुक । वास्तव स्वरूप निष्कटंक । सर्वात्मक तूं आत्मा ॥१२५॥

त्वमात्मा सर्वभूतानामेको ज्योतिरिवैधसाम् । गूढो गुहाशयः साक्षी महापुरुष ईश्वरः ॥१२॥

सर्वभूतांचा अंतरात्मा । तो तूं एकचि पुरुषोत्तमा । नोहई परिच्छिन्न जीवात्मा । तुजमाजि व्योमादिक अवघें ॥२६॥
व्यापक म्हणसी कवणेपरी । जैसा पावक काष्ठांतरीं । ज्योतिरूपें वसती करी । काष्ठविकारीं अलिप्त ॥२७॥
भूतीं असोनि भूतांप्रति । दृश्यरूपें न येसी व्यक्ति । यालागीं गूढ म्हणोनि श्रुति । वाखाणिती तुजलागीं ॥२८॥
गूढत्वासि चारी हेतु । ऐकें तेथींचा वृत्तांतु । गुहाशय साक्षी महापुरुष तूं । ईश्वर नियंता सर्वांचा ॥२९॥
मनोबुद्ध्यादि जे आशय । त्या गुहांमाजि तूं गुहाशय । तज्जन्यकल्पनाकृतनिश्चय । त्यां तूं अप्रमेय अगम्य ॥१३०॥
यालागिं म्हणिजे तुज साक्षी । कीं साक्षी अदृश्य सर्वां पक्षीं । म्हणोनि महापुरुष तूं हृषीकेशी । जो परिच्छिन्नमतीशीं दुर्ज्ञेय ॥३१॥
एवं सर्व प्रकारें अविज्ञेय । तैं ममास्तिक्या प्रमाण काय । म्हणसी तरी तूं प्रतीतिमय । अज अव्यय ईश्वर तूं ॥३२॥
गौणभूतात्मक चराचर । जीव अज्ञान कर्मतंत्र । त्यांतें नियामक फळभोगपर । तो तूं ईश्वर नियन्ता ॥३३॥
अशुभफलदें कर्में करिती । अशुभफळभोगा नेच्छिती । त्यां तो भोग शासनरीति । ईशनशक्ति भोगविसी ॥३४॥
जगच्छत्रु जगन्मित्र । एक सभाग्य एक दरिद्र । एक मूर्ख एक चतुर । कर्मानुसार तूं करिसी ॥१३५॥
नेघें म्हणतां घेवविसी । न करी म्हणतां तें करविसी । न भोगूं म्हणतां भोगविसी । कृतकर्मासि ऐश्वर्यें ॥३६॥
म्हणसी ईश्वरें म्यां नियमिलें । तें चराचर नियम्य कोठूनि आलें । कोणापासूनि दुसरें जालें । तें परिसिलें पाहिजे ॥३७॥

आत्मनाऽत्माश्रयः पूर्वं मायया ससृजे गुणान् । तैरिदं सत्यसंकल्पः सृजस्यत्स्यवसीश्वरः ॥१३॥

तरी हें तुजवेगळें नाहीं । तूं एकचि दोहीं ठायीं । नियंता नियम्य नियमन पाहीं । मायाप्रवाहीं रूढविसी ॥३८॥
अन्यसाधनांच आश्रय । नापेक्षिसी तूं आत्माश्रय । मृगजळ करूनि अकर्त्ता सूर्य । तेंवि अव्यय स्वतंत्र तूं ॥३९॥
स्वसत्तायोगबळें माया । पूर्वीं अधिष्ठूनि गुणत्रया । प्रवर्त्तविसी त्रिविधकार्या । सृष्टिप्रळयस्थित्यादिकां ॥१४०॥
गुण सृजूनि गुणद्वारा । सृजन पालन आणि संहारा । एवं तूंचि कर्त्ता खरा । भेदविकारा न शिवोनी ॥४१॥
म्हणसी सृष्ट्यादि त्रिविध क्रिया । षट्कारकें साधती यया । तरी कारकतंत्र म्हणावया । योग्य झालों सहजचि ॥४२॥
तरी तूं ईश्वर सत्यसंकल्प । तुज अन्य साधनांचा खटाटोप । न पडे कीं तूं उभयरूप । सप्रताप सर्वात्मा ॥४३॥
सबाह्य एकात्मता तुझी । तेथ अंतर्बाह्य गोष्टी दुजी । कवण करील भेदवाजी । क्रीडसी सहजीं सहजत्वें ॥४४॥
जागृति फेडूनि विश्वाभिमान । सुषुप्ति लेवूनि देखे स्वप्न । तेथ कारकें कैंईं कोण । कारकाधीन विचारीं ॥१४५॥
एवं विश्वविश्वसाक्षी । तूंचि अभेदभेद उभयपक्षीं । क्रीडसी हें जाणिजे दक्षीं । पूर्णनिरपेक्षीं विरक्तीं ॥४६॥
निर्मूनि अवघा जगडंबर । संस्थापूनि स्वधर्मसूत्र । लीला क्रीडसी स्वतंत्र । भेद विचित्र भासोनी ॥४७॥
धर्मसंस्थापने होतां भंग । तैं तूं अवतरसी श्रीरंग । मर्दूनि अधर्मी अनेग । धर्मप्रसंग स्थापिसी ॥४८॥
प्रस्तुत येथ कंसादिक । असुर धर्मोच्छेदक । अवतरलासि तूं यदुनायक । धर्मसंस्थापक तन्नाशें ॥४९॥

स त्वं भूधरभूतानां दैत्यप्रमथरक्षसाम् । अवतीर्णो विनाशाय सेतूनां रक्षणाय च ॥१४॥

भूधर म्हणिजे पृथ्वीपति । असुरभूपति दैत्यजाति । अधर्मरूपी पापमूर्ति । राक्षसव्यक्ति नररूपी ॥१५०॥
त्यांच्या संहारा कारणें । धर्मसेतुसंस्थापनें । तुझें यदुकुळीं अवतार धरणें । साधुरक्षणें अघनाशें ॥५१॥
आजिपर्यंत बालचरितें । बहुत मारिले अधर्मकर्त्तें । पुढां मारिसी ते संकेतें । कथिजेतील प्रसंगें ॥५२॥

दिष्ट्या ते निहतो दैत्यो लीलयाऽयं हयाकृतिः । यस्य हेषित संत्रस्तास्त्य्जन्त्यनिमिषा दिवम् ॥१५॥

लीलेकरूनि दैवयोगें । केशिनामा दैत्य आंगें । तुवां मारिला प्रसंगें । ज्याचेनि स्वर्गें उद्विग्न ॥५३॥
महाकपटी अश्वाकृति । ज्याच्या हेषणें त्रिजगती । सुर नर भूचर संत्रासती । देवही पळती स्वगौंनी ॥५४॥
न हालती नेत्रपातीं । यास्तव अनिमेष ऐसें म्हणती । त्या स्वर्गस्थां हृदयीं खंती । जो दुर्मति आठवतां ॥१५५॥
तो आजि देवें मारिला केशी । येथूनि प्रारम्भ दैत्यवधासी । अनुक्रमें जे संहारिसी । ते तूं पर्येसीं श्रीकृष्णा ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP