चतुर्थ पटल - सहजोलीमुद्राकथनम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


जर योगीसाधकाचा स्वत:चा बिंदू चलित झाला; तर त्याने योगमुद्रेच्या बंधनाने बिंदूचे वर आकर्षण करावे म्हणजे ढळणार्‍या बिंदूचा अवरोध करावा. या मुद्रेला सहजोलीमुद्रा असे म्हणतात. ही मुद्रा सर्व तंत्रांमध्ये गुप्त आहे.

जरी ( वरील दोन मुद्रांचे ) कार्य एकसारखे असले; तरी संज्ञा भेदामुळे त्यांचे अमरोली व सहजोली हे दोन भेद झाले आहेत. या करिता योगीसाधकाने या दोन्ही मुद्रांचा साधनाभ्यास पूर्ण प्रयत्नपूर्वक केला पाहिजे.

श्रीशंकरे म्हणतात, हे प्रिये पार्वती ! मी हे साधन भक्तांवर प्रेम प्रकट करण्यसाठी किंवा भक्तांवरील प्रेमामुळे कथन केले आहे. हे साधन प्रयत्नपूर्वक गुप्त ठेविले पाहिजे व सामान्य माणसाला किंवा सरसकट सर्वांना देणे उचित नाही किंवा देऊ नये.

या वजोलीमुद्रेपेक्षा अधिक गुप्त असे अन्य कोणतेही साधन या पूर्वी झाले नव्हते अर्थात् भूतलावर अवतरले नव्हते व पुढे कधी होणार नाही म्हणजे प्रकट होणार नाही. या करिता बुद्धिमान् साधकाने प्रयत्नपूर्वक हे साधन गुप्त राखणेच उचित आहे. ॥१००॥

गुरूंनी उपदेश केल्याप्रमाणे मूत्रत्याग करताना अर्थात् लघवी करण्याच्या वेळी साधकाने नेहमी बलपूर्वक वायूचे आकर्षण करून म्हणजे अपानवायू वर खेचून घेऊन थोडी थोडी लघवी करावी व पुन्हा अपानवायूचे वर आकर्षण केले म्हणजे लघवी पूर्ण झाल्यावर अपानवायू वर खेचून घेतला; तर बिन्दू म्हणजे वीर्थ सिद्ध होईल अर्थात् साधक ऊर्ध्वरेता होईल ही बिन्दुसिद्धी साधकाला महासिद्धी प्रदान करणारी आहे याचा अर्थ असा की, वीर्यसिद्धी प्राप्त करण्यासाठी साधकाने हळू हळू थोडी थोडी लघवी करण्याचा अभ्यास केला पाहिजे.

गुरूने शिकविल्याप्रमाणे साधकयोग्याने जर वरील क्रियेचा अभ्यास सहा महिने ( नियमित केला; ) तर अशा साधकाने शंभर स्त्रियांशी संभोग केला; तरी त्याच्या वीर्याचे स्खलन अर्थात् वीर्यपात होणार नाही.

श्रीशंकर म्हणतात, हे पार्वती ! अशा प्रकारे जेव्हा महान् प्रयत्न करून बिंदू सिद्ध होईल म्हणजे साधक ऊर्ध्वरेता होईल तेव्हा अशा साधकाला काय सिद्ध होणार ? याचा अर्थ असा की, साधक ऊर्ध्वरेता झाला की, त्याला सर्व काही सिद्ध होईल. या बिन्दुसिद्धीच्या म्हणजे ऊर्ध्वरेतत्त्वाच्या प्रभावानेच मला म्हणजे शंकराला दुर्लभ ईश्वरत्व प्राप्त झाले आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP