मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीकृष्ण - कथामृत| दुसरा सर्ग श्रीकृष्ण - कथामृत प्रस्तावना श्री सद्गुरु प्रार्थना अनुक्रमणिका पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पांचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - दुसरा सर्ग संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते. Tags : ganudaskrishnamarathiकृष्णगणुदासमराठी दुसरा सर्ग Translation - भाषांतर ( श्रीवसुदेव - बंधन )सृष्ट्वाऽखिलं विश्वमिदं विचित्रंस्थूलञ्च सूक्ष्मञ्च चराचरञ्चतथापि नित्यं निरूपाधिको यः तस्मै महेशाय नमोऽस्तु शश्वत् ॥१॥अचिंत्य परतत्त्व दे करून वासनेचा क्षयप्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचें भय म्हणून तुमच्या पुढें दिसत दीन चिंतामणीतुम्हां शरण मी भवच्चरण मस्तकीं घेउनी ॥२॥परम सुंदरा मथुरा नगरी वसली होती यमुना - तीरींश्यामलशा ललनेच्या जणुं कां बसे कडेवर मुग्ध बालिका ॥३॥निळ्या नभीं चमकती विशेषतेथ गृहांचे सुवर्ण - कळस सूचविती जणुं विलास - केलीसंपत्ती कळसास पोचली मधु - दैत्यासह त्याचें मधुवन ॥४॥ दाशरथी शत्रुघ्नें मर्दुन त्या स्थानीं ही पुराणकालीं अभिनव ऐशी पुरी वसविली ॥५॥पापी मधुवन नष्ट जहालेंपापबीज परि नसें जळालेंहोतें जणुं तें दडुनी भूगतअनुकूला कालास अपेक्षित ॥६॥भोजकुलींचा कंस दुर्मती कालें होता राजा दुष्कृति - फल - युत - वृक्ष उगवले कोंब फुटुन त्या बीजा ॥७॥दिसावया इतरांहुन सुंदरगांजाचें जरि पीक खरोखर उत्पन्नहि ये विपुल तयांतुनपरि आदरिती तया न सज्जन ॥८॥तसेंच मथुरा - नगर सुशोभितविलास - संपत्तीनें मंडित सोडून गेले दूर संतजननिज - धर्माचें करण्या रक्षण ॥९॥कारण तेथें शील सतींचें यज्ञ मुनींचे धन दुबळ्यांचेंएक क्षणही नसे सुरक्षितपटकीच्या साथींतिल जीवित ॥१०॥भूप कंस धनरूप बळानें युक्त तसाची चातुर्यानेंवर्णूं कां परि सर्पगुणांतेंविसरुनि त्याच्या भयद विषाते ॥११॥श्वशुराचें घेऊन सहाय्य द्रोह करुन जनकासी नृप झाला, त्या नको पुरावा अधमाधम म्हणण्यासी ॥१२॥होती भगिनी या कंसासीनांव देवकीं असें जियेसीसरळ - हृदय ही कुटिल तदंतर लक्ष्मीसी जणु शंख सहोदर ॥१३॥चारुहास्य सुंदर मुखमंडल मनोज्ञ कान्ती वाणी मंजुळसुंदरता शुचिता सात्विकताघेउन तिज जणुं रचित विधाता ॥१४॥सागर भरला असें जलानेंही स्वाभाविक वात्सल्यानें कारुण्यानें सदैव पूर्ण हृदय तिचे जेवीं रामायण ॥१५॥मयूर शुक सारिका गृहींचेक्रीडापाडस वा हरिणींचेंव्याकुळ तिज वाटतां बंधनींसवेंच त्यांना देत सोडुनी ॥१६॥सुम खडितां ये रस, बघतां तें वाटे अश्रू लता ढाळिते अहा तिचें प्रिय अपत्य हरिलें जननीचें ना हृदय जाणिलें ॥१७॥म्हणुन विहरतां उद्यानांतुन तिनें सुमा चुंबावें कुरवाळावें वत्सल परि कर तोडाया न धजावे ॥१८॥देवकिच्या हळव्या हृदयाचीकंस करी नित थट्टा साची तिच्या पुढें टोची पक्ष्यातेंहसत वसे चीची करितां ते ॥१९॥कळ्या उमलत्या चुरगाळाव्यानिष्ठुर हंसुनी वर उधळाव्यावदन झाकुनी रडे देवकीदुजें काय तरि करिल वराकी ॥२०॥दुष्ट नरांचे सहजहि वर्तनउपजविते कीं व्यथा विलक्षणनिवडुंगाची लव ही जेवीं स्पर्शे केवळ बहुपरि शिणवी ॥२१॥उपवर झाली जयीं देवकी विकसित कलिका जैशीं वृष्णि - कुलींच्या वसुदेवातें नेमियलें वर तिजसी ॥२२॥विवाह झाला बहु थाटानेंकंस लक्ष घाली जातीनेंउणें तेथ मग पडें कशाचें प्रगटे वैभव सर्व कलांचें ॥२३॥वरातिच्या वर शुभ समयासी पूरच आला संपत्तीसीभव्य मनोहर हेमरथावर आरोहण करिती ते वधुवर ॥२४॥मिळवुन बहुविध पुष्पें रत्नेंशोभविलें त्या रथास यत्नें फुलें चमकती रत्न सुगंधितझालें जनुं कां गुण संक्रामित ॥२५॥अश्व दहा सुंदर तेजाळसुलक्षणी वर्णानें धवलसजवुनि त्या जोडिले रथांतेंदशग्रंथ जणुं वेदार्थातें ॥२६॥स्वयें कंस होऊन सारथी प्रग्रह घेई हातींअविवेकाधिन झाल्या जणुं कां दशेंद्रियांच्या वृत्ती ॥२७॥मिरवणूक चालली पथानेंरचिली ज्यावर रम्य तोरणेंसोनसळी रेशमी पटासीपसरुनिया झांकिलें जयासी ॥२८॥गर्जे सर्वापुढें धडधडाहत्तीवरती थोर चौघडामागुन वाजे मंजुल सनईसती पतिस जणुं उत्तर देई ॥२९॥मृदंग झांजा शिंग तुतारीप्रगटविती आपुली चातुरीबंदी करिती जयजयकाराभेदितसें तो गर्ज अंबरा ॥३०॥दासी त्या मागून चालल्याविविध भूषणांनीं ज्या नटल्या आंदण वस्तू शिरीं घेउनीस्तबक फुलांचे जसे लतांनीं ॥३१॥गणिकांच्या गानास साथ दे नूपुर झंकारुनियां हाव भाव मधु कटाक्ष खुलवी नृत्याच्या सौंदर्या ॥३२॥दोहीं कडुनी होई साचा दांपत्यावर वर्ष सुमांचा फुलें न हीं शब्द कीं स्तुतीचे कुतुकें जे निघती जन - वनाचें ॥३३॥रत्नदीप घेउन निज हातींसुवासिनी रथ अनुसरतातीत्यामागें कुलललना - मेळा वस्त्रांभरणांनीं नटलेला ॥३४॥मध्येच कोणी चढुन रथातेंवधुच्या मुंडवळ्या सांवरितेंउभयांच्या शेल्यांची ग्रंथीआहे कां सुटली तें बघती ॥३५॥रथास मार्गी हिसका बसतां अंग तयें अंगास लागतांलज्जारुण मुख होत वधूचेंस्मित ओठावर येत वराचे ॥३६॥दलांतुनी कमलांचे केसर सुमसंभारीं तेवींप्रपद पतीचे दिसे, विलोकी तेच शालिनी देवी ॥३७॥सर्व नगर पाहतें कौतुकींरथावरीं वसुदेव - देवकीचंद्रासह रोहिणी शोभली नभीं जशीं नक्षत्र - मंडळीं ॥३८॥शांत रसासह अथवा कविताउत्प्रेक्षा - रूपकें मंडिता विराग उज्वल भक्तीश वामुनि - हृदयीं शोभून दिसावा ॥३९॥कुठें वाद्य वाजतां पथानेंकाय त्यजुन धावती त्वरेनेंअशा स्त्रिया ही वरात मोहकबघावयासी कशा न उत्सुक ॥४०॥त्वरितगती गांठुन वातायनरमणी बघती शोभा निरखुन कोणी वानित वधूवरांतें वाजंत्रीच्या कुणी सुरांतें ॥४१॥एक वदे ही परस्परांसीं योग्य किती गे मधुरूपासींअज राजासी इंदुमती तीनिषधपतीनें जणुं दमयंती ॥४२॥खरेंच तव जन्मलीं जणूं हीं परस्परास्तव तेवींपरी न बाई ईशकृपें यां तशीं संकटें यावीं ॥४३॥अवलोकी कुणि वेश - भूषणांस्वतः सवें करितां तत्तुलनादिपुन वैभवें कंसा स्तविती किति ही भगिनी वरती प्रीती ॥४४॥वरवर बघणारास गमावें प्रेम देवकीवरी असावेंप्रयत्न कंसाचे परि होतेवैभव अपुलें मिरवायां तें ॥४५॥वरात ऐशी आनंदानें मिरवत होती राजपथानेंतों आकाशीं शब्द उमटलेहर्ष - गिरीवर वज्र कोसळें ॥४६॥पति - सदना ज्या देवकीस तूं मिरवित कंसा नेसी तिचा आठवा गर्भ पुढें तुज नेइल यमलोकासीं ॥४७॥पिकें बहरलेल्या शेतावरअवचित पडलें कीं हिंव दुर्धर मोहर दरवळला अंब्याचावर्षें वर पाउस गारांचा ॥४८॥शिखर मंदिरीं जव चढलें नतोंच आदळे वीज कडाडुनतसेंच केलें नभोगिरेनें क्षणांत सारें उदासवाणें ॥४९॥भगिनीवर कंसाची प्रीतीभोळ्या लोकां वाटत होतीक्रूर हृदय परि अजुन तयाचेंपुरतें नव्हतें दिसलें साचें ॥५०॥प्रकाश असतां मंद काननींरत्न तेवढें येत दिसोनीतों तळपावी वीज अंबरी प्रकटे काळा नाग विषारी ॥५१॥लांबुन वाघाच्या डोळ्यासीभ्रमें दिवा मानिती प्रवासीपरी कळोनी येत शेवटींगृहदीप न मृत्यूची दिवटी ॥५२॥घोर शब्द ऐकतां नभाचेरूप खरें प्रगटे कंसाचेंस्वतःवरी बेततां येउनीप्रेम खलांचें टिके कोठुनी ॥५३॥क्रूर भयंकर मुद्रा झाली खदिरांगार जणुं डोळेरुधिर येई तों अधर चाविले करकर खाउन दांत खलेंखङ्ग उपसुनी रक्त पिपासू रथाखालतीं घेत उडी प्रगटत मूर्त कृतांत जणूं का प्रलयाची येतांच घडी ॥५४॥ससाण्यापरी घालुन झेप धरि भगिनीचा केशकलाप ओदुन पाडी तिजसी क्रूरलोकांच्या अश्रूसह भूवर ॥५५॥फुटलें कंकण तुटल्या माळाधूळ माखली सर्वांगालाभावि सुखाच्या सर्व कल्पनाविसकटल्या सह वस्त्र भूषणां ॥५६॥आनंदामधिं रमली होती नवपरिणत ती मुग्धा युवतीक्षणांत परि सारें पालटलेंअमृत इच्छितां गरळ उसळलें ॥५७॥पळभर तिज कांहींच कळेना बधिर इंद्रियें सारींनिमिषार्धें मग होत घाबरी मरण बघून समोरी ॥५८॥घाम सुटे थरथरे देवकीकोमल हृदयीं भरली धडकीविवर्ण झाली शब्द फुटेनाजल तरळें भय - चंचल नयनां ॥५९॥किति तरि जमले जन मिरवायाधजे न एकहि पुढती व्हायांपुतळे जणुं सारे दगडांचेघोर संकटीं कोण कुणाचें ॥६०॥शांत न बसवे वसुदेवालातो धैर्यानें पुढती झालासंकटभीता साह्य करावें थोरासी सहज हें स्वभावें ॥६१॥ती तर त्यांत नवोढा पत्नीभाग रक्षिणें नाना यत्नीं अग्निसाक्ष तद्भार शिरावर घ्यावी केवीं मग माघार ॥६२॥धीर दिला तिज वसुदेवानें बघुनी प्रेमळ नयनें बोलत कंसा मंजुलवाचा कर धरुनी धैर्यानें ॥६३॥“ कंसा थोर तुझें महिमानभोज कुला तूं शिरो भूषण शूर रणीं ना कुणी तुझ्या सम कां करिशी मग अनुचित कर्म ॥६४॥आपण फलवेली लावावी कालें ती पुष्पोन्मुख व्हावीकिडकें एखादें येइल फळगृहित धरुन कुणि छेदी वेल ? ॥६५॥वरातिची ही मंगल वेलाथाट येथिंच तुवांच केलानववधु या समयीं अधिदेवीतिलाच कां पायीं तुडवावी ॥६६॥स्त्री हत्या मोठीं सर्वांहुनभगिनी ही धाकुटी तयांतुनकन्येसम लाडकी असावीतिलाच कांरे वध्य गणावी ॥६७॥धरुनी जो तूं हेतु मनासीहिला वधाया उद्यत होसीमारुन हिजसी साधे तो कांकोण अमर वद या भूलोकां ॥६८॥बली धनी विद्वान असेना मरण न चुकलें कवणाम्हणुन यशासी डाग न लागों हेंच धरावें स्वमना ॥६९॥शक्य असुनही इच्छापूर्ती संत न दुष्कर्मे आचरितीप्रयत्नेंहि जें अशक्य घडणेंयास्तव कां मग पापाचरणें ॥७०॥सूज्ञा, म्हणुनी विनवित तूंतेंजीवदान दे मम भार्येतेंदीनपणें तुजकडे बघे कींप्रिय भगिनी ही तुझी देवकी ” ॥७१॥भाषण परि तें सर्वहि विफलघड्यावरी पालथ्या जसें जल बीं पडलें जाउन खडकावर कसे फुटावें तयास अंकुर ॥७२॥वाळवंट कां सुपीक झालेंकितिही जरि त्यासी नांगरिलें सुसरीच्या पाठीसी मार्दव ये कां भिजुनी जलें सदैव ॥७३॥दुष्ट - वर्तनीं पालट तेवीं सौम्य भाषणें पडेल केवीं नवल हेंच ऐकून घेतलें इतुका वेळ तयानें सगळें ॥७४॥दूर ढकलुनी वसुदेवातें क्रोधें शस्त्र उगारीबघवेल न तें म्हणुनी झांकी डोळे नगरी सारी ॥७५॥देवकिची अंतिम किंकाळीपरि नच कोणा ऐकूं आलीध्वनी नवाची सुखवी कर्ण “ श्रीनारायण जय नारायण ” ॥७६॥नारदास बगतांच पुढारींक्रोधासह असि कंस आवरीशांतवी न हृदयास कुणाचेपवित्र दर्शन सत्पुरूषांचें ॥७७॥श्रीकृष्णाची भावी मातादेवकीस त्या कंसें वधितांविलंब घडतां भगवज्जन्माम्हणुन नारदें घेतले श्रमा ॥७८॥स्वीकारून सर्वंचें वंदनकरिती कंसासी स्मितभाषण “ मांडिलेंस हें काय भूपते ? शस्त्र तुझें ना व्यर्थ कोपतें ” ॥७९॥कंस वदे “ आठवा गर्भ मज वधिल हिचा नभ सांगे म्हणुन हिला मारून विषपादपमूळच छेदित वेगें ॥८०॥“ छे छे, कंसा हिला वधोनीमुनिवर म्हणती तुझीच हानीपुनः कुठें ही येइल जन्माठाव तुला लागेल कसा मा ॥८१॥युक्ती तुजसी कथितो यास्तव हिला बंधनीं पतिसह ठेवअपत्य जेंजें होइल यांतें टाक तत्क्षणीं चिरडुन त्यातें ॥८२॥सवेच पटलें तें कंसालामूर्ख भाळतो भुलावणीलावदे दुष्ट तो वसुदेवाप्रत“ काय संधि हा तुम्हांस संमत ” ॥८३॥वसुदेवहि गांगरला क्षणभर परि संमती देई नंतर पुरुष करी दूरचा विचार स्त्रीस न बहुधा इतुका धीर ॥८४॥“ होईल वा नच मूल अम्हांसी, ” “ म्हणत कुणीं सांगावें,जगेल होतां, निश्चय नाहीं, कां पुढचें टाकावें ” ॥८५॥परी देवकी वदें स्फुंदुनी“ सुखें टाक मम कंठ चिरोनी, ” अपत्य - वघ कल्पनेमधेंहीस्त्री हृदयासी साहत नाहीं ॥८६॥बंधन त्या करण्या आज्ञापुनकंस चालता झाला तेथुनघट्ट धरोनी नारदचरणरडे देवकी आक्रदून ॥८७॥माते, न धरी मम पायांतेंवंदनीय गे तूंच अम्हांतेंपूर्णब्रह्म परेश परात्पर उदरीं तुझिया अवतरणार ॥८८॥प्रसंगाकडे पाहुन निष्ठुर वदलों त्याची मला क्षमा कर असें कसें तरि लव शांतवुनीअंतर्हितं झाले नारदमुनि ॥८९॥कंसाज्ञेनें दंपतीस त्या नेलें कारागारींभयाण भिंती जेथ रक्षिती निज - वैभव अंधारीं ॥९०॥आकाशासह पृथ्वी जेवींगाढ तमीं दर्शे बुडवावी आनंदासह अथवा आशादुर्दैवानें करणें विवशा ॥९१॥सत्यासह वा सरला वाणी स्वार्थे जणुं ठेवणें कोंडुनीवसुदेवासह तशी देवकीबंदी केली कंस सेवकीं ॥९२॥ज्यांनीं उपभोगणें विशेषराजमंदिरांतले विलासउदास जीवित जगती तेचीविचित्र - करणी कीं दैवाची ॥९३॥धीराचे ते परि दोघेहीत्रासिक कोणी झाले नाहींमधुर - वर्तनें परस्परांनासुखवित करिती कालक्रमणा ॥९४॥जाती दिवसामागुन राती मासहि कांहीं सरलेगर्भवती जाहली देवकी वासुदेवें पाहियलें ॥९५॥फिकटपण ये वदना किंचितशोभे जणुं कां कमल - रजोहतमंदगती जाहली मंदतर अलस लोचनीं दिसे मनोहर ॥९६॥प्रिय पत्नी ती प्रथम - गर्भिणी आनंदे नच कोण पाहुनीवसुदेवाच्या परि हृदयांतवचन दिलेलें सलत सदोदित ॥९७॥पुरे दिवस भरतां गर्भासी शुभानना दे जन्म सुतासी कीर्तिमंत हें नांव तयाचेंलोकीं विश्रुत झालें साचें ॥९८॥जन्मा आधीं प्राण देउनीज्यानें रक्षियली निज जननीप्रसिद्ध होण्या त्याचें नाम नाम - करण - विधिचें ना काम ॥९९॥पाहुन मूर्ती मृदुल चिमुकली भान विसरली देवीअपत्य - जन्मापरी स्त्रियांतें दुजें न कांहीं भुलवी ॥१००॥चिंती परि वसुदेव मनातें अतां उचलणें अवश्य यातेंसुतासवें जों अधिक रमेलवियोग तों दुःसह होईल ॥१०१॥दाबुन कष्टें व्यथा हृदांतिलथोपवून अश्रूंचे ओघळनिज भार्येच्या अंगावरुनीमूल तयें घेतलें उचलुनी ॥१०२॥पतिमुख दिसतां उदासवाणेंसर्वहि मग जाणिलें तियेनेंहंबरडा फोडून भूतळींनवप्रसूता ती कोसळली ॥१०३॥बांध फुटे वसुदेव - हृदाचा पूर आवरेना अश्रूंचापरी प्रसंगीं वज्राहुनहीसज्जन होती कठोर हृदयीं ॥१०४॥जड पद टाकी पुढें मूर्च्छिता भार्या ओलांडुन तीकंसासन्मुख नीट येउनी बालक ठेवी पुढतीं ॥१०५॥शून्यरवें वसुदेव बोलला“ बालक हा नव जात आणिलायाचें वाटेल तें करावें,शब्द पाळिला निज, वसुदेवें ” ॥१०६॥बालक तें पाहतां निरागसहात चिमुकले मुद्रा लोभस मूठ आपुली चोखित पडलेंकंस - मनीं वात्सल्य उपजलें ॥१०७॥वसुदेवासी देई उत्तर “ मी न समजतां तितुका निष्ठुरहा न्या इतरहि सुखें वाढवाआणुन द्या मज परी आठवा ” ॥१०८॥चुंबुन कंसें मृदुल कपोलाबालक दिधला वसुदेवालापरि हा खलहृदयांतिल गंहिवर जल टिकतें कां तत्प शिलेवर ? ॥१०९॥कंस विचारा करी मानसीं“ सोडुन देणें उचित न यासीगांठ असे ही शठ देवांतेंउलटे सुलटे मोजितील ते ” ॥११०॥वेगें धाडुन निज दूतासीओढित आणी वसुदेवासीआपटिले तें मूल शिलेवरकोमल काया केली चूर ॥१११॥शोकाकुल वसुदेव कसा तरि झाला परतुन येता कंस करांतुन सुटेल सुत हा विश्वासचि त्या नव्हता ॥११२॥अशींच कांहीं वर्षे गेलीसहा मुलें वसुदेवा झालींपरि उपजत तद्विनाश होयव्यसनी पुरुषाचे जणुं निश्चय ॥११३॥दुःखाचे हे कठोर घालेउभयांनीं त्या कसे साहिलेठाउक सगळें त्यांचें त्यांनाकाय कल्पना सामान्यांना ॥११४॥इकडे शेषा म्हणे रमावरघेणें अतां मज अवतार तूं तर माझा बंधू सखयायेशिल ना मम साह्य कराया ॥११५॥शेष करी यावरी उत्तरा“ पुरे तुझी संगती श्रीधरा गेल्या वेळीं तुजसह आलों कनिष्ठ म्हणुनी सदा कष्टलों ॥११६॥एक अटीवर येतों बंधू वडिल तुझा मी व्हावेंआज्ञेनें मम वागावें तूं, ” केलें स्मित तइं देवें ॥११७॥मान्य तुझें हें म्हणणें मजसीजा ये देवकिच्या उदरासी उपजतांच कीं मरण तिथें ” तर शेष म्हणें, “ माझें रक्षण कर ” ॥११८॥कंसापुन त्या लपवायातेंसातव्याच महिन्यांत तयातेंदेवकिच्या गर्भांतुन नेलेंउदरीं रोहिणिच्या स्थापियलें ॥११९॥हीही वसुदेवाची पत्नीआश्रयार्थ नंदाच्या सदनीं झालें गर्भाचें आकर्षणम्हणुन सुता म्हणती संकर्षण ॥१२०॥कंस म्हणे, “ मम दर्प किती हा जिरती गर्भ भयानें अतां मात्र राहिलें पाहिजे अतिशय सावधतेनें ” ॥१२१॥अडसर घालुन कारागारा वर बसवी जागता पहाराकरीत होतां सुचेल तें तेंपरी स्वस्थता नये मनातें ॥१२२॥सुचें किमपि ना तसें मधुरही रुचे भोजन उरांत धडकी भरे हृदय पावतें स्पंदनउगीच बहु ओरडा करून सेवकां कांपवीन झोप लव ये तया सतत आठवा आठवी ॥१२३॥‘ वसुदेव - बंधन ’ नांवाचा दुसरा सर्व समाप्तलेखनकाल :-वैशाख, शके १८६७ N/A References : N/A Last Updated : December 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP