मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २४ वा| श्लोक १६ ते २० अध्याय २४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ अध्याय २४ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर स्वभावतंत्रो हि जनः स्वभावमनुवर्तते । स्वभावस्थमिदं सर्व सदेवासुरमानुषम् ॥१६॥स्वभाव म्हणिजे कर्म प्राक्तन । संस्काररूपें उद्दीपन । अंतर्यामित्वें प्रेरण । तें अन्यथा कोण करूं शके ॥१७॥जैसा पूर्वकर्मसंस्कार । कर्मप्रवृत्ति तदनुसार । पालटावया असमर्थ इंद्र । तरी कां आदर तयाचा ॥१८॥स्वभावतंत्र जीव असतां । कर्मीं संस्कारें प्रवर्ततां । कैंची इंद्रासि तेथें सत्ता । अंतर्यामिता भोगावया ॥१९॥शतक्रतूच्या कर्माचरणें । जीवचि वेंठे इंद्रपणें । देव मनुष्य असुर होणें । याचिप्रमाणें स्वभावें ॥१२०॥देहानुच्चावचाञ् जंतुः प्राप्योत्सृजति कर्मणा । शत्रुर्मित्रमुदासीनः कर्मैव गुरुरीश्वरः ॥१७॥तस्मात्संस्कारप्रेरणेस्तव । कर्में निर्माण होय सर्व । त्या कर्मासीच कारणत्व । पूज्य यास्तव कर्मचि ॥२१॥गाईपासूनि दुग्ध घेणें । रासभी पोखिजे मेळवणें । असतां फळसिद्धि कर्माचरणें । देवां भजणें हें तैसें ॥२२॥देवमनुष्यतिर्जग्याति । अनेक देह जंतूप्रति । कर्में करूनि प्राप्त होती । पुन्हा सोडिती कर्मक्षयीं ॥२३॥संचित प्रारब्ध क्रियमाण । ऐसें त्रिविध कर्म जाण । नाना योनीं देहजनन । उपसंहरण करी पुनः ॥२४॥कर्में करूनि शत्रुमित्र । कर्में करूनि मातापितर । कर्में करूनि पुत्रकलत्र । योनि विचित्र भोगणें ॥१२५॥शत्रु मित्र उदासीन । अवघें कर्मचि एक जाण । गुरु ईश्वर कर्माविण । सहसा आन असेना ॥२६॥कर्में माता प्रसवे पुत्र । प्रारब्धक्षयीं टाकूनि गात्र । पुन्हा पुत्राचें होय कलत्र । कर्म विचित्र तें ऐसें ॥२७॥स्त्री भर्तार व्याघ्र धेनु । कर्मसंस्कारें करून । परस्परें घेती प्राण । वैर स्मरोन कर्मज ॥२८॥एवं पूर्वोक्त उच्चावच । कर्मेंचि देह जोडती साच । ऐसा कर्मांचा नटनाच । दाऊनि विवंच करीतसे ॥२९॥अनेक देहांच्या करूनि बुंथी । पांगुरोनी ममताभ्रांति । कर्म बहुरूपी जीवाप्रति । विविधाकृती नाचवी ॥१३०॥यालागीं कर्माहूनि अपर । गुरु आणि ईश्वर । कैंचा फलदाता येथ शक्र । कर्मप्रचुर अवघेंचि ॥३१॥तस्मात्संपूजयेत्कर्म स्वभावस्थः स्वकर्मकृत् । अंजसा येन वर्तेत तदेवास्य हि दैवतम् ॥१८॥स्वभावस्थ जो संस्कारनिष्ठ । स्वकर्म करीत होत्साता प्रकट । त्यास्तव कर्मचि त्या श्रेष्ठ । पूज्य अभीष्ट फलप्रद ॥३२॥ताता तूं जरी म्हणसी ऐसें । द्रव्यत्याग देवतोद्देशे । यज्ञामाजि विहित असे । तरी कर्मासि कैसें स्वातंत्र्य ॥३३॥विनादेवता न घडे कर्म । ऐसा सहसा न धरीं भ्रम । कर्मांगदेवता हें जाणिजे वर्म । स्वातंत्र्यधर्मवर्जित ॥३४॥जीवकृषीवळें कर्मभूमीं । जें जें देवताबीज नामीं । प्रतिष्ठिजे तें अभीष्टकामीं । फलद स्वधर्मीं अर्चितां ॥१३५॥गहूं पेरिल्या होती फलद । तेथ जोंधळे काय सांगती वाद । तैसेचि येथ देवताभेद । कर्मीं विशद अंगत्वें ॥३६॥जेणें ज्याचें अभिवर्तन । चाले साकल्येंकरून । तेचि देवता तोचि यज्ञ । त्यालागून सुसेव्य ॥३७॥स्वयुक्तीचे हेतुवाद । ऐसे बोलोनि मुकुंद । वैपरीत्यें दोषप्रद । तेंचि विशद प्रकाशी ॥३८॥आजीव्यैकतरं भावं यस्त्वन्यमुपजीवति । न तस्माद्विदते क्षेमं जारं नार्यसती यथा ॥१९॥जनन जीवन परिवर्धन । जेणें उभयत्र कल्याण । तें सांडूनि विहिताचरण । अन्यसेवन जो करी ॥३९॥तया अन्यापासूनि कांहीं । सहसा क्षेम होणार नाहीं । असती जारिणी जैसी कांहीं । जारगेहीं न निंद्य ॥१४०॥तैसें आपुलें कर्म आपण । करितां लाहिजे कल्याण । अन्य कर्म सदूषण । दुःख दारुण भोगवी ॥४१॥तरी कोणकोणा कैसें कर्म । तेंही ताता ऐकें वर्म । नियमपूर्वक भजतां सुगम । फलसाम्य सर्वांसी ॥४२॥वर्तेत ब्रह्मणा विप्रो राजन्यो रक्षया भुवः । वैश्यस्तु वार्तया जीवेच्छूद्रस्तु द्विजसेवया ॥२०॥वेदाध्ययनें अध्यापनें । वेदविहितकर्माचरणें । वेदार्थाच्या परिचिंतनें । भव निस्तरणें ब्राह्मणीं ॥४३॥संरक्षूनि भूमंडळ । प्रजापीडक मारूनि खळ । धर्मन्यायें सर्वकाळ । भव भूपाळ निस्तरिती ॥४४॥चतुर्विध वार्तावृत्ति । तदनुष्ठानें वैश्य तरती । द्विजसेवनें शूद्रयाति । पार पावती भवाचा ॥१४५॥ऐसें असतां इंद्रादिक । कैंचे कोणासि फलदायक । आपुलें कर्म जें निष्टंक । सेव्य अचुक तें आम्हां ॥४६॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP