चक्रव्यूह कथा - प्रसंग सहावा

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


श्रीकृस्णायन्मा : पांडव मनी हासत : स्तुति देवाची करीत : कर जोडोनि वीनवीत : जी आमची कीर्त किली : ॥३६॥
यावरी धर्म म्हणे : आमुचे राखीले प्राण : सर्वा ठाई नारायेण : देवराया तु ॥३७॥
ऐसी अस्तुती करीता : वीस्तारा जाईला कथा : देव जाला वारीता : म्हणे चाला मेलीकारासी ॥३८॥
येंरीकडे कौरववीरी : युद्धे करीता ते आवस्वरी : आले मेलीकारी : तेथें विचार करीती : ॥३९॥
म्हणती दीवसाची केली राती : कौशाल्ये कृस्णाची न कळती : आता पांडव जींतीती : हा निर्धार जाला ॥४०॥
गांधार गुरूसी बोले : कृस्णे कौशल्य केलें :जईद्रथासी वधीले : राखील पांडवासी ॥४१॥
द्रोण म्हणे गांधारासी : तो सारथी पांडवासी : क्षये करीले तुम्हासी : राज्य देईल पांडवाला ॥४२॥
फरुस (राम) जिंतुन : काळकाम अंकना घालुन : तो रणी सारीला गंगानंदन : त्याची कौशाल्ये न कळती ॥४३॥
त्रीलोकीचे दैत्य वधीले समस्त : त्याचे कौशल्ये न कळत : तेथें ब्रह्मादीकासी अंत : कोठे लागे ॥४४॥
तुमचा केव्हाडा केवा : जे तुम्ही जींता पांडवा : हा भ्रम न धरावा : वायावीण ॥४५॥
तो तुम्हा वधीला समस्ता : राज्ये पांडवासी देईल आतां : गुरू जाला बोलता : गांधारासी : ॥४६॥
ऐसे आइकुनी बोलन : गुऋसि म्हणे दुर्योधन : ऐसे यासी काय करण : ते सांगीजो जी ॥४७॥
गुरू म्हणे होय बोलता : जरी होईजे सरनांगता : तरी वाचाल आता : यर्‍हवी मराल नीभ्रांत जाणा ॥४८॥
मग दुर्योधन म्हणे : साभिमान न सांडणे : जीन होय अथवा मरणे : परि सरण केसवा न जाउ ॥४९॥
गुरू म्हणे गांधारा : आता चाला मेलीकारा : उदयो होईल दीनकारा : मग भलते वीचारू ॥५०॥
ऐसें विचारूनी गांधारू बोलीला : तव पाहारू पाहाटिचा जाला : तवं दिवस उगवला : पुडा कैसे वर्तले : ॥५१॥
मग दुर्योधन आला : गुऋच्या चरणासी लागला : मग पुजीता जाला : सोडस उपचारी : ॥५२॥
कर्ण आस्वस्थामा ते अवस्वरी : कृपाच्यार्या आला झडकरी : मग वैसले वीचारी : ते समई : ॥५३॥
म्हणती कौशाल्य देवो केलें : जईद्रथातें वधीले : वीर रणि पाडिले : नावनीके देखा : ॥५४॥
दुर्योधन जाला बोलता : आता काय चिचारीता :शाभिमान सांडिता : जगत्र हासैल : ॥५५॥
तरी जावों जीवे : परि सरणागत न व्हावे : ऐसे जाउनी सांगांवे : द्रोणाच्यार्यासी ॥५६॥
मग कृपाचार्या म्हणे : सैन्ये दो ठाई करणे : आस्वस्थामा म्हणे : आम्ही जाउ वेगळेचि ॥५७॥
कर्ण आणी द्रोणे : आर्जुनासी वेगळे नेणे : भीमा संव्हारणे : आम्ही दोघे जणि : ॥५८॥
भीम संव्हारीलीयांवरी जाणा : या दोघामध्ये एक होय उणा : येरा सहज नीदाना :जाले असे ॥५९॥
लकुळ शाहादेवा : संव्हार तुम्हीं करावा : धर्म जीतचि धरावा : मग पण करावा साचार तुम्ही ॥६०॥
ऐसा करुनि नीर्धारु : दो ठाइ केला दळभारू : मग नीगाला गुऋ : रणभुमिसी ॥६१॥
तेथें पांडवाचे हेर होते : तेही सांगीतीले नीरुते : मग जाले नीगते : कृस्ण आर्जुन ॥६२॥
ते रणभुमीसि आले : कौरवभार देखिलें : दो ठाईं केलें : तियेवेळी ॥६३॥
मग देवे काय केलें : भीमाते पाचारीलें : तुमचे वेगळे नेले : ऐसे जाणा ॥६४॥
श्रीकृस्ण म्हणती सात्वीकासी : तुम्ही जतन करावे यासी : राखावें भीमासी : युद्ध करीतां ॥६५॥
भीम मोटा उधट : युद्धासी आसे नीट । हा भरील घोट : कौरवाचा ॥६६॥
यासी बरवी आगवण : हा न मरे शस्त्रान : हा नेणें मरण : उठावलीया ॥६७॥
लाहान थोर न वीचारी : हा नेटैल सरधारी : तेथे तुम्ही शाहाकारी : व्हाव यासी ॥६८॥
मग म्हणे भीमासी : तुम्ही बुधी करावी ऐसी : कुंजरा आस्वस्थामयासी : वधावे सर्वथा : ॥६९॥
तुम्ही अस्वस्थामा व धावा : हा बोले प्रतीज्ञा घ्यावा : मग तुम्ही करावा सींहीनाद ॥७०॥
आपुले (दळ) भारी : तुराचा गजर करी : सींहीनादाची थोरी : बहुत करावी ॥७१॥
सात्वीकासी सवे पाठविले : आणिक वीर आज्ञ्यापीले : वैराटासी म्हणतीले : कोंतीभोज वीरराज ॥७२॥
भोज आणि विरराजे : शाहादेव शुशुपाळ आत्मजे : तुम्ही सांगाते जाईजें : भीमाचीया ॥७३॥
ते हाणीती वरकोदरा : त्याचि शस्त्रे तुम्ही नीवारा : भीम मारील कुंजरा : ऐसी आज्ञा दीधली ॥७४॥
तेथे कर्ण द्रोणे : अच्यार्या आस्वस्थामा आपणे : वेगळे नेईजें म्हणे : भीमसेनासी ॥७५॥
ते जाले नीगते :पाठविले बंदीजनातें : अस्वस्थामा म्हणे तयाते : भीम संग्रामा आनावा :॥७६॥
ते पढती भीमाचे पवाडे : कालीवीर मारीले गाढे : आजि संग्राम नीवाडें : आस्वस्थामयासि ॥७७॥
देवा आणि धर्मासि : नकुळ शाहादेवासी : पुसुनि नीगे संग्रामासि : भीमसेन तो ॥७८॥
देव म्हणे भीमसेनाते : तुज सांगीतले होते : तुवा वधावें कुंजराते : ते वीसरु नको ॥७९॥
पुनरपी म्हणे श्रीकृस्णनाथे : मग म्हणे वीराते : तुम्ही राखावे भीमाते : मग पाठविले ॥८०॥
तव ईकडे कर्ण आणि द्रोण : तेही पाचारीला आर्जुन : दोघा मिळुनी संधान : करीताति : ॥८१॥
ते दोघे धनुर्धर : शस्त्रें वर्सती अपार : बाणी भरिले अंबर : सुर्येंकीर्ण दीसेना ॥८२॥
पार्थ तोडि त्या शस्त्रांतें : आणिक बाणजाळ घाली ते : बाणाने बाण नीवरीतें : दोघा वीराचे ॥८३॥
आणिक नीर्वाण : खडतर वर्सती बाण : ते पार्थ आपण : तोडीता जाला ॥८४॥
बाण येति लक्षें क्रोडी : अर्जुन वरिच्यावरि तोडी : सराने सर पाडी : धरणिवरि : ॥८५॥
दोघे दोघीकडोनी : वर्सती तीखटा बाणी : अर्जुन द्दढ संघानी : तोडी क्षीण न लगतां ॥८६॥
आणीक वीर बहुत : शस्त्राधारी वरुसत : तेही पार्थ तोडीत : माहा नीर्वाण ॥८७॥
ऐसे वरसती सरधारी : येंकलीया पार्थावरी : अवघियांचि संधान निवारी : ॥८८॥
आनीवार बाण आले : ते हणुमंतानें देखीले । घ्वजीहुनी मोडीले : पवनपुत्रे ॥८९॥
द्रोण म्हणे हणुमंता : तुम्ही बाण का मोडीता : तो म्हणे येकलया पार्था : तुम्ही बहुत वीर : ॥९०॥
यकाते बहुत हाणती : हे नवे संग्रामाची रीती :आम्ही देखील बहुती : परी ऐसी रीती नाहीं ॥९१॥
बाण एती खडतर :वरसती सरधार : पार्थ वरिच्यावर : तोडित असे ॥९२॥
बाणा पाठी ती बाण : आती तीखट दारुण : आर्जुने बहुत रण : पाडीयले ॥९३॥
पार्थ नीवारी त्या बाणाते : आणीक संधान केला निरुते : हाणीतीले कर्नातें : बाण सात ॥९४॥
सारथी अनी वारु : त्याचा केला संव्हारु : मृर्छागत कर्णवीरु : पाडियेला ॥९५॥
मग पंडुसुते : हाणीतीले बाणी त्याते : ते बाण द्रोणाते : लागते जाले : ॥९६॥
जैसंचि जाले कर्णा : तैसेची जाले द्रोणा : मग सैन्य आले रणी : कौरवांचे ॥९७॥
ऐसे ईकडे वर्तले : तव तीकडे भीमे काए केले ॥ गदेत प्रजिले : उतरला चरणाचारी ॥९८॥
पवनगती धावीनला : कौरवभार मोडीला : तव सात्वीक पावला : मीसळला सैन्याते ॥९९॥
आच्यार्या अस्वस्थामा मीळुनी : भीम हाणीतीला तीखटे बानी : तोडुनी पाडिले धरनी :सात्वीकाने ॥६००॥

कौरव शरधारी वरुसत : ते सात्वीक तोडीत : भीमाचे वाजती गदाघात : कृपाचार्यावरी ॥१॥
मग द्रोणनंदने : भीम हाणीतीला पाचा बाने : ते शीशुपाळनंदने : तोडीयले ॥२॥
सैन्ये बहुत संव्हारीले : कौरवदळ भंगले : मग भीमे टाकीले : गजदळ : ॥३॥
ते वेळी तो कुंजराचा भारू : संव्हारीतो वरकोदरू :तेथें माग केंला थोरू : गजदळाचा : ॥४॥
हास्तीने हस्ती हानते : घे घे पुढीलाते म्हणते : ऐसा मार बहुतें : करी वरकोदरु : ॥५॥
अकासा पोकळी : गज टाकीतीये वेळी : तो भीम माहाबळी : संव्हारी कुंजराते ॥६॥
गजाने गज घोडयाने घोडा : करी रथाचा रगडा : तव देखीला पुडा : हस्ती आस्वस्थामियाचा ॥७॥
मग धाउनी वेगउत्तर : पाई धरीला तो कुंजर : तयाचा केला संव्हार : वरकोदरे : ॥८॥
कुंजर अस्वस्थामा मारीला : कौरवि हाहाकार केला : भीम गर्जीनला : सींहीनाद ॥९॥
आस्वस्थामा मारीला : हा बोल प्रर्वतला : तव गजर जाला : रणतुराचा ॥१०॥
कौरवदळ भंगले : ते पळतें द्रोणापासि गेलें : तेही सांगीतले :अस्वस्थामा वधीला :॥११॥
आस्वस्थामा रणी पडिला : हा बोल समस्ति आईकीला : तव भीमे दुत पाठविला : देवापासि ॥१२॥
ऐसे श्रीकृस्णे आईकीले : मग संखस्फुरान केलें : रण बंबाळ जाले : तियेवेळी ॥१३॥
अस्वस्थामा वधीला : वरकोदर वीजया जाला : तुराचा गजर जाला : हा आईकीला सर्वत्रि ॥१४॥
ते वेळी रुसीकेसी : संचारला द्रोनाचा मानसी : भ्रम पाडिला त्यासी : तये वेळी ॥१५॥
मग तो जाला भ्रमिस्त : विरा समस्ता पुसत : आस्वस्थामायासी केला घात : काय भीमसेने : [सोध] ॥१६॥
वीर भंगले होते : द्रोण पुसे त्याते : भीमे अस्वस्थामयाते : काये मारीले : ॥१७॥
ते म्हणती पांडवाची आली गुढी : हे मात आईकीली फुडी : द्रोणे सेवीली मृतीकेची कुडी : रथाखाली पाडला : ॥१८॥
मग तेथे कर्न आला : द्रोणासि म्हणता जाला : भीम आस्वस्थामा मारीला : हे सत्ये कि लटिकें : ॥१९॥
द्रोण धर्मापासि आला : त्यासी पुसता जाला : भीमे आस्वस्थामा वधीला : हे सत्ये की मिथ्या : ॥२०॥
धर्म म्हणे द्रोणा : आम्ही आईकीले वचना : वधीला आस्वस्थामा जाणा : नर अथवा कुंजर ॥२१॥
नरो वा आईकीला कानी : कुंजर बोलती जनी : हे न कळे आम्हा लागुनी : मजप्रती ॥२२॥
सकळ जन परीवारलें : वेगी वैकुंठासी गेले : आनंद पावले : सकळ जण ॥२३॥
जे जे पढले जुझा : त्याचि होत असे पुजा : करी स्वर्गीचा राजा : इंद्र देखा ॥२४॥्ल्ल्ल्ल
येथुनी चक्रवीहु जाला : स्त्रोतांजणी आईकीला : नामा वीष्णुदास बोलीला ॥ दास श्रीकृस्णाचा ॥२५॥
॥ प्रसंग शाहावा ॥६॥ ग्रंथसख्या वोवीया सा सत पंचवीस ॥६००॥२५॥६२५॥

बहुधान्येत्सर दीन सुक्रवार लीखीत जाले प्रहार पहीला : मास सुध स्रावण : चर्तुदिन लीखीत जाले देस श्रीवाळ ग्राम नावं गुळवंचे : चक्रवीहु संपला : हस्त अखेर : णी मुणी गोवींदाचे वीले सेवलीकर गेले ठेलें क्षमा करावी : प्रत लीखीत पें मम दोस ण लीपित : वाचीता वीजया होये ॥०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP