मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|निरंजन स्वामीकृत भूपाळ्या| उठि उठि नरहरिराया प्रगटे ... निरंजन स्वामीकृत भूपाळ्या भूपाळी दत्ताची उठि उठि दिगंबरा । स्वामि ... उठाउठारे लौकरि । सत्वर या... उठि उठि कृष्णाबाई । स्वरू... उठि उठि वो बलभीमा स्वामिस... उठोनिया प्रात: काळीं । वद... उठि उठि नरहरिराया प्रगटे ... भूपाळी नरहरीची - उठि उठि नरहरिराया प्रगटे ... वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathinarahariniranjam raghunathनरहरीनिरंजन रघुनाथभूपाळीमराठी भूपाळी नरहरीची Translation - भाषांतर उठि उठि नरहरिराया प्रगटे हृदयस्तंभ्हीं या । सद्भावें प्रल्हाद विनवी चिंतुनिया पाया ॥धृ॥दुष्ट पिता हा कामवैरी माझा अपकारी । तुझा दास ह्मणवुनिया मजला बहुतापरि मारी ।सर्व जगीं हा बळिष्ट आतां कोण यासि वारी । तुज वाचुनिया दुसरा नाहीं आमुचा कैवारी ॥१॥अहंकार पर्वतावरुनि मजला लोटिलें । क्रोधाग्नीच्या योगें येणें मला आटिलें ।मोहनदी माझारिं नेउनि मजला बुडवीलें । मदमत्सर हस्तीचा करुनि मजला तुडवीलें ॥२॥अविद्यामायेच्या हस्तें विषय वीष दिधलें । आशातृष्णा शस्त्रें येणें मजला छेदिलें ।नानापरि दु:खाचे अपाय मजलागीं केले । तुझिया कृपादृष्टी मजला नाहीं बाधलें ॥३॥तूं तरि अखंड व्यापक सर्वीं भरोनी उरलासी । इच्छामात्रें ब्रह्मांडाची घडमोडी करिसी ।निजभक्ताच्यासाटाहीं नानापरि रूपें धरिसी । पूर्ण मला भरवसा आहे हृदयांतरवासी ॥४॥सद्गुरु नारद प्रसादयोगें बोध असा स्फुरतां । हृदयस्तंभीं व्यापक नरहरि जाला अवतरता ।हिरण्यकश्यप काम मारुनि सिंहनाद करितां । निरंजन प्रल्हाद केला स्वरुपीं अनुसरता ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP