मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७ वा| श्लोक १ ला अध्याय ७ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ अध्याय ७ वा - श्लोक १ ला श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ला Translation - भाषांतर येन येनावतारेण भगवान् हरिरीश्वरः । करोति कर्णरम्याणि मनोज्ञानि च नः प्रभो ॥१॥योगिवृदचूडामणि । जे जे अवतारीं चक्रपाणि । करी विचित्र चरित्र करणी । जें सर्वां कर्णीं सुखकर ॥४१॥मत्स्यविग्रहें गगनांत । सिंधु उडवूनि गर्ता रिक्त । करूनि वधिला कंबुदैत्य । हें अद्भुत ऐकतां ॥४२॥कमठविग्रहें मंदर धरणें । किंवा धरेतें उद्धरणें । पृष्ठीं अरणी करूनि साहणें । भ्रमघर्षण निर्मधनीं ॥४३॥लक्ष योजनें गिरिवर । गुरुत्वें जैसा वज्रसार । आणि जेणें घेतला भूभार । त्याचा सहोदर वासुकी ॥४४॥दोन्हीं गुरुत्वें विशाळ । सुरासुरांचे द्विभार मेळ । मथितां उलथों पाहे शैल । तैं गोपाळ वरी बैसे ॥४५॥बुडतां उचलोनि कूर्में धरिला । पडतां अधोक्षजें तळीं दडपिला । देवां दैत्यां न वचे मथिला । यालागीं झाला अजितावतार ॥४६॥अमृतासाठीं देवदैत्य । कलहा प्रवर्तले उद्धत । तैं मायारूपें रमाकांत । मोही दैत्य महाळसा ॥४७॥वसुंधरेची करूनि सुरळी । काखे घालूनि हिरण्याक्ष बळी । रिघत होता रसातळीं । तंव वनमाळी धाविन्नला ॥४८॥अचाट दैत्यदेह एवढें । मुसांडी थडकोनि मोडी हाडें । ब्रह्मांड सगळें धरिलें दाढें । हीं कैवाडें अघटितें ॥४९॥पर्वतपात शस्त्रघात । सिंधुमज्जनादि आघात । गजाग्निपन्नगकृत्याकृत्य । श्रीअनंत निवारी ॥५०॥नराकृति सर्व तनु । वरी विकराल सिंहवदनु । अचेतापोटीं सचेतनु । भक्षरक्षण नरसिंह ॥५१॥वरें मृत्युचि नाहीं ज्यासी । ते रक्षूनि वरदोक्तीसी । अमृतचि मृत्युवेषीं । हिरण्यकशिपूसी जो ओपी ॥५२॥व्रतबंधमात्रशब्दब्रह्म । आचारादि विध्युक्त नेम । टाकूनि बळीचें साम्राज्यसद्म । कर्मब्रह्म उपपादी ॥५३॥एथ ऋषि अठ्यायशीं सहस्र । पुरोधसा अग्रणी शुक्र । वक्तृत्वचाडें पाहती वक्त्र । कोणी अक्षर न वदती ॥५४॥श्रुतिप्रतिपाद्य स्वधर्मरति । द्योतूनि बळीसि घातली भ्रांति । दान मागोनि त्रिपादक्षिति । घाली त्याप्रति पाताळीं ॥५५॥परंतु विश्वासोनि वचनीं । बळि प्रवर्तला सर्वस्वदानीं । तया ऋणें चक्रपाणि । द्वाररक्षणीं गुंतला ॥५६॥याचिता झाला बटु वामन । मोजितां त्रिविक्रम आपण । वाढोनि मोजिलें त्रिभुवन । हें विंदान हरिजोगें ॥५७॥परशुपाणि ब्राह्मणवेष । केला क्षत्रियांचा निर्वंश । त्यांच्या रुधिरतर्पणें तोष । पितृमनुष्यदेवऋषि ॥५८॥त्रैलोक्य जिंकिलें रावणें । त्या मारिजे एकाचि बाणें । कीं सिंधु बांधोनि पाषाणें । सहकपिगण उतरिजे ॥५९॥श्रुतिस्वधर्मप्रतिपादना - । साठीं स्वराज्य कीं निजांगना । पीयूषप्राय ते समान वमना । करणें कोणा हें जोगें ॥६०॥ऐसे अवतार अनंत । धरी स्वलीला श्रीभगवंत । श्रवणमंगल जें चरित । आनंदभरित मन करी ॥६१॥एथ गर्भाचें कर्षण । किंवा नभोक्तिभाषण । पूर्वरूपप्रदर्शन । व्रजाभिगमन गुप्तत्वें ॥६२॥द्विभाग यमुना अगाध झाली । कीं कुमारी गगना गेली । प्रत्यक्ष पूतना शोषिली । हे कीर्ति ऐकिली अद्भुत ॥६३॥ऐशा अनंत अवतारकीर्ति । ज्यांचेनि श्रवणें मंगलप्राप्ति । तापत्रयांची निवृत्ति । मनोविश्रांतिकारका ॥६४॥मायानियंता परमेश्वर । तुमच्या मुखें तच्चरित्र । श्रवण करितां अभ्यंतर । हर्षनिर्भर स्वामिया ॥६५॥ऐसें तुमचेनि मुखें श्रुत । झालें श्रीमद्भागवत । आतां श्रीकृष्णाचें तोकचरित । प्रिय अत्यंत मज स्वामी ॥६६॥ज्याचे श्रवणीं पापहानि । सहज पुण्य कोण गणी । ब्रह्मादि वैभवें खेळणीं । जोडे निशाणीं अपवर्गी ॥६७॥आजन्म आमुची क्षात्रवृत्ति । भगवद्गुणीं कैंची वृत्ति । दुर्लभ बहुतां जन्मांतीं । हे विश्रांति तव कृपें ॥६८॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP