मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|मानसपूजा| प्रकरण २ मानसपूजा प्रकरण १ प्रकरण २ प्रकरण ३ प्रकरण ४ प्रकरण ५ प्रकरण ६ प्रकरण ७ प्रकरण ८ मानसपूजा - प्रकरण २ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ प्रकरण २ Translation - भाषांतर ॥ श्रीराम समर्थ ॥ ॥ आतां पारिपत्य ऐकावें । उत्तम गुणाचें आघवें । जयांस देखतां मानवे । विश्वलोक ॥१॥धीर उदार सुंदर । दक्ष व्युत्पन्न चतुर । सकळ प्रयत्नीं तत्पर । अत्यादरें ॥२॥दूरदृष्टी दीर्घप्रयत्नी । समय प्रसंग जाणे चिन्हीं । नासला फड नेटका वचनीं । बोलोन करिती ॥३॥जाणती दुसर्याचें अंतर । सावधानता निरंतर । नेमस्त न्यायाचें उत्तर । बाष्कळ नाहीं ॥४॥पवित्र वासनेचे उदास । केवळ भगवंताचे दास सारासारविचारें वास । हदयीं केली ॥५॥अगाध अव्यग्र धारणा । मिळोनि जाती राजकारणा । कार्यभागाची विचारणा । यथायोग्य योजिती ॥६॥न्याय नीति मर्यादेचा । स्नानासंध्या पवित्र तेजा । सत्यवादी बहुत ओजा । अन्याय क्षमित ॥७॥चुकणें विसरणें असेना । मत्सर पैशून्य दिसेना । कोप क्षणिक असेना । निरंतर ॥८॥हरिकथानिरूपण । तेथें प्रेमळ अंत:करण । पाहों जातां उत्तम लक्षण । उत्तम असे ॥९॥ऐशा प्रकारचें पारपत्य । करूं जाणती सकळ कृत्य । धन्य धन्य कृतकृत्य । नि:कामतेनें ॥१०॥ऐसे भले परमार्थी । श्रवण मनन अर्थाअर्थीं । जे परलोकींचे स्वार्थी । परोपकारी ॥११॥॥ इति श्रीमानस. ॥११॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP