मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ७ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ अध्याय ७ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर गोप्यश्च गोपाः किल नंदमुख्या लब्ध्वा पुनः प्रापुरतीव मोदम् ।अहो बतात्यद्भुतमेष रक्षसा बालो निवृत्तिं गमितोऽभ्यगात्पुनः ।हिंस्रः स्वपापेन विहिंसितः खलः साधुः समत्वेन भयाद्विमुच्यते ॥३१॥नंदप्रमुख गोपी गोपाळ । व्रजनिवासी जानपद सकळ । म्हणती काळें उगळूनि केवळ । आम्हांसि बाळ ओपिला ॥५५॥पुत्र न होतां एकचि कष्ट । होऊनि गेलिया दुःख वरिष्ठ । स्वरूप लावण्य गुण चोखट । हृदयस्फोट आठवतां ॥५६॥अहो हें आश्चर्य केवढें । बाळ घेऊनि जो गगना चढे । त्या दुष्टाचें पडलें मढें । बाळ त्यांपुढें वांचलें ॥५७॥म्हणती हें आश्चर्य अद्भुत । बाळका राक्षसें केला घात । तोचि पावला अधःपात । बाळ अक्षत वांचला ॥५८॥एथ आश्चर्य करणें काय । ज्याचें कपट त्यासीच खाय । बाळ निष्कपट वांचला निर्भय । कपटी प्रलय पांवला ॥५९॥हिंस्र स्वपापें पावला मृत्य । खळ दुर्जन जो कंसभृत्य । भला तो भयापासून स्वस्थ । होय निर्मुक्त समत्वें ॥३६०॥भला तो ईश्वरासी मान्य । ईश्वर निवारी त्याचें विघ्न । पुढिलां कपट करी दुर्जन । ईश्वर क्षोभोन तया मारी ॥३१॥ऐशी गोष्टी करिती सकळ । परमाश्चर्यें विस्मयाकुळ । म्हणती रक्षितां त्रैलोक्यपाळ । त्यासी काळ काय करी ॥६२॥किं नस्तपश्चीर्णमधोक्षजार्चनं पूर्तेष्टदत्तमुत भूतसौहृदम् ।यत्संपरेतः पुनरेव बालको दिष्ट्या स्वबंधून्प्रणयन्नुपस्थितः ॥३२॥आम्ही आचरलों पूर्वीं तप । ईश्वराज्ञेचा लावूनि दीप । भूतदया ससाक्षेप । अहिंसारूप जयेचें ॥६३॥कृच्छ्रें तप्तकृच्छ्रें सांतपनें । प्राजापत्यें चांद्रायणें । मासोपवास धारणें पारणें । देहशोषणें हरिप्रीति ॥६४॥वसंतग्रीष्मीं पंचाग्निसेवा । वार्ष शारद साहोनि मघवा । हेमंतशिशिर जळीं राहावा । कीजे केशव प्रीत्यर्थ ॥३६५॥ऐशी तपश्चर्या अपार । तेणें तुष्टला सर्वेश्वर । म्हणोनि मेलाही पुन्हा कुमार । वांचूनि सुखकर जाहला ॥६६॥मनादि इंद्रियें म्हणजे अक्षें । दृश्य जाणती जे प्रत्यक्षें । अक्षजज्ञानासी जो न लक्षे । व्याकरणपक्षें अधोक्षज तो ॥६७॥अक्षजज्ञान ज्याहूनि अध । जो कां परात्पर शुद्ध । म्हणोनि अधोक्षज प्रसिद्ध । जो स्वतःसिद्ध सन्मात्र ॥६८॥तया सर्वगताचें अर्चन । सर्वभूतीं भगवद्भजन । किंवा श्रुतिप्रणित प्रतिमापूजन । केलें संपूर्ण सद्भावें ॥६९॥ सप्तपुरिया द्वादश लिंगें । अविमुक्तस्थानकें अनेगें । तीर्थें क्षेत्रें यात्रामार्गें । सांगोपांगें अर्चिलीं ॥३७०॥दैविकी तांत्रिकमिश्रपूजा । कीं ब्रह्मभावें भजलों द्विजां । कीं इंद्रियदमनें अधोक्षजा । बरवें वोजा तोषविलें ॥७१॥तया सुकृतें चक्रपाणि । पावला बाळाचे निर्वाणीं । मृत्युमुखींचा सोडवूनि । आम्हां परतोनि ओपिला ॥७२॥किंवा जन्मजन्मांतरीं । इष्टापूर्ताचीं सुकृतें पदरीं । होतीं तीं इयें अवसरीं । झालीं सामोरीं विघ्नासी ॥७३॥बापीकूपतडागवनें । देवालयें पुरें पट्टणें । तीर्थें क्षेत्रें संस्थापनें । पूर्त म्हणणें या नांव ॥७४॥नित्य पंचमहायज्ञ । श्रौत स्मार्त सोमचयन । ज्योतिष्टोमादि क्रतु पावन । इष्ट अभिधान ययाचें ॥३७५॥ऐशी इष्टार्पूतसामग्री । सर्व फळली आजि खरी । तेणें बाळक महामारी - । पासूनि करीं वोपिलें ॥७६॥सर्व भूतांचें अंतर । नाहीं दुखविलें अणुमात्र । ऐसें आचरलों व्रतसार । दृढनिर्धारपुरःसर ॥७७॥ऐशिया पुण्याचिया कोटी । जुनाट होत्या म्हणोनि गांठी । उखळूनि मृत्युची वज्रमिठी । बाळ संकटीं वांचविला ॥७८॥इष्टमित्रबंधुस्वजन । त्यांसी अमृताचा सुदिन । दैवें सानुकूळें जाण । केला येऊनि बाळकें ॥७९॥पुण्यास्तव संकट हरलें । अवघें ब्रह्मांड तोषें भरलें । ज्यांहीं पुण्यातें संग्रहिलें । ते दादुले सुरपूज्य ॥३८०॥दृष्ट्वाऽद्भुतानि बहुशो नंदगोपो बृहद्बने । वसुदेववचो भूयो मानयामास विस्मितः ॥३३॥शुक म्हणे गा परीक्षिती । नंद गोकुळीं ऐशा रीती । अनेक अद्भुतें अतर्क्यगति । देखोनि चित्तीं विस्मित ॥८१॥वसुदेवाची भविष्योक्ति । उत्पात कथिले व्रजाप्रति । क्षणाक्षणा ते आठविती । तेणें चित्तीं विस्मित ॥८२॥बहुत अद्भुतें देखिलीं म्हणोनि । ध्वनितें बोलिला बादरायणि । या लागीं सामान्य ही कहाणी । मिथ्या कोणी न म्हणावी ॥८३॥कागरिठासुरांची कथा । इत्यादि कोणी न म्हणिजे वृथा । न कळे मुनीच्या व्याख्यानपंथा । ते ध्वनितार्थामाजि वदे ॥८४॥इतुके तृणावर्त आख्यान । व्यासात्मजें केलें कथन । पावन परीक्षितीचे श्रवण । तद्रसपानें निवाले ॥३८५॥ज्यांसी श्रवणीं श्रद्धा उपजे । ते पावती अभिष्ट जें जें । त्यांसी तारिजें अधोक्षजें । हें जाणिजे फळ एथें ॥८६॥एकनाथकल्पतरू - । माजी गोविंद शाखांकुरु । तेथ चरणारविंदभ्रमर । दयार्णवानुचर अनुवादे ॥८७॥यावरी यशोदेच्या पोटीं । गुरुत्वशंका होती मोठी । ते निरसावया जगजेठी । दावी सृष्टि निज जठरीं ॥८८॥बाळ खेळवितां गोठणीं । जडत्व आलें या कोठूनि । झाली ग्रहाची झडपणी । हा संशय मनीं मातेच्या ॥८९॥तया संशया परिहार । करावया जगदीश्वर । मुखामाजी चराचर । दावी प्रकार तो ऐका ॥३९०॥एकदाऽर्भकमादाय स्वांकमारोप्य भामिनी । प्रस्नुतं पाययामास स्तनं स्नेहपरिप्लुता ॥३४॥तृणावर्त पावल्या नाश । पुढें लोटले कित्येक दिवस । आश्चर्य वर्तलें विशेष । तें नृपास शुक सांगे ॥९१॥कोणेके उत्तमकाळीं । बाळका घेऊनि यशोदा बाळी । स्वांकीं बैसवूनि वेल्हाळी । प्रेमें न्याहाळी श्रीमुख ॥९२॥श्रीमुखचंद्रा अवलोकूनि । विकसितनेत्रकुमुदिनी । चंद्रकांतासारखा स्तनीं । प्रेमपान्हा पाझरे ॥९३॥तया स्नेहाचा कळवळा । जाणती लेंकुरवाळिया अबळा । तयांवांचूनियां ते कळा । नयेचि कुशळां आणितां ॥९४॥चंद्रापासूनि पीयूष झरे । लागती चकोरांचेनि न्याहारे । मनुष्यांसारिखीं विशेष चतुरें । तेथ येरें न सरती ॥३९५॥पोटींचीं बाळकें देखे कमठीं । अमृतपान्हा फुटे दृष्टी । कुशळ प्रयत्नीं होतां कष्टी । नव्हे हे गोष्टी त्यां जोगी ॥९६॥सप्रेमवेधें वेधतां अंगें । लोह चुंबकापाठीं लागे । येरीं फोक मारितां मागें । परी त्या भंग न बैसे कां ॥९७॥मायामोह हा सर्वगत । नैसर्गिक ( असे ) पैं सतत । मायामोहिता जो अनंत । त्याचें कृत्य अघटित ॥९८॥स्तनीं बाळकाचें जीवन । येरां कोरडें मांस जाण । चकोरेंवीण अमृतकण । अणुप्रमाण द्रवेना ॥९९॥परस्परें ऐसें जान । स्निग्ध मोहें अवलोकन । करी प्रेमाचें अवतरण । द्रवे जीवनें तद्रसें ॥४००॥एरव्हीं तेथ कांहींच नाहीं । प्रेमा द्रवे कोरडे ठायीं । ऐशी ज्याची करणी पाही । तो शेषशायी जगदात्मा ॥१॥जो मायेचें मोहन । तोचि यशोदा निजनंदन । खेळवितां पाहे वदन । सप्रेम स्तन पान्हायिलें ॥२॥मग मुखीं घालूनियां स्तन । धणीवर पाहे हरिआनन । सर्वस्वाचें उतरी लोण । होय निमग्न तत्सुखीं ॥३॥पुत्रमोहें संसार जनित । जेणें प्राणि बद्ध होत । तोचि यशोदेसी परमार्थ । स्वानंदभरित हरिमोह ॥४॥दुष्टभावें पूतना पाजी । तयेसी मिळवी सायुज्यीं । प्रेम कवळूनि भजतां आजी । गोष्ट दुजी कोण वदे ॥४०५॥ऐसी आनंदें निर्भर । यशोदा पाजी सप्रेम कुमर । क्षणा क्षणा चुंबी वक्त्र । सर्व शरीर कुरवाळी ॥६॥पीतप्रायस्य जननी सा तस्य रुचिरस्मितम् । मुखं लालयती राजन् जृंभतो ददृशे इदम् ॥३५॥अनंत शुद्ध सुकृतराशि । म्हणोनि परब्रह्म खेळणें तिसीं । सनकादिकांचे मानसीं । जो ध्यानासी ना कळे ॥७॥त्यासि यशोदा पाजी स्तन । प्राशूनि पावला समाधान । म्हणूनि हनुवटी करीं धरून । हास्यवदन करवी तो ॥८॥हस्तें स्पर्शोनि बालकपोल । पाहे सस्मित वदनकमळ । भ्रू व्यंकटा घ्राण सकळ । ओष्ठयुगल सुकुमार ॥९॥आकर्ण नयन विशाळ भाळ । प्रभे लोपती इंद्रनीळ । अलिकुळतेजाचें जावळ । कुटिळ कुंतळ झळकती ॥४१०॥ऐसी सप्रेम मुखवीक्षणीं । यशोदा वेधली तिये क्षणीं । बाळकें जाणोनि अंतःकरणीं । केली करणी ते ऐका ॥११॥यशोदा सादर पाहे मुख । बाळक यशोदे सन्मुख । जांभईमिस्सें पसरी मुख । तेथ कौतुक हें देखे ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP