मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक|

स्फुट श्लोक - श्रीपत्रिकेला लिहिलें विध...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


श्रीपत्रिकेला लिहिलें विधीनें । हनुमंत आला निरावधीनें ।
सौमित्र वाची सुख राघवाला । अत्यंत प्रेमा कपिपुंगवाला ॥१॥
विबूध बंदीं पडिले कृपाळा । किंचीत वार्ता ऐके भुपाळा ।
गालीप्रदाने वर मारा सूरा । दया न दीसे कपटी असूरां ॥२॥
त्रैलोक्य वंदी गजाननला । तो भीत ह्रदयीं दशाननाला ।
आखंड कष्टी वळितो खरासी । हे दीनबंधू करुणैकरासी ॥३॥
सटवेश्वरीचा तो दोष मोठा । प्रसूतिकांच्या शिरीं वस्त्र मोटा ।
अपमान द्बारीं दीवाकरासी । हे दीनबंधू करुणैकरासी ॥४॥
सुरेंद्र माळी करि पुष्पमाळा । नाना प्रकारें झळके उमाळा ।
देखोन दचके दशाशिरासी । हे दीनबंधू करुणैकरासी ॥५॥
चत्वारशृंगी त्रिपदीं च चाले । त्रिकूटसिखरीं कांहीं न चाले ।
प्रक्षाळितो वस्त्र मळीण रासी । हे दीनबंधू करुणैकरासी ॥६॥
तो येम नैऋत्य जळाधिकारी । लंकेश देखोनि तया धिकारी ।
पानार्थ पाणी विंशतीकरासी । हे दीनबंधू करुणैकरासी ॥७॥
वारा भरारा दरबार लोटी । शषांक बोटी दिनमान लोटी ।
तो मुख्य छत्रा फिरवी करासी । हे दीनबंधू करुणैकरासी ॥८॥
मल्हार१ मार्तंड हज्यामतीचे । उत्पाटितो वाळ लंकापतीचे ।
सन्नीध भीतो दशकंदरासी । हे दीनबंधू करुणैकरासी ॥९॥
चंडी प्रसंगें फिरवी दुराई । जयेसि म्हणती माता चिराई ।
प्रगटोनि मारी म्हैसासुरासी । हे दीनबंधू करुणैकरासी ॥१०॥
कल्याण दासां करी रामराया । लंकार्णवीं देव जाले मराया ।
सांगे विधाता तिथि वार रासी । हे दीनबंधू करुणैकरासी ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP