मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वधूपरीक्षेच्या आणखी कित्येक गोष्टी| कामशास्त्रावरून जाणण्याच्या गोष्टी वधूपरीक्षेच्या आणखी कित्येक गोष्टी साधनिक शास्त्रे व त्यांची उत्पत्ती होरा अथवा फ़लज्योति:शास्त्र कन्यापरीक्षेसंबंधाने या शास्त्राधारे पाहण्याच्या गोष्टी वधूवरांच्या ‘ गुणां ’ ची तुलना सामुद्रिक शास्त्राधारे जाणण्याच्या गोष्टी फ़लादेशासंबंधाने मतभेद सौन्दर्याची परीक्षा व स्वभावपरीक्षा पशुपरीक्षेची उदाहरणे कामशास्त्रावरून जाणण्याच्या गोष्टी शकुनशास्त्राचा पगडा व देवादिकांचे कौल देवादिकांचे कौल कामशास्त्रावरून जाणण्याच्या गोष्टी प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर कामशास्त्रावरून जाणण्याच्या गोष्टी Translation - भाषांतर सामुद्रिक शास्त्राशी कामशास्त्राचा मेळ; काशीखंडातील उतारा परिशिष्ट ( क ) : संस्कृतात ‘ कामशास्त्र ’ म्हणून एक विश्सेष शास्त्र आहे, त्यात स्त्रीपुरुष, जातीसंबंधाने अनेक प्रकरची माहिती व विचार लिहिलेले आहेत. या सर्वांचा उल्लेख येथे करण्याचे प्रयोजन नाही, तथापि त्या माहितीच्या पोटी सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रियांचे वर्गीकरन करण्यात आले असून प्रत्येक वर्गाची शुभाशुभ लक्षणेही सांगितली आहेत. यासाठी त्याबद्दलचा थोडासा निर्देश येथे करणे जरुरीचे आहे. ज्योतिषग्रंथात सामुद्रिक शास्त्राच्या पोटी वर्णिल्याचे उल्लेख ज्योतिषग्रंथावरील टीकाकारांनी केलेले क्वचित पाहण्यात येतात.पीयूषधारा नावाच्या टीकाग्रंथात हा विषय काशीखंड नावाच्या पुराणात वर्णिला असल्याचे सांगितले आहे. काशीखंडा ग्रंथ संस्कृत भाषेत असून त्याच्या आधाराने शिवदास गोमा नावाच्या एका कवीने मराठी भाषेत ओवीबद्ध ग्रंथ केला आहे, व त्याच्या ४१ व्या अध्यायात कार्तिकस्वामी व अगस्त्यऋषी यांच्या संवादरूपाने हाच विषय वर्णिला आहे. वर्णन सरळ व सोप्या भाषेत लिहिले असल्यामुळे मूळ संस्कृत ग्रंथाचे अवतरन न घेता या अध्यायापैकी जरुरीपुरता भाग परिशिष्ट ( क ) येथे उतरोन घेतला आहे. वर्णिलेली लक्षणे प्राय: बृहत्संहितोक्त लक्षणांशी मिळती आहेत, तरी स्त्रीजातीचे ( १ ) पद्मिनी, ( २ ) हरिणी, ( ३ ) हस्तिनी, ( ४ ) चित्रिणी, व ( ५ ) वडवा, व ( ६ ) शंखिनी या संज्ञेचे सहा वर्ग पाडण्यात आले असून, पहिले पाच उतरत्या क्रमाने चांगले व शेवटचा वाईट, अर्थात त्याज्य असल्याचे या ग्रंथात वर्णिले आहे, हा या ग्रंथात विशेष आहे. उतार्यात प्रथमत: स्त्रियांची सर्वसामान्य अशी शुभ व अशुभ लक्षणे लिहिली असून, पुढे पद्मिनी इत्यादी प्रत्येक जातीच्या स्त्रीची लक्षणे क्रमाने निरनिराळी लिहिली आहेत. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP