चंद्रकलेच्या भंवती अवती - चंद्रकलेच्या भंवती मेघमाल...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


चंद्रकलेच्या भंवती मेघमालिका रांगत होती;
विमल तारका चमचम करिती. शांति दाटली निस्तुल भंवतीं;
सुंदरतेची भगिनी रजनी< प्रेममंदिरीं बसुनी गगनीं
सूत्र जगाचें घेऊनि हातीं, मंजु गायनें गुंफित होती;
चिरविश्रांती निर्भर शांती, दों बाजूला पालविताती;
आंत झोंपलें गोजिरवाणें, रात्रिदेविचें गायन तान्हें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP