मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग|
तंव खेचरु ऐसी शिकवण खोली ...

विठाचे अभंग - तंव खेचरु ऐसी शिकवण खोली ...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


तंव खेचरु ऐसी शिकवण खोली । कैसी खूण लाधली सांग विठया ॥१॥
जयाचा तुज जाहला बहुत । तो झाला शरणागत विठोबासी ॥२॥
वेद पुराणें शास्त्रें ते साक्ष देती । में खेचर म्हणती ब्रम्हाबीज ॥३॥
भारत आणि भागणस जया मुखें पाठ । संध्यागाचत्री निंष्ठा त्रिकाळ जप ॥४॥
जें केशवासी न कळे अखंड दंडे । ऐशीं बोलणीं उदंडें बोलोनी जाती ॥५॥
जाती आणि गोत वडील लहान थोर । अवघें पंढरपुर साक्ष देती ॥६॥
साधुसंतजन आणि महानुभाव । हरीचे दास सर्व सांगताती ॥७॥
जें खेचर बिसोणा ज्ञानघण लाबला । ठेवा तो दिधला नामयासी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP