भूपाळी - उठाउठारे लौकरि । सत्वर या...

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


उठाउठारे लौकरि । सत्वर यारे शुद्धीवरी ।
उघडा कपाटें अंतरीं । ज्ञानदृष्टी अवलोका ॥धृ॥
आलें आहे विघ्न भारी । काळ टपला तुह्मांवरी ।
नित्य करिताहे चोरी । आयुष्याची तुमच्या ॥१॥
सरला चौर्‍यांशीचा तम । नरतनु आली अनुक्रम ।
इचा मानुनि संभ्रम । ज्ञानदृष्टी उघडा रे ॥२॥
सद्गुरु वचनाचा उदय । प्रकाश जाला भानूदय ।
जागे व्हा रे मनोमय । स्वरूप पहा आपुले ॥३॥
वाचे घ्यारे रामनाम । निरंजन सांगे उत्तम ।
तुमचा हरेल भवभ्रम । निर्भय व्हाल अंतरीं ॥४॥


Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP