मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|श्रीगुरुबोध ग्रंथ| सप्तम प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथानुक्रमणिका प्रथम प्रकरण द्वितीय प्रकरण तृतीय प्रकरण चतुर्थ प्रकरण पंचम प्रकरण षष्ठ प्रकरण सप्तम प्रकरण अष्टम प्रकरण नवम प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ - सप्तम प्रकरण श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज. Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर सप्तम प्रकरणं प्रारंभः Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशायनमः ॥निवांत जागीं बैसावें । लक्ष अंतरी ठेवावें । उठल्या वृत्तितें लक्षावें । द्रष्टा होउनी ॥१॥वृति उठते बैसते । आपुली स्थिति निश्चल दिसते । हें अनुभवावें निरुतें । मागें राहोनि ॥२॥ज्ञानस्वरूप आपण । सर्वांच्या मागें निश्चल पूर्ण । आहे ऐसी आपुली खूण । दृढ धरावी ॥३॥पंचभूतांतें नातळे । आपण आनंदमय ऐसें कळे । अनुभव सूर्य प्रगटतां पळे । दृश्यतिमिर ॥४॥आपण देह नोहे तत्वतां । सकळ मनोवृत्तीतें पाहतां । जें दिसे त्यातें जाणतां । आहेच आहे ॥५॥देह तों नाशे स्वभावें । तो मी कैसेनि व्हावें । न नाशे तें जाणावें । स्वरूप माझें ॥६॥घरामध्यें जो राहता । गह्र तो नोहे तत्वतां । तैसा देह मी नव्हे सर्वथा । असंगरूपें ॥७॥चित्त बुद्धि माझी म्हणे । वेगळा असे मी पूर्णपणें । मज कांहींच नाहीं लागणें । ज्ञानदीपा ॥८॥जैसा दीप पेटविला । एकाच जागीं असे भला । त्याच्या प्रकाशें व्यवहार कला । सर्व करिती ॥९॥त्याच्या उजेडें न घडे परी । तो कोणासि आज्ञा न करी । ठेविला तेथें निर्धारीं । प्रकाशरूप ॥१०॥तैसा हृदयामध्यें मी असें । असूनि कोणासि न दिसे । मजमाजीं विकार नसे । देहेंद्रियांचा ॥११॥माझ्या सत्तेनें खेळतीं । इंद्रियें विषयीं निश्चितीं । तैशाचपरी आनंद भोगिती । माझ्या योगें ॥१२॥सत्ता प्रकाश सुख । तेंचि माझें स्वरूप चोकिह । जेथें अंधकाराचें मुख । दिसों शकेना ॥१३॥माझ्या सत्तें इंद्रियें हालतीं । माझ्या सत्तें वाचा बोलती । मी आहें म्हणूनि चालती । सर्व व्यवहार ॥१४॥जडभागातें प्रकाशीं । एकचि मी अविनाशी । माझ्या आहेपणें जगासी । आहेपण ॥१५॥चित्त प्रसन्न करावें । ऐसियापरी अभ्यासावें । पदोपदीं स्मरत जावें । सद्गुरुनाथा ॥१६॥सच्चिदानंद तिन्ही गुण । सांगतों त्याचें लक्षण । एकाग्रचित्तेंकरूनि जाण । ऐक बापा ॥१७॥मी एक आहें ऐसें आपणासि वाटताहे । तेचि आहेपणाची खूण पाहें । दृढ धरीं ॥१८॥आहे म्हणोनि जें कळणें । त्यासचि ज्ञान ऐसें म्हणणें । चित् ऐशा दुसरिया खुणे । ओळख तूं ॥१९॥जेथें सुख वाटे चित्ता । तो आनंदगुण तत्वतां । कल्पनेवीण आपण उरतां । ब्रह्मानंद ॥२०॥ऐसा आपण सच्चिदानंद । सर्व आनंदाचा कंद । जेथें अविद्येचा बंद । तुटोनि जाय ॥२१॥सच्चिदानंदावांचूनि कांहीं । जगीं एकही पदार्थ नाहीं । सुखदुःखाची कल्पना पाहीं । जीवें केली ॥२२॥हा सर्व कल्पनेचा भ्रम । वृत्तियोगें पावसी श्रम । कल्पना निरसतां आनंदधाम । भोगिसी तूं ॥२३॥ती कल्पना निरसाया । अभ्यास पाहिजे शिष्यराया । पुनः पुनः या उपाया । सांगतों मी ॥२४॥वैराग्य आणि अभ्यास । दोन साधनें पाहिजे यास । हीं साधितां ज्ञान - उदयास । वेळ नलगे ॥२५॥वैराग्य पाहिजे अंतरीं । बाहेरीचें काय करी । जें देखतां ज्ञानी नरीं । हांसिजे तें ॥२६॥घरदार सोडूनि गेला । रानीं जाऊनि बैसला । तरी वृत्तींचा गलबला । सुटेचिना ॥२७॥कमरेसी दोर बांधिलें । पोराबाळांसी सोडिलें । तेणें खरें वैराग्य आलें । नाहीं हातां ॥२८॥प्रपंच साधूनि परमार्थ करणें । याचीं नव्हती हीं लक्षणें । प्रपंचपरमार्थाच्या खुणे । विरळा जाणती ॥२९॥तोचि ह्मणावा योगेश्वर । जग तोचि जगदीश्वर । अनुभव ज्याचा चराचर । आपण झाला ॥३०॥तो जो जो पदार्थ पाहे । तो तो अनुभवें आपण आहे । ऐसी हे पूर्ण स्थिति लाहे । सद्गुरुबोधें ॥३१॥यास्तव अंतरीं वैराग्य धरीं । प्रपंच यथासांग करीं । ज्ञान - सिंहा प्रपंच - करी । काय करील ॥३२॥ऐसा अनुभव आनंदाचा । यासचि श्रीराम ह्मणती साचा । ज्यापुढें वायुसुताचा । खेळ चाले ॥३३॥त्या आपुल्या भक्ता पाहुनी । श्रीरामा आनंद होय मनीं । भक्तही स्वामिचरणीं । समरसोनि जाय ॥३४॥देवभक्त एक होतां । आनंद ओसंडे तत्वतां । ऊर्ध्वपंथें वाढों लागतां । ब्रह्मांड भेदे ॥३५॥यापुढें काय बोलावें । तुझें तुवां अनुभवावें । जें बोलतां स्वभावें । बोलों नेदी ॥३६॥इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्री भगवंत । हृदयीं भेटे ॥३७॥इति श्रीगुरुबोधे सप्तम प्रकरणं संपूर्णम् ॥७॥श्रीराम॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP