TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

बहीणभाऊ - रसपरिचय ५

चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.


रसपरिचय ५
घरांत चंदनाचे पाट आणून ती मांडते. भावासाठीं काय करूं, काय न करूं असें तिला होतें :

चंदनाचे पाट मांडीले हारोहारीं
आज आहे माझ्या घरीं भाऊबीज ॥

कधीं भाऊ भाऊबीजेला बहिणीच्या गरि घरीं येतो किंवा तिला घरीं माहेरीं नेतो. माहेरीं सार्‍या बहिणी जमलेल्या असाव्या. भाऊबीज होऊन जावी. पुन्हा सासरीं जाण्याची वेळ यावी. त्या वेळीं बहिणी म्हणतात :

आम्ही चारी बहिणी चार डोंगरांच्या आड
माझ्या भाईराया खुशालीचें पत्र धाड ॥
आम्ही चौधी बहिणी चारी गांवाच्य चिमण्या
सख्या भाईराया आम्ही घटकेच्या पाहुण्या ॥

दादा, वर्षांतून एकदां आम्हांला भेटत जा, एकदां आणीत जा. आम्ही घटकाभर राहूं, प्रेम लुटूं व उडून जाउं, एक चार आण्यांचा साधा खण व रात्रभर तुझ्या घरीं विसांवा. दुसरें कांहीं नको  :

बहिणीला भाऊ एक तरी गे असावा
पावल्याचा खण एका रात्रीचा विसांवा ॥

माहेरीं गेल्यावर भाऊभावजय कशीं वागतात तें बहिणींना कळून येतें. भावजयीला बहिणी म्हणतात :

दसरा दिवाळी वरषाचे दोन सण
नको करूं माझ्यावीण वयनीबाई ॥

माहेरीं जावें तों भावजयीला बरें वाटत नाहीं. नणंदा कशाला आल्या असें त्यांना वाटतें :

गोर्‍ये भावजयी नको बोलूं रागें फार
आल्यें मी दिवस चार माहेराला ॥

परंतु ही प्रार्थना फुकट जाते. धुसफूस सुरू असते. बहीण मनांत म्हणते :

गोरी भावजय गर्विष्ठ बोलाची
मला गरज लालाची भाईरायाची ॥
भाऊ ग आपला वयनीबाई ती लोकांची
मनें राखावीं दोघांचीं ताईबाई ॥

भावजयीचें वतेंन पाहून बहिणीला वाईट. आपल्या भावाला वैनी बोलते हें पाहून बहीण कष्टी होते :

गोर्‍ये भावजयी नको बोलूं एकामेकी
हळुवार भावजया चंद्र कोमेजेल एकाकी ॥
गोर्‍ये भावजयी किती उर्मट बोलणें
मन दुखवीलें माझ्या भावाचें कोंबळें ॥
गोर्‍ये भावजयी किती बोल रागाचे
फूल कोमेजलें  देवा शिवाशंकराचें ॥
गोर्‍ये भावजयी किती बोल अहंतेचे
फूल कोमेजलें ममतेचे ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:37.1570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

काढवणी

  • न. काढलेले पाणी . ( ह्याच्या उलट प्रवाहानें अगर पोटानें वाहात येणारे पाणी ). ( काढते + पाणी ) 
RANDOM WORD

Did you know?

सर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.