चतुर्थ पटल - जालन्धरबन्धकथनम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


साधकाने गळ्यातील शिरांचे जाळे म्हणजे सर्व शिरा आकुंचित करून हनुवटी हृदयाला लावावी. या क्रियेला जालंधरबंध म्हणतात. हा बंध देवतांना सुद्धा प्राप्त होणे दुर्लभ आहे. बेंबीच्या ठिकाणी असलेला जठराग्नी सहस्रदलकमलातून पाझरणार्‍या अमृताचे पान करतो अर्थात् सहस्रारातून पाझरणार्‍या अमृताचे हा अग्नी भस्म करीत असल्याने त्याचा शरीराला उपयोग होत नाही किंवा ते अमृत वाया जाते. यासाठी म्हणजे त्या अग्नीचे हे कार्य रोखण्यासाठी किंवा थांबविण्यासाठी म्हणजे जठराग्नीने अमृत भस्म करण्याचे कार्य करू नये म्हणू हा जालंधरबंध साधकाने अवश्य केला पाहिजे. याचे तात्पर्य हे आहे की, नाभिस्थित अग्नी म्हणजे सूर्य सहस्रारातून पाझरणार्‍या अमृताचे सतत पान करीत असल्याने माणसाला मृत्यू येतो; परंतु जालंधरबंध हे एक असे साधन आहे की, जे जठराग्नीला अमृतपान करू देत नाही म्हणजे जालंधरबंध केल्यामुळे चंद्रमंडलातून पाझरणारे अमृत सूर्यमंडलात जात नाही अर्थात् हे अमृत जळून भस्म न होता योगी त्याचे पान करून चिरंजीव होतो. ॥६०॥६१॥

या जालंधरबंधाच्या प्रभावाने बुद्धिमान् योगीसाधक स्वत: अमृताचे पान करतो किंवा अमृतपानाची शक्ती प्राप्ती करतो आणि यामुळे अमरत्व प्राप्त करून तो तिन्ही लोकांत आनंदपूर्वक संचार करतो.

हा जालंधरबंध सिद्धांना सिद्धी देणारा आहे. या करिता ज्या साधकाला सिद्धीची म्हणजे शिवशक्तिसामरस्याची इच्छा आहे त्याने या जालंधरबंधाचा नित्य अभ्यास केला पाहिजे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP