मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक|

स्फुट श्लोक - तारापती द्वंददु:खे भिकारी...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


तारापती द्वंददु:खे भिकारी । तो सीघ्र केला राज्याधिकारी ।
नवाजणें भक्त धनोर्धरासी । हे राम विश्राम कल्याणरासी ॥१॥
कृष्णात्मजारी अनिळात्मजू तो । श्रीरामपायीं येकात्मजू तो ।
अद्‍भूत शक्ति देणें विरासी । हे राम विश्राम कल्याणरासी ॥२॥
पीयूषरंगीं समता उडाली । कपीकूळवल्ली गर्जे बुडाली ।
रघूराजसत्ता१ पुरंधरासी । हे राम विश्राम कल्याणरासी ॥३॥
सुरेंद्र वृष्टी करी सूमनेंसी । तो राम माझा धरी सूमनेंसी ।
प्रतापसिंधू सोडी सुरासी । हे राम विश्राम कल्याणरासी ॥४॥
पदोपदीं नाम घेतां जिवासी । ते जीव तुकती सदा शिवासी ।
लंघूनि जाती या भवपरासी । हे राम विश्राम कल्याणरासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP