मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|करुणाष्टकें| अष्टक ४ करुणाष्टकें अष्टक १ अष्टक २ अष्टक ३ अष्टक ४ अष्टक ५ अष्टक ६ अष्टक ७ अष्टक ८ सवाया करुणाष्टकें - अष्टक ४ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ अष्टक ४ Translation - भाषांतर उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरें सर्व सेव्वा करावी । सदा प्रीति लागो तुझे गुण गातां । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥१॥तुझें रूपडें लोचनीं म्यां पहावें । तुझे गूण गातां मनेंशी रमावें । उठो आवडी भक्तिपंथेंचि जातां । रघूनाय० ॥२॥मनीं वासना भक्ति तूझी करावी । कृपाळूपणें राघवें पूरवावी । वसावें मदीयांतरीं नाम घेतां । रघूनाय०॥३॥सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणीं देह माझा पडावा । उपेक्षूं नको गूणवंता अनंता । रघूनाय०॥४॥नको द्रव्य दारा नको येरझारा । नको मानसीं ज्ञान-गर्वें फुगारा । सगूणीं मला लविं रे भक्तिपंथा । रघूनाय०॥५॥भवें तापलों प्रीतिछाया करावी । कृपासागरें सर्व चिंता हरावी । मला संकटीं सोडवावें समर्था । रघूनाय०॥६॥मनीं कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसावी । नको संशयो तोडि संसारवेथा । रघूनाय०॥७॥समर्थापुढें काय मागों कळेना । दुराशा मनीं बैसली हे ढळेना । फुटे संशयी नीरसी सर्व चिंता । रघूनाय०॥८॥ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावें । सुटे ब्रीद आम्हांसि सोडोनि जातां । रघूनाय०॥९॥॥ जयजय रघुवीर समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP