मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|स्वात्मप्रचीती| अध्याय तिसरा स्वात्मप्रचीती अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा स्वात्मप्रचीती - अध्याय तिसरा वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी अध्याय तिसरा Translation - भाषांतर श्रीगुरुराया दत्तात्रया । कृपासिंधु करुणालया ।मजवरी कृपा करी सखया । योगिराया ! स्वामी तूं ॥१॥तूं जो निरंजन निर्विकार । मजसाठीं जालासी साकार ।मस्तकीं ठेवुनी अभयकर । अनुभव साचार वदवीसी ॥२॥ मागील कथेचें अनुसंधान । बाहेर घातलें आप्तवर्गानें । मग दूर देशाप्रती जाऊन । केली सेवा यवनाची ॥३॥तेथें राहोनि दोन संवत्सर । श्रम केले अतिनिष्ठुर । द्रव्य मिळविलें फार । पापाचरण करूनी ॥४॥सवेंचि घरची ऐकिली मात । स्त्रीजाली ऋतुस्नात । हुंडी करूनी द्रव्यातें । घराप्रती पातलों ॥५॥आणिल्या द्रव्यातें खर्चून । स्त्रियेचें केलें ओटभरण । उरलें तें देणें वारून । स्वस्थ घरीं बैसलों ॥६॥बहु आनंदें विषय भोगिला । जैसा रेडा चिखलीं पडला । कीं डुकर नरकीं भरला । प्रेमानंदें डुल्लत ॥७॥ऐसे झाले षण्मास । आणखी ओढवला प्रवास । घरचीं ह्मणती रोजगारास । जाई आतां सत्वरीं ॥८॥मग दूरदेशीं जाऊन ! बहुतांचें आर्जव करून । पैशाची नामक लिपी लिहून । रोजगार पैं केला ॥९॥तेथें बहुत दिवस राहूनी । फार केलें श्रमालागूनी । देहीं लागलें तेथिंचें पाणी । ह्मणुनि गेलों घरासी ॥१०॥द्रव्य मातेचे स्वाधीन केलें । तेव्हां ह्मणती भलें भलें । मागुती कुसमुसूं लागले । घरीं कासया राहिला ॥११॥आणखी निघालों प्रवासाकारणें । घरचीं सांगति निरोपालागून । कोणी ह्मणती आणा पांघरुणें । कोणी सोनें मागती ॥१२॥स्त्री ह्मणे ‘ वो प्राणपती । मजला घेऊनि यावें मोतीं । ऐसें आपुले हितासी रडती । परि न जाणती श्रमातें ॥१३॥प्रवासामाजी जाऊन । श्रम होती हें कोनीच नेणें । सर्व इच्छिती धनाकारणें । बहु लोभिष्ट होउनी ॥१४॥नको नको रे ! संग त्यांचा । आप्त मित्र सोइरीयांचा । श्रम नेणती गरीबाचा । काय करितो ह्मणूनी ॥१५॥अनेक प्रकारच्या पापराशी । करून मेळवावें द्रव्याशीं । घरा जातां देहासी । सुख नाहीं क्षणभरी ॥१६॥एका विषयसुखा कारण । धरावा सर्वांचा अभिमान । पापद्रव्य मेळवूनी । सर्वांसी पोसावें ॥१७॥तया विषयाचें काय सुख । केवळ नरकाचेंचि मुख । देवासी होउनि विन्मुख । भवचक्रांत पडावें ॥१८॥स्त्रीसूप केवळ अविद्या । शरीरीं विटाळाच्या नद्या । रक्त वाहे सांदो सांधा । योनिद्वारें कडूनी ॥१९॥अंतरीं अस्थींचा पंजर । मांसें करूनि लिंपिलें वर । शिराचें बांधण देउनि बरवें । चर्मयुक्त मढियेली ॥२०॥मस्तकीं केसाचें वेटाळें । हृदयीं मांसाचिये गोळे । मुख नासिकाचिये बिळें । बहु दुर्गंधी वाहती ॥२१॥अंतरीं भरला मळमूत्रं । पोटीं नरकाडी अपवित्र । दुर्गंधी जैशी मेलें कुत्रें । तैसें अपवित्र सर्वही ॥२२॥स्त्रीरूप केवळ मोहिनी । भवदोषाची निबिड खाणी ॥ पाठवीतसे नरकालागूनी । संग करी तयातें ॥२३॥नको नको स्त्रियांची संगती । इणें बहुतांची केली माती । जन्ममृत्यू खापर हातीं ॥ देऊनि बहुद्वार फिरविली ॥२४॥असो स्त्रियांचा सोडावा संग । प्रपंचीं व्हावें नि:संग । तरी होईल भवभंग । जन्ममृत्यू चुकेल ॥२५॥नाहीं तरी भवसागरई । बुडणें लागेल वरचेवरी ॥ शेवटीं यमाचिये घरीं । बहु जाचणी पैं होती ॥२६॥ऐसें समजूनी म्यां अंतरीं । वीट मानिली या संसारीं । तुह्मी सर्व मिळोनि घोरीं । घालूं पहातां मजलागीं ॥२७॥एथींची नीत ऐशी काई । सर्व करिती एकचि आवई । लटकेंच ह्मणूनी जावाई । गळां पडतां माझिया ॥२८॥एका स्त्रियेचे भयेंकरून । सर्व सोडून घेतलें येणें । पुढें विघ्न सद्गुरूनें । कैसें मज पाठविलें ॥२९॥सवेंचि त्या मुलीचे गावींचा । एक आला ओळखीचा । तोही ह्मणे हाची साचा । जावाई तुमचा होय कीं ॥३०॥ऐसें ऐकुनी तयाचें वचन । चंडीदास बाबा सत्वनिधान । ह्मणे ‘ तूं आहेसी कवण । खरें सांग अवधूता ! ’ ॥३१॥ऐसें ऐकूनि तयाच्या बोला । अंतरीं खेद बहुत वाटला । वाटे सत्पुरुषही क्षोभला । मजलागीं कैसा हो ! ॥३२॥मग मोठियानें गळा काढून । करिता झालों बहु रुदन । सवेंचि उद्विग्न जालें मन । वाटलें प्रयाण करावें ॥३३॥चंडीदास बावाशीं पुसतां । ह्मणे ‘ रे नको जाऊं अवधूता ! । हे नसली जरी तुझी कांता । तरी भय काइसें ? ’ ॥३४॥चंडीदासानें कृपा केली । मजलागीं वस्त्रपात्रें दिल्हीं । कौपीन दोन धोत्रें चांगलीं । नरोटी दिली पांचवी ॥३५॥असो तयाप्रती पुसून । सर्वांसी करिता झालों नमन । मग तेथुनिया केलें गमन । सिन्नरासी पै आलों ॥३६॥नागेश्वराचें शिवालय प्रचंड । तेथेंचि असे नागकुंड । तयावरी ब्राह्मणांची झुंड । स्नानालागीं पै आली ॥३७॥मीहि तेथें स्नानासी । सहज गेलों अनायासीं । त्यांनीं वेडा मानुनी मजसी । संकल्पासी बोलिले ॥३८॥एकसमयावच्छेदें करून । बोलते झाले चौघेजण । ह्मणती ‘ तुमचें पापदहन । समूळ आजी जहालें ’ ॥३९॥ऐसें ऐकतां त्यांचे वचन । हर्षयुक्त झालें मन । मर्ग वस्त्रें सर्व गोळा करून । चोघांप्रती दिधलीं ॥४०॥एकाकी कौपीनधारी । तेथूनी निघार्लो झडकरी । ग्रामांत करूनि माधुकरी । देपुराप्रती पै गेलों ॥४१॥तेथें बाबाजी भागवत । गृहस्थाश्रमी बहु समर्थ । अतिथियाचें मनोरथ । पूर्ण करीत सर्वदा ॥४२॥घेतलें तयाचें दर्शन । पाहूनि धालें मन । भागवत ह्मणे ‘ आलां कोठून । पश्चात्तापी दिसतां ’ ॥४३॥सत्वरीं गृहाप्रती चलावें । माझे मनोरथ पुरवावे । दोनचार दिवस रहावें । कोठें न जावें सत्वरीं ॥४४॥बहुत आदरता तार्तम्य घेऊन । घेतलें आठ दिवस ठेवून । पांघरावया कामळ घेऊन । मजलागीं दीधलें ॥४५॥दुसरें आंगवस्त्र घेऊन । ह्मणे याजलागीं पांघरण । म्यां तयाचें मोडिलें वचन । अंगवस्त्र नाहीं घेतलें ॥४६॥तंव तेच रात्रीं स्वप्न झाले । ब्राह्मणाचें रूपें दत्तात्रय आले । येउनि उभे जवळ ठेले । बोलते जाले सक्रोधें ॥४७॥‘ कांरे ! अंगवस्त्र न घेसी । इतका त्याग कासया करिसी । कोणा दुखावूं नये मानसीं । सुखें देतां घ्यावें पैं ’ ॥४८॥ऐसें बोलोनियां वहिला । दत्तात्रय अदृश्य झाला । भानू प्रकाशला । रविरश्मी दाटल्या ॥४९॥मग जाउनी भागवतासी शरण । अंगवस्त घेतलें मागून । सांगितलें वर्तमान । ज्जें कां रात्रीं जहालें ॥५०॥बाबाचें घेतलें आशीर्वचन । तेथें आठ दिन राहून । सवोंचि निरोपातें मागून । सिंदरासी पै आलों ॥५१॥येथें बाळकरामबाबा आनंदघन । त्याचें घेतलें दर्शन । जयासी मारुती प्रसन्न । साक्षात्कार जाहलासे ॥५२॥तेथें राहुनी पांच दिवस । आज्ञा मागुनी तयास । सवेंचि केलें प्रयाणास । सिंद्याप्रती पातलों ॥५३॥तेथोनि प्रात:काळीं उठोन । सत्वरची केलें गमन । द्वादश घटका दिनमान । तंव क्षेत्राप्रती पातलों ॥५४॥जें कां सर्व सुक्षेत्र नाशिक । योगवृंदाचें येतसे पिक । तें हें सुक्षेत्र नाशिक । दृष्टीलागीं पाहिलें ॥५५॥लोक ह्मणती या नाशिक । परि म्यां देखिले बहुशिक । दुरला येऊनि नाशिक । शिकूनिया जातसे ॥५६॥क्षेत्रासि नाम नाशिक । परि योगी रहाती बहुसम्यक । न देखों नाशिक । मनुष्यमात्र करूनिया ॥५७॥सवोंचि दिठीं देखिली गंगा । जे त्रितापशमनी भवभंगा । वसे सांबाचे अर्धांगा । जे श्रीरंगा आवडती ॥५८॥जियेचें सामर्थ्य अतिगहन । दोषी असतां शतयोजन । तयाचें करीत उद्धरण । क्षणमात्र न लागतां ॥५९॥जियें विष्णूचे अंगुष्ठावरून । ब्रह्मगिरीस केलें येणें । शिवजटा मिळणीं मिळून । मृत्यलोका पातली ॥६०॥तयेचें लावण्य पाहून । मदनारी झाला तल्लीन । मस्तकावरी केलें धारण । जटाजूटीं राहिली ॥६१॥शिवें केलें विषप्राशन । सर्वांग झालें तपन । करितां गंगा जटीं धारण । शीतल सर्वांगीं झाला पैं ॥६२॥ते हे गंगा पापहारिणी । कलियुगीं जडमूढउद्धरणी । भागीरथीची ज्येष्ठ भगिनी । नाशिकालागी पातली ॥६३॥प्राणी बहुश्रमें जाती काशी । कावडी नेती रामेश्वरासी । दृष्टी पाहतां गंगेसी । भागीरथी उसळतसे ॥६४॥तो चमत्कार अद्यापिवरी । दृष्टीसीं पहावा चतुरीं । मग सत्य वाटेल अंतरीं । एरवीं खरेंचि आहे वो ॥६५॥ऐसें गंगेचें करूनि स्तवन । दृष्टी पाहिलें सुहास्यवदन । जें ब्रह्मानंदाचें सुखसदन । सांडणीं मदन करावा ॥६६॥जीची स्वरूपाची पाहुनी सीमा । लज्जित झाल्या उमारमा । ते म्यां पाहिली सुखधामा । भीष्ममाता साजिरी ॥६७॥जीचे पुत्राचें सामर्थ्य गहन । विष्णूसि केलें रणकंदन । शस्त्रप्रतिज्ञा केली खंडण । चक्र हस्तकीं धरविलें ॥६९॥जियेचें दुग्धप्राशन - बळ । भीष्म कृष्णालागीं सबळ । होउनि युद्ध केलें तुंबळ । एकदश दिनवरी ॥६९॥ते हे गंगा सुप्रसन्नवदना । आवडाती जे भालनयना । प्रगटली जे विष्णुचरणा । ते म्यां दिठी देखिली ॥७०॥अरुणा तयेचें कंठस्थान । वरुणा हनुवटी गहन । रामकुंड तें मुख जाण । लक्ष्मणकुंड नासिक पैं ॥७१॥सूर्यकुंड ब्रह्मतीर्थ विचित्र । हेचि गंगेचे दोन्ही नेत्र । पंचवटी नासिक दोन्ही क्षेत्र । कर्ण - युगुल जियेचें ॥७२॥द्वैपायन गंगापुत्र । तपश्चर्या केली स्वतंत्र । तें बदरीतीर्थ अतिपवित्र । भांढा सुरेख साजिरा ॥७३॥त्र्यंबका पर्यंत स्वप्रवाहिनी । तेचि तयेची सुंदर वेणी । आतां वर्णिजेल सर्वभूषणीं । दैवतांचा समुदावो ॥७४॥रेणुका लक्ष्मी भद्रकाळी । हेचि गळ्यातील गरसोळी ॥ मंगळसूत्र तयातळीं । मारुति तपोवनींचा ॥७५॥नीळकंठ तारकेश्वर रामेश्वर । मुरडेश्वर पंचरत्नेश्वर ॥ बाणेश्वरादि चिंचपेट्या समग्र । गळ्यामाजी घातल्या ॥७६॥चित्रघंटा पदकमाळा । रोकडामारुति तेजआगळा ॥ खालीं लोकक मुढाळा । लाविलासे सुंदर ॥७७॥जगप्रसिद्ध तिळभांडेश्वर । तोचि कंठीं चंद्रहार ॥ श्रीव्यंकटेश पदक सुंदर । तयालागी शोभतसे ॥७८॥सिद्धिविनायक गणपती सुंदर । उभय कर्णीं कुंडलाकार ॥ बाळिया दत्तपादुका परिकर । पंचवटी माजींतल्या ॥७९॥कपालेश्वर उमामहेश्वर । ही कर्णफुलें अतिविचित्र ॥ तेणें सुशोभित दिसती श्रोत्र । तया गंगेमातेचे ॥८०॥गोरे रामलक्ष्मण । तेचि नासिकीं मोतीं सुपान ॥ द्विमुखी मारुती अधोवदन । मदननायक जोडला ॥८१॥पंचमुखी मारुती आणि विठ्ठल । तोचि बिजवरा देतसे ढाळ ॥ पाताळेश्वर हिरा तेजाळ । देतसे ढाळ तयासी ॥८२॥श्री दत्तात्रय दिगंबर । तोचि मस्तकीं मुगुट सुंदर ॥ कोटि उगवले प्रभाकर । तेज अमूप जयाचें ॥८३॥ब्रह्माविष्णुमहेश्वर । या तिहींचा जो अवतार ॥ तो साक्षात् दिगंबर । प्रस्तकावरी शोभतो ॥८४॥जो निष्कळंक निरंजन । निष्काम सदैव परिपूर्ण । सच्चित्सरूप आनंदघन । मुगुट शिरीं साजिरा ॥८५॥जो परात्पर अवधूत । सर्वीं असुनी सर्वातीत । सर्व विषयांसी अलिप्त । मुकुटाकृती शोभतो ॥८६॥अश्वत्थवन मौक्तिकें बरीं । हरिहरेश्वरादि पोंवळीं अंतरीं । तेचि तयालागीं झालरी । मुकुटाखालें शोभती ॥८७॥तया सान्निध्या सुंदरनारायण । तो मस्तकीं सिसफूल जाण । ब्रह्मतीर्थ तया संल्लग्न । कुंभम भाळीं शोभतसे ॥८८॥सर्वांमाजी गुणसमुद्र । पंचवटी श्रीरामचंद्र । तोचि भाळीं शोभला चंद्र । प्रभा अपार जयाची ॥८९॥रावणें सीता केली हरण । मग लक्ष्मणें ताटिकेचें घ्राण । स्वहस्तें केलें छेदन । त्रिशिरखरदूषण मारिले ॥९०॥ श्रीरामें पाषाणसीतु बांधून । मारिले रावनकुंभकर्ण । सीतालक्ष्मणसह आपण । फिरूनि आले पंचवटीं ॥९१॥पाहून सुंदर तपोवन । चिरकाळ राहिले आपण । तें स्वरूप इंदुवदन । गंगाभाळीं शोभतसे ॥९२॥सव्यभागीं तपस्वे थोर । रघुनाथ गुरुजी योगीश्वर । जो साक्षात् भृगु अवतार । कलियुगामाजी अवतरला ॥९३॥ह्मणाल भृगु असें संबोधन । तरि ते मिथ्या नवदे जाण । मजलागीं श्रीदत्तात्रयानें । स्वप्नीं येऊनि कथियेलें ॥९४॥जो तपस्वियांमाजी वीरभद्र । अनुष्ठानियांमाजि दुजा रुद्र । काम योगियामाजी योगींद्र । शीतळ चंद्र दूसरा ॥९५॥सत्वधीर अति उदार । ज्ञानियांमाजी रत्नाकर । तपोतेजप्रभाकर । गंगाभाळीं शोभतो ॥९६॥ऐसी गंगा माता सुंदर । रत्नभूषनेंयुक्त परिकर । हास्यवदन उदार । दृष्टीसी म्यां देखिली ॥९७॥मग तयेप्रती करूनि नमन । केलें तीर्थातें वंदन । पंचवटीमाजी जाऊन । श्रीरामदर्शन घेतले ॥९८॥दिनमणी पाहुनि माध्यान्ह । क्षेत्रांत केलें भिक्षाटण । गौतमीतटाकीं जाऊन । भोजनातें सारिलें ॥९९॥मग यतीसी केलें विचारण । साधकांमाजी अग्रगण्य । रघुनाथ गुरुजींचें स्थान । कोठें तें मज दाखवा ॥१००॥स्वामी बोलते झाले उत्तर । दिनमणी राहतां घटकाभर । दर्शन होईल साचार । एरवीं जातां न घडेची ॥१०१॥तयाप्रती मी वदलों वचन । माझें शुद्ध अंत:करण । असेल तरिच हो दर्शन । तिसरे प्रहरीं होईल ॥१०२॥मग मी निघालों तेथोनी । उतरलों स्वर्धुनीचें पाणी । निरंजन स्थानाखालुनी । घाटावरुतें चढिन्नलीं ॥१०३॥तों दृष्टी पाहिला विर्पसमुदावो । त्यांमाजी योगियांचा रावो । पाहुनी नमनाचा भावो । मम अंतरीं उदेल ॥१०४॥तयासी ऐलिकडॆ टाकून । घाटावरी सुंदरनारायण । तयाचें घेतलें दर्शन । सवेंचि मगें परतलों ॥१०५॥तंव गुरुराज तेथोनि गेला । जैं दरिद्रिया परीस सांपडला । धोंडा ह्मणवूनि झुगारिला ! अक्षोभा उदका माझारी ॥१०६॥कीं मार्ग चालतां श्रांतला । निकट कल्पातरु देखता झाला । त्यागुनी हिवराखालें गेला । अभागिया जैसा पैं ॥१०७॥कां गुराखिया हिरा सांपडला । गार ह्मणुनि विस्तो पाडूं गेला । न पडातां झुगारोनि दिला । उपेगी नाहीं ह्मणवूनी ॥१०८॥कां आकस्मात् दैव उदलें । रोगिया अमृत आंतुडलें । कांजी ह्मणुनी त्यागिलें । अभागिया पुरुषांनीं ॥१०९॥कां धनगर हिंडतां वनीं । आढळती जाहली पद्मिनी । चेष्टा समजूनि मनीं । अरण्यामाजी पळतसे ॥११०॥असो पुढें होईल गुरुदर्शन । सर्व मनोरथ होतील पूर्ण । माझें तुटेल भवबंधन । श्रोते जनीं परिसावें ॥१११॥इतिश्री आत्मप्रचीतिग्रंथ । संमत दत्तात्रय अवधूत । निरंजनीं आत्मप्रचीत । गुरुकृपें जहाली ॥११२॥॥ श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 20, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP