मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार| वर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे ऐतिहासिक तर्क व उपसंहार कलियुगात क्षत्रिय व वैश्य हे वर्ण आनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा अर्वाचीन मनूपासून आनुवंशिकतेची उत्पती पुनरपि गांधर्व विवाह होऊ लागण्याचा संभव वर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे उपाध्यायाच्या गोत्रापेक्षा स्वत:चे गोत्र विशेष इष्ट श्वेतकेतूने केलेला व्यभिचारनिर्बंध पत्याज्ञापालन हेच स्त्रियांचे कर्तव्य भावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप सतीगमन सहगमनाची चाल स्त्रीपुनर्विवाह व पतिसहगमन वाद आरण्यकग्रंथ व सूत्र ग्रंथ वेदमंत्रांचा विशेष विचार भावी मुदतीची लग्ने ‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास समाजधुरीणांचे काव्य व उपसंहार वर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर वर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे Translation - भाषांतर अस्त; वर्णपद्धतीची व्यक्तिनिष्ठता आमच्या समाजाच्या मनातून निघून गेल्यापासून आजपावेतो किती युगे लोटली असतील याची कल्पना करणे बरेच कठीण - प्राय: अशक्यच होय. अलीकडे कोठे कोठे या कल्पनेचा पुन: प्रादुर्भाव होऊ लागला आहे, तथापि या कल्पना संपूर्ण जनसमाजास मान्य होण्यास अजून पुष्कळच कालावधी लागेल. या कल्पनेच्या फ़ैलावाबरोबर आणखीही एका निराळ्या कल्पनेचा निर्णय समाजाकडून होणे इष्ट आहे.ही कल्पना वर्णमात्राच्या गोत्रव्यवस्थेबद्दलची होय. या कल्पनेचे स्वरूप सध्याच्या काळी अगदी विपरीत होऊन बसले आहे; म्हणजे नुसत्या बाह्यत: पाळण्याच्या आचारांसंबंधाने पाहू जाता जरी सांप्रतचे स्वरूप कोणास गैर वाटण्याजोगे नसले, तरी स्वाभिमान, देशाभिमान इत्यादी प्रकारच्या उदात्त तत्त्वांचा नाश तिजपासून होतो व झालाही आहे. ही स्थिती बदलून ती उदात्त तत्त्वे सजीव होणे हे वास्तविक विचार करू जाता विशेष इष्ट आहे. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP