मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग| उपदेश विठाचे अभंग करुणापर मागणें साधुसंतजना करितों प्रार्थ... मग साधुसंत म्हणती विठ्या ... विठा नामायाचा आला पंढरपुर... पूर्वजन्मीं आराधितां । तु... आमुचा नामा तुज गोला निरवु... आमुचें ठेवणें जुगादीचें न... हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्र... आमुचा बाप अग्रज तुझा । तू... माझिया बापाचा तुजपाशीं ठे... मायबापें काय नसती आमुचीं ... खवळलें आतां न भियेंरे तुज... तुज काय देवा न पुरतें आले... उदार चक्रवर्ती लक्ष्मीचा ... माझिया बापाची मिराशी गा द... हाट करी आम्ही आठवडे मुळीं... माझिया बापासी तुझाचि विश्... भूतळीचीं तीर्थें नामा जंव... माझ्या ठेवी दाखवीं लवलाही... पंढरीराया माझिया बापें । ... तुझ्या प्रेमाचे कारणे । म... तुजसारिखा पंढरिनाथा । स्व... जननी बाळका कोपे रागें । प... हिंडतां श्रमलों बहु श्रम ... जननी बाळकांचें जीवन । जरी... आमुचा बाप आम्हां सांगे । ... पितृभजन जरी पुंडलिक न करि... माझे बापाचे निधनें वडिवार... उदमाचा करून झाडा । कर्म क... निज आत्मज्ञान डोहीं । जे ... तुझे पाय माझिया गळ्यासी ।... खेचरापासी जाय पुससी सागसी... तंव धांउनी गेला चरणीं लाग... केशवाचे पाय जाणें मी आणि ... चराचरीं जाणा एक खेचरू । त... तंव खेचरु ऐसी शिकवण खोली ... सुखाचा निज ठेवा तुमचा केश... माझा बाप माच विठोवा रखुमा... उपदेश गौळण गोंधळ विठाचे अभंग - उपदेश संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या Tags : abhangnamdevpadvithaअभंगनामदेवपदविठा उपदेश Translation - भाषांतर १. देहसमय अंतीं इष्टमित्र मिळती । सांभाळा म्हणती मुलें माझीं ॥१॥स्त्री धनधान्य ते निरवुनी जात । आपुलें स्वहित विचारीना ॥२॥गाडे घोडे म्हौसी सेवक आणि दासी । सांडोनियां जासी एकलाची ॥३॥मी कोणरे काय कसा आलों येथें । हित कीं अनहित करोनी जातों ॥४॥हें तंव सूचेना नाठवे ज्याच्या मना । जुंपिलें तें घाणा चौर्यांसींच्या ॥५॥विठा म्हणे तया कोण सोडविता । वेगीं पंढरिनाथा शरण जावें ॥६॥२. माळा मुद्रा सोंग घेऊन होती संत । सदा विषयांत चित्त त्यांचें ॥१॥पोटासाठी एक घेऊनियां वेष । ठकविती देश रांडापोरें ॥२॥पाषाण बांधोनि नदीये निघाला । सांगा कोण गेला पैलतीरा ॥३॥ब्राम्हणाचे परी मैंद वेष धरी । घालावया करीं फांसे जैसे ॥४॥विहा म्हणे संतन म्हणता त्यासीं । जाती नरकासी अध:पाता ॥५॥३.उदर भरावया घेऊनियां सोंग । घरोघरीं बोंब उपदेशाची ॥१॥आपणा कळेना कळेना लोकां सांगे ज्ञान । धरूनियां ध्यान बक जैसा ॥२॥आपण बुडाले आणिकां बुडविती । हात धरुनी जाती यमलोका ॥३॥दुरी पंथ जाणे तया यमपुरी । पापाची शिदोरी बांधोनियां ॥४॥विठा म्हणे काय करूं त्याच्या कपाळा । पापाचा कंटाळा न धरिती ॥५॥४. मांजराचे डोळे गेले । उंदिर धराया तळमळे ॥१॥तैंसा नव्हेरे संन्यास । धांवे विषयावरी हव्यास ॥२॥वेश्या झाली पट्टराणी । स्मरीना पूर्वील करणी ॥३॥सर्प प्रतिवर्षीं पालटे । परि अहंकार न पालटे ॥४॥पहिलें पोशिलें मर्कटा । कोणें शिकविल्या चेष्टा ॥५॥म्हणे नामयाचा विठ । विज्र लागो या ल्ल्लाटा ॥६॥५. कामधेनु गाई घालुनी बाहेरी । ताक घरोघरीं मागतसे ॥१॥कल्पतरु वृक्ष असे ज्याचे घरीं । तो कां दारोदारीं भीक मागे ॥२॥ऋद्धि आणि सिद्धि विठोबाच्या दासी । तया ह्रषिकेशी शरण जावें ॥३॥इंद्र आणि चंद्र विठोबाचे किंकर । देव सुरवर ध्याती ज्यातें ॥४॥राव आणि रंक विठोबाचे मागते । ते कायरे तूंतें देती बापा ॥५॥ऐसा कोण आहे सर्व पुरविता । एका भग वंता वांचोनियां ॥६॥मुखीं नाम असें पुण्य ज्या पदरीं । कळींकाळावरी सत्ता त्याची ॥७॥विठा म्हणे शरण जाय ह्रषिकेशी । मग निजसुखासी पावसील ॥८॥६. जाति ज्ञान नाहीं मति ज्ञान फर । फुंजे दंभाकार लौकिकांत ॥१॥तेथें माझ्या मना नव्हे समाधान । न पाविजे खूण संतांवीण ॥२॥संत तेचि जाणा शांत ज्याचें मन । अणूचें प्रमाण दुजें नाहीं ॥३॥विठा म्हणे तेथें स्थिरावलें मन । झालें समाधाम त्याचेसंगें ॥४॥७. अनंत अपरंपार नाम हें सधर । नाम सुखसागर अमृत लहरी ॥१॥नाम हेंचि तारूं नाम हेंचि तारक । भवमूळ छेदक नाम तुझें ॥२॥नाम हेंचि जीवन नाम हें निधान । नाम हें कारण आनंदाचें ॥३॥नाम हें सांठा तोचि वैकुंठींचा मोठा म्हणतसे विठा नामयाचा ॥४॥८. नाम तारी पतितासी । ते कां अव्हेरी भक्तांसी ॥१॥प्रेमळ देवा चें लडिवाळ । करी निजांगें प्रतिपाळ ॥१॥सेवाऋणें वागवी भार । जन्मोजन्मींचा दातार ॥२॥स्वामि स्वये अंगिकारी । वोळगा कांहो दारोदारीं ॥३॥निष्ठुर नव्हे कोणेकाळीं । कृपाकटाक्षें कुरवाळी ॥४॥दास विठा म्हणे वेगें । यात्ने जावें माझें संगें ॥५॥९. हरि म्हणा हरि म्हणा अहो जन । आणिक बोलाल तरी विठ्ठलाची आण ॥१॥अहिल्या पाषाण अजामेळ कुळहीन । उद्धरिला दर्शनें वाल्मिक जाण ॥२॥नामयाचा विठा संतचरणीं ठेवोनि माथा । कीर्तनेंबीण वृथा नको गोष्टी ॥३॥१०. धर्म अर्थ मोक्ष काम । हाकारितां रामराम ॥१॥जें जें आवडे मनासी । त्यानें जावें पंडरीसी ॥२॥चला आनंदें कौतुकें । पेठ भरली पुंडलिकें ॥३॥न चले कोणाची थोरी । राया रंका एकी खरी ॥४॥सांडोनियां आहे भाव । हाचि करावा व्यवसाव ॥५॥विठा म्हणे विष्णुदास । आणिक न लगे सायास ॥६॥११. बरवें बरवें वाळचंद्र । काय इच्छिसी वैकुंठ ॥१॥हें सुख तेथें नाहीं । मुक्ति घेउनी करिसी काई ॥२॥म्हणे नामयाचा विठा । बापा नको जाऊं वैकुंठा ॥३॥१२. देखुनी पंढरीच्य सुखा । मोक्षपद आलें फुका ॥१॥अवघें विठ्ठलचि झालें । येणें पुंडलिकें केलें ॥२॥ऋद्धि सिद्धि पंढरपुरीं । होवोनी वोळती कामारी ॥३॥मुक्ति वागती अंगणीं । घरोघरीं वाहे पाणी ॥४॥तीर्थ चिंतवणी करिती । पुढें आमुची कोण गती ॥५॥आला कळिकाळा त्रासू । विठा म्हणे विष्णुदासू ॥६॥१३. बहुतां पुंण्याचे कष्ट । त्यासी प्राप्त हें वैकुंठ ॥१॥तैसी नोहे ही पंढरी । पतित पापियातें तारी ॥२॥बहुता तपाचें प्रत्यक्ष । त्यासी अपकारी मोक्ष ॥३॥जेणें केलीं तप तीर्थें । तोचि आवडे मुक्तीतें ॥४॥देह यासी नानविधि । त्यासी प्राप्त होय सिद्धी ॥५॥विठा म्हणे नामघोष । पळ काढील महा दोष ॥६॥१४. ज्यासी नावडे पंढरी । तोचि वसेल अघोरीं ॥१॥त्यासी जाची यमदूत । सकळ पूर्वजांसहित ॥२॥जया नावडे हरिनाम । तया कुंभपाकीं धाम ॥३॥जया नावडती संत । ते चालती यमपंथ ॥४॥जया नावडे भीमरथी । तेचि अघोरीं पचती ॥५॥या बोलाचा धरीं विश्वास । विठा म्हणे विष्णुदास ॥६॥१५.हरिकथा ऐकतां संसार आठविती । तयाच्या सुकृति अवघा नाशा ॥१॥निश्चित होऊनि ऐकतां श्रवणीं । यमाची करणी न लगे कांहीं ॥२॥आतां रामकृष्ण म्हणे कांरे वाचा । कळिकाळ मोचा बाहतील ॥३॥विठा म्हणे संतीं अवधान द्यावें । ह्रदयीं धरावें केशवनाम ॥४॥१६. काय गाणीव काय जाणीव । काय शहाणीव कीर्तनाची ॥१॥थाक तोडिलें डोळे मोडिले । लोकां मानवलें बरें गातो ॥२॥हरिचें नाम तूं नेणसी । वांयां कीर्तनीं उभा ठाकसी ॥३॥हरीचें नाम तुम्ही गारे प्रेमें । विठा म्हणे माझ्या बापाच्या नांवें ॥४॥१७. जैसा आंबा वर्षत पाडी । तैसी धरीं गोडी कीर्तनीं नाचें ॥१॥न करी घातमात न लावी वेळू । तेणें हा गोपाळू अंतरला ॥२॥दुधावरील साय मधेसी गोडी । तैसी धरी आवडी रामनामीं ॥३॥जतीचा साटा तो वैष्णव लाटा । म्हणतसे विठा नामयाचा ॥४॥१८. यात्रे बोलावितो हरी । कांहो नवजा पंढरी ॥१॥विठोबा कृपेचा कोंवळा । बहु भक्तांचा कळवळा ॥२॥भक्त आठवती चित्तीं । देवा वाटे परम खंती ॥३॥देव अवज्ञा अनुचित । पृथक सत्ता आत्मघात ॥४॥ऋण वारी भगवंत । दुबळा नव्हे लक्ष्मीकांत ॥५॥दास विठा म्हणे त्वरा । यात्ना पंढरीची करा ॥६॥१९. द्रौपदीचें थालीपात्र । त्यांत कैंचे शाखापत्र ॥१॥माव याची अभिन्नव । वाव मानसीं उपाव ॥२॥जंव लाधला तो आपण । केलें तृप्त त्रिभुवन ॥३॥सेवा घेउनी सारी काम । अंगें चैतन्य निष्काम ॥४॥याच्या छळें आकर्षिला । बळिचा द्वारपाळ झाला ॥५॥भक्तियोगें द्वेषेंभयें । वेघ लाउनी सन्मुख होये ॥६॥दोही बाही आपण देव । काय नेणा पंढरिराव ॥७॥दास विठा म्हणे धंदा । कृपा देवाची सपादा ॥८॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP