मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २२ वा| श्लोक १ ते ५ अध्याय २२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ अध्याय २२ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - हेमंते प्रथमे मासि नंदव्रजकुमारिकाः । चेरुर्हविष्यं भुंजानाः कात्यायन्यर्चनव्रतम् ॥१॥वृश्चिकीं पावे जैं ग्रहपति । तेव्हां हेमंतउत्पत्ति । तैंहूनि गोपकुमारी सुमति । ज्या व्रजीं वसती नंदाच्या ॥२३॥वृश्चिक धनुष्य लंघी भास्वत । हेमंतऋतु तंवपर्यंत । सूर्यमानें प्रथम तेथ । सहोमास बोलिजे ॥२४॥तिये हेमंतीं मार्गशीर्षीं । गोपकुमारी प्रथम मासीं । जाल्या आचरल्या व्रतासी । दृढनेमेंशीं सकामा ॥२५॥उषःकालीं प्रातःस्मरण । यथोक्त सारोनि शौचाचरण । करिती मुखप्रक्षालन । वाड्नियमनपूर्वक ॥२६॥आहारविहारवसनाशन । अवघें विध्युक्त नियमून । नित्य सेविती हविष्यान्न । कदन्न परान्न न घेती ॥२७॥प्रधानदेवता कात्यायनी । निरत तयेच्या अर्चनीं । अरुणोदयीं यमुनास्नानीं । जाती मिळोनि व्रजबाळा ॥२८॥आप्लुत्यांऽभसि कालिंद्या जलांते चोदितेऽरुणे । कृत्वा प्रतिकृतिं देवीमानर्चुर्नृप सैकतीम् ॥२॥ऐसें परीक्षिते सावधान । करिसी नरांचें पालन । नृप ऐसें जें संबोधन । गुणलक्षणसौभाग्यें ॥२९॥अरुणें प्राची प्रकाशितां । येती यमुनेप्रति समस्ता । पूजासौभाग्यद्रव्ययुक्ता । परमनियता व्रतनियमें ॥३०॥मनें चिंतोनि कात्यायनी । संकल्प करिती तत्पूजनीं । मग मज्जती यमुनाजीवनीं । वसनें ठेवूनि तटाकीं ॥३१॥यमुनाजीवनीं करोनि स्नानें । करिती स्ववस्त्रें परिधानें । सौभाग्यद्रव्यें विलेपनें । नामस्मरण आननीं ॥३२॥भूमि शोधोनि यमुनापुलिनीं । वाळुवेची शुभलक्षणी । रूपरेखाठाणमाणीं । मूर्ति निर्मूनि साजिरी ॥३३॥सालंकृत कात्यायनी सायुध चिंतूनियां ध्यानीं । मूर्तीमाजी आवाहूनी । मग पूजनीं प्रवर्तती ॥३४॥आसनपाद्यार्घ्याचमन । पंचामृतशुद्धस्नान । प्रतिष्ठापन वसनभूषण । सौभाग्यमंडन अर्पिती ॥३५॥गंधैर्माल्यैः सुरभिभिर्बलिभिर्धूपदीपकैः । उच्चावचैश्चोपहारैः प्रवालफलतंडुलैः ॥३॥हरिचंदन देवदारु । रक्तचंदन कृष्णागरु । कस्तूरी गोरोचन मलयागरु । आणि कर्पूर काश्मीर ॥३६॥इत्यादि विशिष्टगंधें । समर्पिती भगवतीसि सिद्धें । तैसींच सुगंधें सुमनें विविधें । जीं प्रसिद्धें पूजनीं ॥३७॥चंपक मोगरे सेवंती । जाती यूथिका मालती । बकुळ केतकी पंकजयाति । विविध अर्पिती अंबेतें ॥३८॥अपामार्ग मरु आम्र । दूर्वा दर्भ फुले ताम्र । शिरीष शमी परम नम्र । गायत्र्यादि प्रवाळ ॥३९॥दशांगगुग्गुलुतरुनिर्यास । धूप अर्पिती अंबिकेस । साज्यवर्तिकादि पोतास । एकार्तिदीप उजळिती ॥४०॥पायसघृताक्तपक्कान्नें । लाडू मोदक विविधौदनें । मंदक शष्कुल्या चित्रान्नें । शाका लवणें पाचिता ॥४१॥लेह्यपेयचोष्य खाद्य । भक्ष्यभोज्यादि बहुविध । अर्पिती अंबेतें नैवेद्य । पति गोविंद दे म्हणती ॥४२॥मध्यें अर्पूनि अमृतपानें । कल्पिती उत्तरापोशनें । मुखकरपादप्रक्षालनें । करोद्वर्तनें सुगंधें ॥४३॥श्रीफळ लकुच नारीकेळें । जंबु बीजपूर रायांवळे । निंबें नारिंगें द्राक्षें केळें । आणि रसाळें फणसादि ॥४४॥क्रमुक खर्जूर अंजिर । इक्षुदंड विचित्र मधुर । इत्यादि अर्पिती फलसंभार । कृष्ण भ्रतार इच्छूनी ॥४५॥नागवल्ली सुपक्कदळें । क्रमुकखदिरचूर्णमेळें । एळा लवंगा जातीफळें । कंकोळ कर्पूर जायपत्री ॥४६॥तजमरीच नागरयुक्त । त्रयोदशपदार्थमंडित । तांबूल अर्पूनि नंदसुत । याचिती कांतदेवीतें ॥४७॥यथाशक्ति हेमरत्नें । अनर्घ्यें महार्घ्यें सामान्यें । साङ्गतासिद्धि लक्षूनि मनें । विविध दक्षिणे वाहती ॥४८॥विविध कर्पूरनीराजनीं । नीराजिती कात्यायनी । छत्रचामरनृत्यगायनीं । राजचिन्हीं तोषविती ॥४९॥कुंकुमाक्त तंडुल करीं । दिव्यसुमनांच्या संभारीं । पुष्पांजलि अर्पूनि गौरी । वंदिती शिरीं पदकमळां ॥५०॥मग सारूनि प्रदक्षिणा । करिती मौनविसर्जना । शुद्धभावें पढती स्तवना । कुरुभूषणा तें ऐकें ॥५१॥कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि । नंदगोपसुतं देवि पतिं मे कुरु ते नमः ॥४॥उभ्या राहुनि बद्धांजलि । दृष्टि ठेऊनि चरणकमळीं । मुखें पढती नामावळी । प्रेमकल्लोळीं जयघोषें ॥५२॥जय जगदंबे कात्यायनी । महामाये जय भवानी । अघटितघटके जय योगिनी । अखिलजननी अधीश्वरी ॥५३॥स्तवनमिसें निजाभीष्ट । सूचित्या झाल्या ज्या तन्निष्ठ । तें तूं राया ऐकें प्रकट । गूढार्थ स्पष्ट येथींचा ॥५४॥नंदगोपाचा जो कुमार । कात्यायनी तो देईं वर । देतां नमनीं तें दुष्कर । सिद्धि समग्र तुजपाशीं ॥५५॥महामोहें मोही जन । मायालाघवें भुलवी कृष्ण । महामाये हें संबोधन । यालागून त्या स्तविती ॥५६॥योगसिद्धीचिया बळें । योगी टाकिती इच्छिलीं स्थळें । महायोगिनी वेल्हाळे । तेवीं गोपाळें सह रमवीं ॥५७॥करणदेवता सर्व शरीरीं । तूं तयांची अधीश्वरी । आमच्या मनोरथानुसारी । त्या माहेरीं जगदंबे ॥५८॥विश्वीं रहस्य आच्छादून । वश्य होऊनि वर्ते कृष्ण । व्रतें होईं सुप्रसन्न । अभीष्टवरदान हें वोपीं ॥५९॥हेतुगर्भिता संबोधनीं । ऐशी स्तविली तिहीं भवानी । हें कळावें तुज म्हणोनी । प्रकट करुनी बोलिलों ॥६०॥मग बैसोनि पृथगासनीं । चित्तें एकाग्रें करूनी । मंत्र जपती मुकुलित नयनीं । जो हा व्याख्यानीं तुज कथिला ॥६१॥महामाये कात्यायनी । अधीश्वरी महायोगिनी । नंदगोपसुतकामिनी । करी भवानी तुज नमो ॥६२॥इति मंत्र समुच्चार्य पूजां चक्रुः कुमरिकाः । एवं मासं व्रतं चेरुः कुमार्यः कृष्णचेतसः ॥५॥ऐसा मंत्र षोडशशतें । जपती परमैकाग्रचित्तें । अर्पण करूनि जगदंबेतें । मग ध्यानानें विसर्जिती ॥६३॥तीर्थप्रसाद पूजाशेष । घेऊनि आचरती व्रतास । कृष्णीं ठेऊनि मानसांस । पूर्णमास यथोक्त ॥६४॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP