मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री कृष्णदासांची कविता|चक्रव्यूह कथा| प्रसंग पांचवा चक्रव्यूह कथा माहिती व विवेचन प्रसंग पहिला प्रसंग दुसरा प्रसंग तिसरा प्रसंग चवथा प्रसंग पांचवा प्रसंग सहावा चक्रव्यूह कथा - प्रसंग पांचवा श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत. Tags : krishnadaspoemकविताकृष्णदासमराठी प्रसंग पांचवा Translation - भाषांतर तीन वीहु भेंदीलें : मग चवथ्या वीहुपासी आले : तीन पाहार लोटले : दीवस उरला घटीका सात ॥७९॥मग म्हणे रुसीकेशु : थोडा उरला दीवशु : कौरवा मनी उलासु : मग मनी वीचारी अनंतु ॥८०॥मग म्हणे आर्जुनाते : वेगी भेदी चक्रवीहुते : तु मारी जईद्रथातें : वधी वेगी : ॥८१॥मग सकळ सैन्ये घेउन : नीघाला वीर भीमसेन : येकवट मीळुन : वीहु भेदावया ॥८२॥तवं धर्मा बहुत चींता : दिवस थोडा उरला आतां ॥ मग जाला म्हणता : सात्वीकासी ॥८३॥तुम्ही झडकरी नीगीजे : कृस्णा आर्जुनाते म्हणीजे : दीवस थोडा उरला ॥८४॥ऐसे आईकोनी : सात्वीक नीगे झडकरोनी : तो आला टाकोनी : जेथें असे भीमसेन : ॥८५॥तेथें कौरव वीरी : वेढिले वीहुचा द्वारी : युध्य होत आसे भारी : ते देखिले सात्वीके : ॥८६॥ते व्हेळी सात्वीक उठावला : कौरवदलाचा संव्हार केंला : मग पळ सुटला : कौरवासी ॥८७॥कौरवदळें भंगली ॥ मग भीमासी भेटी जाली : (तव सैन्ये येकवटली :) म्हणती सुधी करु आर्जुनाची ॥८८॥वैराट द्दपद दुस्टदुन्म : कोतींभोज सुसुपालनंदन : मन सकळ सैन्ये घेउन : कृस्ण अर्जुनापासी आला ॥८९॥आवोघें ऐकवट जालें : मग देवे म्हणतीले : वीहु भेदावे वहीलें : दीवस थोडा उरला ॥९१॥मग संख देंवदंत्र : स्फुरीता होय पार्थ : भीम सींहिनाद गर्जत : भुभुकारीलें हानुमंतें : ॥९१॥माहा भयाकारे : वाजिनली रणतुरे : नीस्यानाचे गजर : गर्जताती ॥९२॥सकळ सैन्यासी : वीहु भेदीला चहुपासी : पुडा कथा वर्तली कैसी : ते परीयेसा पा : ॥९३॥वीहु भेदीला देखुन : द्रोणासी म्हणे कर्ण : जरी गेले प्राण : परी जईद्रथ ने द्यावा ॥९४॥म्हणे समस्त वीराते : तुम्ही प्राण द्यावा येथें ॥ जरी नीर्वाण करील पार्थ । तरी जईद्रथ राखावा ॥९५॥थोडा उरला दीवसु : आर्जुन करील आज्ञीप्रवेसु : येरा करीता नासु : वेळ नलगे ॥९६॥आर्जुन मेलयावरी : करावी (न) लगे कुसरी : आजिच्या घटका च्यारी : जईद्रथ राखीजे ॥९७॥ऐसे सांगोनी समस्ता : बाण जाला वर्सता : द्रोणे पाचारीले पार्था : जाला वर्सता शस्त्रेधारी ॥९८॥कौरव समस्त : बाण वर्सती आसंक्षात : पांडवसैन्ये आद्भुत : ते वर्सती सरधारी : ॥९९॥दोही दळी हाहाकारू : शस्त्रांचा माहा पुरू : पडुनी ठेला अंधकारू : दीवस दीसेना ॥५००॥मग भीम काये करी : उतरला चरणाचारी : गदा घेतली करी : संव्हार करी कौरवांचा ॥१॥आर्जुन वर्से बाणी : वीद्या चक्षुकी जपुनी : अंबर गर्जें नीस्याणी : वीर रणी पडताती : ॥२॥आकासाहुनी पडती बाण : सव्य आपसव्य येती बाण : पाताळ फोडुनी येती बाण : बहुत रण पाडिले ॥३॥बाणजाळ गगनी : देवो पाहाती विमानि (ते गेले पळौनी : विस्मो मनी तयांचा) ॥४॥मग गुऋ बृहस्पती बोले : मागा संग्राम बहुते जाले : परीऐसे नाही देखिले : माहा दारूण : ॥५॥बाण पार्थाचे आनीवर : कडतरले नावनीके वीर : धरणीवरी वाहे पूर : ऐसे घोरांधोर जाले ॥६॥यावरी जन्मोजया बोले : रणी कोण वीर पडीलें : ते पाहिजे सांगीतले : वैसंपाएना ॥७॥जन्मोजयाप्रती सांगत : वीर पडीले बहुत : त्यांची नांवे सांगत : कथा जाईल वीस्तारा : ॥८॥भुरीस्रवा माहाकेते : सुरसुभान भद्रकेते : सुरराज वीख्यातें : येरा संख्या नाही ॥१०॥ऐसे विर पडिले रणी : थोर जाली केसधरणि : विहुं न भेदें देखुनी : मग सारंगपणी काऐ करी ॥११॥श्रीकृस्णे दीवसाकडे पाहे : तव घटिका च्यार उरला आहे : कौसाल्या करी द्वारकेराये : ते परीऐसा पा ॥१२॥सुद्रसेन सुर्याआड घातले : तेंज भानुचे लोपले : आंधकागत पाडिलें : ते व्हेली : ॥१३॥तें वेळी लोपला दीनकरू : थोर पडला आंधकारू : पांडवादळि हाहाकारू : थोर वरवट जाले ॥ देवो म्हणे आर्जुना : दीवो गेला आस्तमाना : तु बोलीलासी प्रतीज्ञा : जईद्रथ न मारवेची : ॥१४॥दीवस मावळला देखुनी : पार्थ रथाखाली उतऋनी : सैन्येकात म्हणौनी : काष्ट मेळवा : ॥१५॥वीर मारीले बहुत : त्याचे पडिलें होते रथ : काष्ट आणीली बहुत : मग सरण रचीले ॥१६॥पडिला देखो अंधकारू : झडकरी आला योधीष्टीरू : तेथें आला वरकोदरू : आणी नकुळ शाहादेवो ॥१७॥द्रपद वैराट दुस्टदुन्म : सकळ राजे आले मिळोन : आज्ञीप्रवेस करील आर्जुन ; म्हणौनीया ॥१८॥मावळला देखती दीवस : कौरवो मानती उलास : आर्जुन करील अज्ञीप्रवेसन : ते पाहु आले ॥१९॥आज्ञीप्रवेस करील पार्थ : तेथ आला जईद्रथ : त्याते द्रोण म्हणत : तु का येथ आलासी ॥२०॥कौशाल्येया रुसीकेंशु : रात्रीचा करील दीवशु : तो अर्जुना देईल येसु : द्रोण म्हणे तया ॥२१॥तव पार्थें काऐ केले : श्रीकृस्णाचे चरण नमस्कारिले ; धर्म भीम वंदीले : आंळगीले नकुळशाहादेवाते ॥२२॥राया समस्ता पुसुन : अज्ञीप्रदक्षणा करुन : मग म्हणे मदसुदन : युध्ये का सांडिली ॥२३॥मग शस्त्रेत्र घेउन : अज्ञीप्रदक्षणा घालुन : पार्थ धणुस्य भाते आंगी करुन : तीये वेळी ॥२४॥धनुस्य चढउनी : बाण सीतासी लाउनी : कुळदेवता स्मरुनी : आज्ञीप्रवेश करी ॥२५॥पार्थ जाला बोलता : श्रीकृष्ण माझी कुळदेवता : देवो सुद्रसेन होय काहाडीता : सुर्या आडुणीया ॥२६॥देवो म्हणे हा घे अदीत : हा घे जईद्रथ : वेगी करी घात : जईद्रथाचा ॥२७॥जईद्रथासि वधीलें : सीर गगनी उड्वीले : कबंध पडले : पार्थ म्हणे याते कैसे कीजे ॥२८॥मग देवो सांगत : याचा पीता व्रहद्रथ : गंगासागरी तप करीत : तेथे नेउनी घाली : ॥२९॥हे पडो नेदीजे मेदनी : बाणी न्या पीटोनी : आर्घ देता संध्यावदनी : आंजुळी घालावें ॥३०॥पार्थ पीटीले सीराते : ते नेले गंगासागरातें : संध्या करीता तेथें : त्याचीये आंजुळी पडिले ॥३१॥सीर पडिले आंजुळी : तो दचकला तयावेळी : सीर ठेविले भुतळी : तव त्याचाही मृत्ये जाला ॥३२॥यावरी जईद्रथ वधीला : आर्जुन वीजया जाला : देवि वर्सावो केला : सुमनांचा ॥३३॥वीस्मयो जाला सकळ देवा : नकळती श्रीकृष्णाचीया मावा : अंगीकारी ऐसा व्हावा : देवो भक्ताचा कैवारी ॥३४॥: ढ : द्दढ भक्तीचा आंगीकारी : जन्मोजन्मी वोळगावा हरी : न वीसंबावा क्षेणभरी : म्हणे पंडित विष्णुदास ॥३५॥५॥कृस्णाने भक्तासी : येस दीले पार्थासी : पुढें कथा वर्तली कैसी : ते आईका ॥छ॥ प्रसंग पाचवा : ॥५॥ ॥छ॥ ॥छ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP