मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|निरंजन स्वामीकृत भूपाळ्या| उठि उठि वो बलभीमा स्वामिस... निरंजन स्वामीकृत भूपाळ्या भूपाळी दत्ताची उठि उठि दिगंबरा । स्वामि ... उठाउठारे लौकरि । सत्वर या... उठि उठि कृष्णाबाई । स्वरू... उठि उठि वो बलभीमा स्वामिस... उठोनिया प्रात: काळीं । वद... उठि उठि नरहरिराया प्रगटे ... भूपाळी - उठि उठि वो बलभीमा स्वामिस... वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथभूपाळीमराठी भूपाळी Translation - भाषांतर उठि उठि वो बलभीमा स्वामिसुंदर गुणसीमा । उठवि अंजनिमाता अंतरिं धरूनिया प्रेमा ॥धृ॥पूर्व दिशेसी भानु उदयो व्हावया पाहे । कमलदळाच्या भ्रमरालागीं सुटका होताहे । निबिड वनाचे ठाई कोकिळ बोबाये । चरावया चालिले पक्षी मार्ग बहू वाहे ॥१॥गंगाद्वारा प्रति मुनिवर चालिले स्नाना । ब्रह्मगिरीच्या वरुते जाती निजतपआचरणा । साधकजन पातले सखया तुझिया दर्शना । त्यांजप्रति दे भेटी सत्वर वायुनंदना ॥२॥सर्वहि वानरगन जाले तुजभोवते गोळा । चिमणाली लेंकुरें उडति उभवुनि लांगूला । तुझिया योगे शोभा दिसती सर्वहि कपिकूळा । सत्वरि जागा होई माझ्या तान्हुल्या बाळा ॥३॥निरंजन सुखधामविलासि गोदेचे तटीं । सद्गुरु श्रीरघुनाथ अला आहे पंचवटी । ऐकुनिया वचनासि अरूळी देउनिया मोठी । उठिला श्रीहनुमान प्रेमें टाळीया पीटी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP