मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीकृष्ण - कथामृत| सतरावा सर्ग श्रीकृष्ण - कथामृत प्रस्तावना श्री सद्गुरु प्रार्थना अनुक्रमणिका पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पांचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - सतरावा सर्ग संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते. Tags : ganudaskrishnamarathiकृष्णगणुदासमराठी सतरावा सर्ग Translation - भाषांतर ( समरप्रसंग ) महाभीषणं ताण्डवं संविधित्सुम् ज्वलल्लोचनं कर्कशं गर्जयन्तम् महीं शीर्णशैलां भृशं कम्पयन्तम् प्रभुं भीमरूपं हरं तं नमामि ॥१॥कृष्णा त्वदीय महिला विलसे अपारत्याचा कधीं जडमती न पवेल पारआलों तटा - निकट मी गुरूच्या कृपेनेंआतां कृतार्थ करणें मज चक्रपाणें ॥२॥काय तरी हे रणभूमीवरकरिती प्रलया ताण्डव सागरलाटा भीषण उठती ना यासजल्या सेना युद्ध कराया ॥३॥रथी महारथ अतिरथ तैसेवीरश्रीचे वल्लभ जैसेपराक्रमाचे प्रदीप्त पर्वतमारुं मरूं वा घृति ही निश्चित ॥४॥कल्पघनासम कभिन्न काळे महाकाय गज औत मिळले घोडदळाची पा य द ळा चीकुणी करावी गणती साची ॥५॥झेपावति की अग्निज्वालाकालीच्या वा जिभा कराला तळपाव्या वा विजा तशी तींदिसती खङ्गें वीरा हातीं ॥६॥मुकुट भटांचे कळस रथांचे कवचें गजगण्डांचींअशीं चमकती कीं भासतसे रचिनें त्यजिली प्राची ॥७॥भीष्म पितामह कुरू - सेनानीयद्रथ मंडित सित छत्रांनीं द्रोण कर्ण कृप अश्वत्थामा कौरव खल तो शकुनी मामा ॥८॥यु धि ष्ठि रा नें द्रु प द सु ता सीनेमियला अधिपति सेनेसीभीम सात्यकी दो पक्षावर उणें वारण्या पार्थ धनुर्धर ॥९॥संमुख झाल्या परस्परांनासमरोत्सुक त्या उभयहि सेनापांचजन्य फुंकीत रमाधवघोषें त्या बहु भ्याले कौरव ॥१०॥पांडव वाजविती निज शंखाघोर रणाचा गर्जे डंकाकुरुसैन्यें ही शिंगतुतारीनादविती दम घेउन भारी ॥११॥प्रतिपक्षावर वार कराया वीर भुजा स्फुरतातीहिसके देती अश्व लगामा चरणें उकरित माती ॥१२॥वी पाहती वाट खुणेसीत्यजिलें धर्मे तो स्वरथासीचालत येई कुरू सैन्यातेंबघती सारे विस्मित चित्तें ॥१३॥विकार नाना विचार नानाबोध न होई इतर जनांनांपरी जाणिलें जगन्निवासें पार्थ - सारथी प्रसन्न हासें ॥१४॥भीष्म पदावर ठेवुन माथाम्हणे युधिष्ठिर जोडून हातांताता मजसी क्षमा असावी गंहिवरला तों वीर तपस्वी ॥१५॥हुंगुनिया शिर पंडुसुताचेंवदे पितामह वत्सल वाचेंनीतीचें तूं वत्सा भूषण ‘ विजयीभव ’ जा सुखें करी रण ॥१६॥द्रोणाचार्या वंदन करितां प्रसन्न वदले तेही“ शिष्यवरा कर्तव्य सुखें कर रोष मनीं मम नाहीं ” ॥१७॥बसे रथीं येऊन युधिष्ठिरशिंग खुणेचें झालें सत्वर त्वेषानें मग भिडल्या सेनाप्रेरी माधव विजय - ह्यांना ॥१८॥तोंड लागलें घोर रणासीलढती योद्धे समरावेशींगदा तोमरें परीघ शस्त्र खणखणतीं, सुटली बहु असें ॥१९॥अमुं वधिष्ये, अमुं हनिष्येदिसती मंडल सतत धनुष्येंबाणांचें छत होत नभासीभंगवें न तें रविकिरणासी ॥२०॥फुटती कवचें जणुं का हंड्याउडती रक्तांच्या चिळकंड्याकोसळताती वीर महीवरझंझावातें जैसे तरुवर ॥२१॥प्रातःकालीं संध्यावंदन करुनी जे रण जुंपेंसूर्य मावळे तों चाले तें भूमंडळ थरकापें ॥२२॥एक दिनीं कुरुराजवचानींचढले कोपा भीष्म चिडोनीदिसे वृद्ध तो, पर सैन्यासीजसा मतंगज केळवनासी ॥२३॥नित - मंडल - धनु वर्षतसे शर शवें साचली सर्व महीवर तदा हरीनें रथ विजयाचा भीष्मावर घातियला साचा ॥२४॥आज न ये परि उपयोगा तेंजर्जर हो अर्जुन शरधातेंरक्तें फुलला तो पळसासमपडला मूर्च्छित होउनिया श्रम ॥२५॥मागें पाही पदनतवत्सलरथीं धनंजय विकीर्ण कुंतलभिजला पुरता निजरूधिराहींहृदय हरीचें विदीर्ण होई ॥२६॥सावध होत न बघतांअर्जुन आला क्रोध हरीतें निज प्रतिज्ञा विसरून घेई चक्रसुदर्शन हातें ॥२७॥“ प्राण तुझा मी घेतों भीष्मासहाय्य होसी कसा अधर्मावधिलासी मम भक्त सखा हाखल कपट्यांच्या गुंतुन मोहा ॥२८॥वाचिव पाहूं हे शठ कौरव ”धावे गर्जुन असे रमाधवलाल जाहले क्रोधें लोचनफिरे गरगरा करी सुदर्शन ॥२९॥पाहुन ऐसा रथांगपाणी भीष्माच्या ये नयना पाणीहात जोडिले त्यजुन चप निजम्हणे “ मार ये मला अधोक्षज ॥३०॥भक्त तुला प्रिय तुझ्याहुनी हीहे दावियलें मी या ठायींकारण झालों तव कीर्तीसीकाय हवें याहुन महीसीं ॥३१॥तुझ्या करानें मरण येत हें भाग्य थोर बहु माझेंये प्रभु चालिव तुझें सुदर्शन कारण मोक्ष सुखा जें ॥३२॥हर्षित भीष्में वाकविलें शिरसावध झाला तोच वीरवरबघुन सुदर्शन करीं हरीचेउंचबळे मन भक्तवराचें ॥३३॥दासासाठीं काय दयाळाबाध आणिसी निजवचनालाभूषण तुज परि दूषण आम्हांहो मागं हो मेघश्यामा ॥३४॥मिठी घालुन पदकमलासीकरी याचना भक्त हरीसीपुनः सारथी हो यदुरायातुझ्या कृपें मी अजय रणीं या ॥३५॥शतगुण झाली उरीं धडाडी प्रखर तीक्ष्ण शर अविरत सोडीसतेज वज्रें जसा पुरंदरध्वज भीष्माचां पडे महीवर ॥३६॥पांडव सेना विजयी झाली सरले कौरव मागेंकसा पराभव होइल सांगा करिं धरतां श्रीरंगें ॥३७॥चढे विक्रमा प्रतिदिन अर्जुनयुद्ध वृकोदर करी विलक्षणस्रुवे म्हणा त्याचिया भुजांनानिवडुन देई हवी कुरूंना ॥३८॥सुयोधनाचे अनेक भाऊतयें घातिले काळां खाऊंपद घातां खालींच तयाच्याहोत चिंधड्या किती भटांच्या ॥३९॥नवव्या दिवशीं अराक्रमाचीशर्थ जाहली पंडुसुतांचीयेत अवकळा कुरुसेनेलावदे सुयोधन मग भीष्माला ॥४०॥“ तुम्ही, अजोबा ! ज्या सेनेचेनायक व्हावें दैन्य तियेचें जयें जिंकिलें भार्गवरामाभाता तो कां होत रिकामा ॥४१॥अर्ध्यावरती सैन्य निमें ममअजुन धरुं मी किती वदा दमवाढतसे यश मम शत्रूंचेबल सरले कां भगद्भुजांचें ॥४२॥वाटतसे मज मनापासुनी युद्ध न करितां तुम्ही पंडुसुतांचें प्रेम आपणा नावडता आहे मी ॥४३॥व्यर्थ ठेविला भाव तुम्हावरमित्र खरा मम कर्ण धनुर्धरतुमचे ठायीं तो जर होता कधींच मत्प्रिय साधुन देता ॥४४॥विषण्ण झालें भीष्म मनांतेंदुर्जनसेवा विफला होते वेदती धरिता गंधर्वानेंकाय लाविले दिवे वृषाने ॥४५॥गोग्रहणाच्या समयीं राजाकामा ये का जिवलग तूझाकितिदां कथिलें तुजसी मी कींअजिंक्य अर्जुन असे त्रिकोकीं ॥४६॥परमात्मा सारथी तयाचाकोण पुढें मग टिकेल साचातयें दीधलें अनला खांडवस्वयें विरोधी असुनी वासव ॥४७॥चुकार झालों मी न परंतूतरी वाहसी मूढा किंतू दुराग्रही मतिमंदा पुढतींज्ञानें सर्वहि परि लटपटती ॥४८॥दैवकुणाला टळे, प्रतिज्ञा ऐक नृपा मम आतां अपांडवी भू करिन उद्यां वा भोगिन मी तनुपाता ॥४९॥वृत्त सर्व हें गुप्तचरांनीयुधिष्ठिरा कथियलें त्वरेनींअनाथ झालों गमे तयासीशोकाकुल मग वदे हरीसी ॥५०॥“ तूंच एक हरि आशा माझीपार आटलें जीवन आजीउद्यां बरी गत नच विजयाचीसर्वनाश मम हृदया जाची ” ॥५१॥परी शांतवन करी रमावर “ धीर न सोडी असा युधिष्ठिररक्षण करण्या पंडुसुतांचेंसडे करिन मी निजरक्ताचे ॥५२॥सुलभ इंद्र यम जिंकायासेअजिंक्य परि गांगेय रणासीतरी प्रतिज्ञा पितामहाची अन्यार्थे मी घडविन साची ॥५३॥थोरवंद्य हा सुत गंगेचा साथी परि दुष्टासी शठ दुर्योधन दुर्जन यानें घातियला पाठीसी ॥५४॥पाप वाढवी पुण्यात्मा हेअतां उपेक्षा उचिता नोहेपापा कारण, पुण्य नसे तेंपुण्यास्तव ना पातक होतें ॥५५॥तप पावन वस्तुतः सुमंगल जईं वाढवी दैत्यांचें बलभयद तेंच मग विनाश्य होतेंभीष्म असे हा तसाच येथें ” ॥५६॥येत रमावर भीष्म - निवासीरक्षकास पटवून खुणेसीसवें घेउनी पांचाली तेम्हणे “ करी वंदन वडिलातें ” ॥५७॥नयन धरोनी अर्धोन्मीलितमृगाजिनावरतीं ध्यान स्थितवृद्ध असे तो प्रसन्नचित्तेंअवलोकी हृदयस्थ हरीतें ॥५८॥चंद्रासम त्या महात्मतेजेंशिबिरहि मंगल धवल विराजेसती दौपदी जवळी येउनकरी तयासी सकंप वंदन ॥५९॥कंकण - रव ऐकुन भीष्में दिधला सहज शुभाशीस्थिर राहो सौभाग्य मुली तव भोग सदासुखराशी ॥६०॥वदे सती पावेन कधीं मीवर हा या, वा पुढच्या जन्मीं ” भीष्म पाहती उघडुन डोळेम्हणती “ या जन्मांतच वाळे ” ॥६१॥त्वरित मिळे फळ संतवचांचेंस्वार्थ शिवे ना मना जयांचे“ एकटी न आली मुली तूंकुठें सखा तव खगपतिकेतू ॥६२॥कृपा जयाची सदा तुम्हांवरजशी पिलावर घाली पांखर मती जयाची होउन नौकातुम्हास तारी टाळून धोका ॥६३॥उभा असे तो ऐकुन दारींविनवी मग “ ये आंत मुरारीकरीत होतों ज्याचें चिंतनधन्य मला तें झाले दर्शन ” ॥६४॥चरणीं भावें ठेवुन मस्तक वदती “ हे श्रीमूर्तिविराटरूपें मागेचीं तूं हरिली जीवनशक्ति ॥६५॥लीला नट तूं करिशी कौतुकमीही मोक्षा असे समुत्सुकपुढें करी रे रणीं शिखंडी विजया हातीं मम तनु खंडी ॥६६॥त्यक्तशस्त्र शरणागत नारी भीतावर मी कर न उगारीपरी अर्जुनाविण दुसर्याचेशर देहीं नच शिरावयाचे ॥६७॥कृपा जयावर करी पिनाकीईश्वर तुजसम यद्रथ हाकीनिवातकवचा वधिलें ज्यानें मज मारावें त्या कृष्णाने ॥६८॥देई भीष्मा दृढ आलिंगनप्रेम भरें वदले यदुनंदनपावनकीर्ती तव अजरामरउद्धरील नित जनांस भूवर ॥६९॥दुसरे दिवशीं रण - भूमीवर युद्ध होत घनघोर कृतांत काळासम भासे तो क्रुद्ध भीश्म रणधीर ॥७०॥अपूर्व शरलागह्व तें त्यांचेंचक्राकृति धनु सदैव नाचेबाण कधी घे केव्हां जोडीकदा कळेना रिपुवर सोडी ॥७१॥प्रवाह वाहे सतत शरांचाशक्य नसे प्रतिकार तयाचाअर्जुन हो मग पुढें त्वरेंसीप्रथम शरा टाकीत पदासी ॥७२॥शिरीं बाण फेकीत पितामहतोंच शिखंडी येतपुढें अहआवरिला कर बघता त्यासीवर्षे अर्जुन खरशरराशी ॥७३॥विह्वल होउन त्या आघातेंकोसळला कीं भीष्म महीतेंथांबवून परि जयघोषासीदुःखित पांडव नमिती त्यासी ॥७४॥तीक्ष्ण शरांच्या पर्यंकासी स्थितधी शांत असे तोकरीत अर्जुन उसें शरांचें मुनिगण भीष्मा स्तवितो ॥७५॥द्रोण जाहले मग सेनानीघोर मांडिलें युद्ध तयांनीतिसरे दिवशीं चक्रव्यूहामाम्डुन म्हणती भेद्य नसे हा ॥७६॥अभिमन्यू परि हरिचा भाचाकरी लीलया भेद तयाचा जसा सतांचा बोल अनुभवीअल्पहि संशयगणास उडवी ॥७७॥सान वयीं तो वीर धनुर्धर कोमल तनु मदनासम सुंदरअसह्य झाला तरी कुरुंतेअवलंबुन नच तेज वयातें ॥७८॥अंती मिळुनी सहा जणांनींवधिला अर्जुनसुत अधमांनीदेत जयद्रथ लाथ शवासींचीड तयानें ये विजयासी ॥७९॥अधमाधम खल रावण साचाअपमान न तरि होत शवाचापवित्र माझा बाळ सुकोमलपाय लावितो तया कसा खल ॥८०॥अपार होउन शोक म्हणे तो उद्यां प्रदोषापूर्वींवधिन जयद्रथ नातरि भक्षिन अग्निकाष्ठ दुर्दैवी ॥८१॥जयद्रथासी रक्षायातेंद्रोण कर्ण कृप कौरव होतेंपरी हरीनें अपूर्व युक्तींविफला केली रिपुजनशक्ति ॥८२॥मरे दुःशलाधव, कुरूराजाम्हणे “ अंत कां बघतां माझाद्रोणा तुम्हा इष्ट मनानीमला वधावें पंडुसुतांनी ” ॥८३॥“ दुर्दैवें तव फिरली बुद्धिपाप कधें कां जाइल सिद्धी द्रोण म्हणे मी आज तुझ्यास्तव लढेन रात्रीं राहिन ना लव ॥८४॥अंधारीं बहु घोर निशा तीद्रोण पणा लावी निजशक्तिकृष्ण वदे मग घटोत्कचासीविशेष बल दैत्यास निशेंसी ॥८५॥दाखिव पाहूं तुझा पराक्रम मायावी अनिवारजर्जर व्हावे कौरव सारे तुज वरतीं मम भार ॥८६॥माता चित्तीं स्मरुन हिंडिंबाभीमात्मज निर्मीत अचंबागुप्तपणानें कुरु सैन्यासीओती वरुनी पर्वत राशी ॥८७॥उलथुन पाडी गजघोड्यांना भिरकावी रथ लाथ रथींनाकाड्यांसम मोडीत धनुष्येंकाय करावें इथें मनुष्यें ॥८८॥व्याकुळ झाली कैरवसेना उपाय कांहीं कुणा सुचेना कर्णासी मग म्हणे सुयोधनतूंच वाचवी आतां यांतुन ॥८९॥अमोघ शक्ती वासवदत्ताबाळगिशी तूं अर्जुनघातातीच टाक या घटोत्कचावरभाग न हा मेल्याविण सत्वर ॥९०॥अधिरथनंदन मग निरूपायें जपुन ठेविली शक्तिमंत्रुन टाकी निशाचरावर धूप पडे त्या घातीं ॥९१॥म्हणे मुरारी हर्षित चित्तेंआतां भय ना भक्तवरातेंकर्ण खरा हा आजच मेलाधीर जयाचा फार खलला ॥९२॥उभ्या उभ्याची रणांत घेती वीर निशीं त्या लव विश्रांतीचंद्रकला उगवता प्रभातींरणार्नवा ये पुनरपि भरती ॥९३॥अंधसुतानें कोपविलेलेद्रोण तदा दावानल झालेजों जों पुढती येइल कोणीजीर्ण तरूसा जात जळोनी ॥९४॥चाड न उरली नयनीतीचीआचार्या त्या समयीं साचीअस्त्रें नव्हती ज्ञात जयांनाटाकुन अस्त्रें वधिती त्यांना ॥९५॥दीन असे घायाळ भीत हा हें न पाहिलें त्यांनींसर्व सारखे मरणा जैसे, लढती क्रूरपणानीं ॥९६॥म्हणे हरी “ दुर्धर म्हाताराशोक हाच या वरी उतारा ‘ मेला माझा पुत्र, असे जर कळेल या हतबल होई तर ” ॥९७॥गज नावानें अश्वत्थामात्यास वधाया कथिलें भीमा आणि करविली थोर हकाटीधर्मा सांगे मग जगजेठी ॥९८॥‘ खराच मेला स्तु का माझा ’द्रोण असंशय पुसेल राजामेला म्हणुनी सांग तयातेंधर्म म्हणे हें शक्य न मातें ॥९९॥आजवरी मम अनृतां वाणी शिवली नाही रथांगपाणीजीभ कशी मग अतां विटाळूंतीहि गुरू वधण्यास दयाळू ॥१००॥“ सूक्ष्म रूप सत्याचे धर्मा कसें कळेंना तूंतेंसूज्ञ शोधिती सदैव अंतर मूर्ख भुले कवचातें ॥१०१॥जेणें साधे जीवांचें हितम्हणती ज्ञाते सत्य तयाप्रतया मायामय विश्वाठायींवस्तुस्थितिचें महत्व कायी ॥१०२॥गो वि प्रां सीं र क्षा या तेंवदतां कांहीं अनृत न होतेंसर्वनाश हा ओढवल्यावर असत्यतेचा दोष न तिळभर ॥१०३॥खोटें वदतां स्वार्थ घडायादूषण त्यासी लागत रायाखल नाशास्तव युद्ध असे हेंअन्यायी हा दोर्णहि अहे ॥१०४॥सत्य बोलणें हा मम बाणाया गर्वें नाशिसी प्रजांनाकीर्ती व्हावी स्वार्थ न कां हा ? युधिष्ठिरा त्यज या दुर्मोहा ॥१०५॥“ बरें ” म्हणोनी कथी गुरूसी “ अश्वत्थामा मेला “ कुंजर वा नर हें न कळे परि ” राजा हळुच म्हणाला ॥१०६॥आत्मवंचना येथ परंतुतीच जाहली दोषा हेतूअधर फिरे जो रथ राजाचातोच टेकला महीस साचा ॥१०७॥पुत्रशोक जाहला गुरूसीगात्रें पडली ढिली विशेषींद्रुपदसुतानें खङ्गें सत्वरवृद्धाचें त्या उडवियलें शिर ॥१०८॥धृष्टद्युम्ना बहु धिःकारुनदुःख गुरूचे करीत अर्जुनशांतविले श्री हरिनें त्यासीहाहा उडली कुरू सैन्यासी ॥१०९॥कर्णा करुनी सेनानायकएक खरा तूं मम हितचिंतकम्हणे अंधसुत त्या दोघांनींअहितचि मम चिंतिलें मनानी ॥११०॥“ राजा चिंता सोड ” म्हणे वृष “ पहा वीरता माझीकृष्णार्जुन जरि सहस्र आले वधिन तयां शरराजीं ॥१११॥सुयोधनें मग करूनी विनंतीकर्णा दिधला शल्य सारथीभिडला येउन वेगें विजयाम्हणे क्षणीं मी मिळवीन जया ॥११२॥तुल्यबली ते वीर परस्पर लढतां जमले व्योमीं सुरवर टणत्कार ऐकुन धनूंचेस्तंभित झाले दिग्गज साचे ॥११३॥कर्ण भयंकर सर्पमुखीं शरसोडी लक्षुन विजयाचें उरे पार्थसारथी कुशल न सीमाबसवुन अश्वा चुकवी नेमा ॥११४॥कर्ण चिडे या पराभवानेंतों रथचक्रा गिळिलें भूनेंअस्त्रांचा ना आठव होई शल्य तयांतुन टोचित राही ॥११५॥चाक उचलण्या वंची स्वबला थांब म्हणे कृष्णासीनिःशस्त्रावर बाण न टाकी रक्षी निज धर्मासी ॥११६॥कृष्ण म्हणे मग त्या उपहासुन “ धर्म आज तुज सुचला कोठुनसुप्त पांडवां जतु - सदनासींजाळाया जो सहाय्य होसी ॥११७॥धर्म न सुचला कपटद्यूतींसभेंत नेली बळे सती तीविटंबिता तिज खल दुःशासननीचा दिधलें तूं प्रोत्साहन ॥११८॥अभिमन्यूचा मम बाळाचा घात मिळुन तूं केला साचाअशस्त्र होता तो वधतांनाधर्म तदा कां वच सुचला ना ? ॥११९॥धर्म आठवे नीचा व्यसनींठोकरिलें ज्या पूर्वीं चरणीं धर्म राखितों सदैव आम्हीतूंही बडबड कर न रिकामी ॥१२०॥सोड अर्जुना बाण तीव्रतम अवसर हा साधावादुष्टांचा वध करण्यासाठीं संशय कधि न धरावा ” ॥१२१॥गांडीवाचा गुण आकर्णाओढुन सोडी शर वर कर्णामस्तक तुटुनी पडलें भूवरदुःखें लपवी वदन दिवाकर ॥१२२॥पांडव सेना जयजयकारेंगर्जे अंबर घुमलें सारेंअनाथ झाले अगदीं कौरवदुर्योधन परि निराश ना लव ॥१२३॥शल्या नेमी तो सेनेवर अमर असें कीं अशा दुर्धरद्रोण भीष्म वृष हे हतविक्रमशल्य तिथें करणार पराक्रम ॥१२४॥धर्मा हातें शल्य निमालाखल दुःशासन भीमें वधिलाहात माखिले तद्रक्तानींद्रुपदसुतेची घाली वेणी ॥१२५॥सरोवरीं लपला दुर्योधन बाहुन त्या बाहेरीम्हणे वृकोदर लाव प्रणासी दुष्टा शक्ती सारी ॥१२६॥पाहूं जिंकित कोण अतां पणभव्य गदा मम फांसा भीषण द्यूत युद्ध हें चल या ठायींदुर्योधन उचलीत गदाही ॥१२७॥हलधर तो ये तेथें अवचितबघे शिष्य निज युद्धा उद्यतम्हणे पुढें मम युद्ध करावेनियमकुणीही नच मोडावे ॥१२८॥सतताभ्यासें चपल सुयोधनलोखंडाचा पुतळा कल्पुनभीम त्या सवें बारा वर्षेगदायुद्ध तो करी अमर्षें ॥१२९॥पुष्ट भीम तो बलिष्ठ देहींघावाची त्या क्षिती न कांहींसरती फिरती घेती मंडलघाव हाणिती लावुनियां बळ ॥१३०॥परस्परा मारिती तडाकाजसे मतंगज घेती धडकापर्वत जणु पंख न तुटलेलस्थल कलहासी प्रवृत्त झाले ॥१३१॥अग्निज्वाला उठे गदांतुनवीज जशी का घन मेघांतुनगर्जे भीषण कोसळती गिरिअचला भूमी गडबडली तरि ॥१३२॥पाहुनियां श्रीकृष्णें कोणी आटोपत ना कवणाअंक आपुलो थोपटुनी लव भीमा दिधलें स्मरणा ॥१३३॥जाणुन तें मग भीमें, भारी -घाव घातिला दुष्ट शरीरींउसळी मारी तों मांड्यावरबसला झाला चुरा खरोखर ॥१३४॥भूवर दुर्योधन कोसळलाराग येत परि बलरामालामांड्या फोडिन अशी प्रतिज्ञा सांगुन माधव निववी सुज्ञा ॥१३५॥द्रोण - सुताच्या अधम कृतींतुनवांचवीत निजभक्त दयाघनपांडव झाले विजयी समरींसहर्ष आले परतुन शिबिरीं ॥१३६॥वदे अर्जुना श्री मधुसूदन“ उतर खालतीं प्रथम रथांतुनवानरराया जा स्वस्थानीं ”पार्थ वचें या विस्मय मानी ॥१३७॥भुभुः कार करूनी कपि गेला त्यजिला रथ भगवंतें असंभाव्य भडकल्या तोंच की ज्वाला स्पंदन भंवते ॥१३८॥क्षणांत झाले भस्म तयाचेंभयें च्कित मन सकल जनांचेंधर्म्रा अतिनम्रपणेंसीपुसे “ काय हें वद हृषिकेशी ॥१३९॥गुरू द्रोण नी भीष्म पितामह यांचें अस्त्रे प्रदीप्त दुःसहप्रतिकार न कीं उचित तयांचा झाला असता नाश जगाचा ॥१४०॥अप्रतिकारें अर्जुन - जीविततृणसम जळुनी जातें निश्चितपरि हनुमंतें तसेंच मीहीआवरिलीं ती आत्मबलाहीं ॥१४१॥ युद्ध संपता जाई कपिवरम्हणुन अर्जुना प्रथम महीवर उतराया मी कथिलें आजीपार जाहली कार्ये माझी ॥१४२॥ऐकताच ही गिरा विनतजनपूरित - काम हरीचीउर भरूनी ये, घेई अर्जुन, शिरीं धूळ चरणांची ॥१४३॥चुंबन घेई पदकमलांचें‘ तुझ्या प्रभावे फल विजयाचेंगर्व मला लव पराक्रमाचातो अनलीं या जळला साचा ॥१४४॥कृपा करीं रे मेघश्यामलचित्त ना व्हावें विकारचंचलजें जें कांहीं घडलें हातुन सर्व असो तें तुला समर्पण ॥१४५॥करूनी वारासार रणीचीवाट धरियली गज नगराचीधृतराष्ट्राच्या भेटी साठींपंडुसुतांनीं सह जगजेठीं ॥१४६॥पंडुकुमारां आलिंगायाअंध आपुल्या पसरी बाह्यावरिवरि बघतां वाटे प्रेमीश्रीहरि परि सर्वातर्यंमी ॥१४७॥भीमा वरती राग तयाचा जाणुन हें कृष्णानेंपुतळ केला पुढें लोहमय चुरिलें त्या चुलत्यानें ॥१४८॥वदे मुरारे धृतराष्ट्रासीझी कृती ही, फळली तुजसी न्यायी पांडव, राग न ठेवीआपुलीच तीं मुले गणावीं ॥१४९॥धृतराष्ट्राची वदली भार्या“ तूं प्रेरक मम कूलक्षया यावंश तुझा हरि तुझे समोरीनिमे असाची ” हसे मुरारी ॥१५०॥“ शाप सुखे दे मज गांधारीदुःख मला नच मी अविकारी तुझ्या मुलांचें अघोर पातकअंती झाले तयांस घातक ॥१५१॥सज्जन आहे धर्म युधिष्ठिरतो न तुम्हासी येइल अंतरतुम्हीच त्यागी वडिलां ठायींशुभ चिंतावें त्याचें हृदयीं ॥१५२॥सूज्ञपणें मग धृतराष्ट्रानेंधर्म उरीं धरिला प्रेमानेंनिज भक्ताचें प्रिय संपादनईशाते या अवघड कोठुन ॥१५३॥रक्षी वेद, धरीत मंदर गिरी, काढीवरी मेदिनींदैत्या फाडित, व्यापिलें त्रिभुवना ज्यानें त्रिपादीं क्षणींराजांचा मद नाशिला, दशमुखा संहारिलें, मागुतीझाला अर्जुन सारथी महितला तोची प्रभु श्रीपती ॥१५४॥‘ समरप्रसंग ’ नांवाचा सतरावा सर्ग समाप्तलेखनकाल :-आश्विन शके १८७१ N/A References : N/A Last Updated : December 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP