पंचम स्कंध - अध्याय आठवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । दूतझालाविस्मित । दैत्येश्वरासीजाऊननमित । सांगितलेंसर्ववृत्त । शुंभपुसेबंधूसी॥१॥

एकलीआलीसेनारी । युद्धालागींपाचारी । तूंअथवामीसमरी । जावेंकोणीवदेसत्य ॥२॥

निशुंभम्हणेकासया । दोघांनींहीजावेंवाया । धुम्राक्षातेधाडूनिया । अबलाबळेंआणावी ॥३॥

तेव्हांधाडिलेतयासी । शुंभम्हणेजायवेगेंसी । घेउनियेप्रमत्तेसी । बलात्कारेंकरुनिया ॥४॥

सहाय असेजोकोणी । करावीत्याचीप्राणहाणी । कालिकेसमारुनिझणी । केसरीतेवधावे ॥५॥

त्याकामेलांगीवरी । बाणनकदापिप्रेरी । उचलून आणीयेथवरी । चतुर आहेसधूम्राक्षा ॥६॥

आज्ञाघेऊनअसुर । साठसहस्त्रसैन्यभार । घेऊन आलेबाहेर । देवीसंनिधपातला ॥७॥

म्हणेचतुरेसंदरी । शुंभासुरातेवरी । तववाक्याचीकूसरी । जाणिलामीमधुरस्वरें ॥८॥

दोनयुद्धाचेप्रकार । शर आणिपंचशर । जिंकीलतुजसाचार । शय्यारणींमाझाप्रभू ॥९॥

ऐकूनीक्रोधेंकाली । म्हणेजीभकांचांचरली । अससीलजरीशूरबली । बळेंनेईसत्वर ॥१०॥

वृथाकांबडबडशी । तिष्ठवाजायपाताळांशी । सिंहिणीकायजंबुकासि । कामातुरारमेल ॥११॥

तुमचासमुळघात । करुनजाईलपरत । ऐकतांचिक्रोधयुक्त । युद्धकरीधूम्राक्ष ॥१२॥

बाणटाकीकालीवरी । कालीहीत्यासबाणमारी । रथसारथीअश्वचारी । कालिकेनेंभंगिले ॥१३॥

दुजरथींबैसला । कालीनेंतोहीभंगिला । परिघघेऊनधाविनंला । मारावयाकालीशी ॥१४॥

आलाजवसमोर । अंबिकाकरीहुंकार । भस्महोऊनियाअस्रुर । यमसदनापैंगेला ॥१५॥

सिंहेंभक्षिलीसेना । तोडीशिरेंकरचरणा । पळतीतेटाकूनिरणा । रडतगेलेंशुंभाकडे ॥१६॥

अंबिकातेथूनदूर । जाऊनीराहिलीस्थीर । शंखनादकेलाघोर । भयप्रददैत्यासी ॥१७॥

शुंभेंऐकूनतेवेळी । चंडमुंडमहाबळी । अपारसन्याचेमेळी । युद्धालागीधाडिले ॥१८॥

तेयेऊनरणीं । वृष्टीकरितीतीक्ष्णबाणीं । चंडिकातोडीतेक्षणीं । शस्त्रेंप्रेरीअनेक ॥१९॥

कोपयोगेंतीचेंवदन । झालेंमषीसमवर्ण । कदलीपुष्पापरीनयन । भ्रुकुटीकेल्यावाकुडया ॥२०॥

अंबेचेंललाटांतून । कालीप्रगटेदारुण । व्याघ्रचर्मपरीधान । उत्तरीयगजचर्म ॥२१॥

मुंडमाळारुळेकंठीं । पोटलागलेंजाऊनपाठी । शुष्कवापीसममोठी । उदरदरीभयानक ॥२२॥

खड्गखटवांगपाशकरी । तीक्ष्णदाढामुखपसरी । लळलळाजीभबाहेरी । ओंठचाटीनेटानें ॥२३॥

गवाक्षापरीरक्तनयन । कुशजंघाविस्तीर्ण । कालरात्रीचेसमान । भयंकरा अतिशयें ॥२४॥

अट्टहासेगर्जली । सैन्यामाजीप्रवेशली । सेनासर्वभक्षिली । क्षुधाशांतनसेची ॥२५॥

माहुतयोद्धेघंटासहित । एकहस्तेंगजबहुत । उचलोनिमुखीटाकित । चावींचरचराकाकडीसें ॥२६॥

रथतुरंगरथींसाथी । अनेक उचलीएकाहातीं । मुखींटाकीबहुप्रीति । भोजनकरीदैत्यांचे ॥२७॥

मुखपसरिलेंभयंकर । माजीपडतीशस्त्रनिकर । चाऊनीकरीतसेचूर । क्षणेंभक्षिलीमहाचमू ॥२८॥

सैन्यनाशपाहून । चंड आलाधाऊनी । शरवृष्ठीकरुन । कालिकेतेझांकिले ॥२९॥

सूर्यप्रभेसहस्त्रार । सोडिलेतेणेंकालीवर । तिणेंतोडूनत्याचेशर । सुदर्शनछेदिलें ॥३०॥

ह्रदईंमारिलादिव्यशर । मूर्छितपडलाचंडासुर । आलाधांऊनीमुंडासुर । तीक्ष्णसोडीबाणाते ॥३१॥

तयासिकेलामूर्छित । सावधझालाचंडदैत्य । गदाघेऊनीत्वरित । आलावेगेंमारावया ॥३२॥

मंत्रयुक्तबाणपाशीं । कालीबांधीचंडाशीं । बंधनपाहूनबंधूशी । धांवेमुंडंसकोप ॥३३॥

कालीबांधीतयाशी । सशापरीओढीदोघांसी । वेगेंआणिलेअंबेपाशी । हसेंबहुतकालिका ॥३४॥

म्हणेप्रियेवामनयनें । पशूआणिलेतुजकारणें । संतोषेहोययुद्धयज्ञें । तुजलागीघेईहे ॥३५॥

अंबापाहूनतुष्टली । ऐकमाझेंवाक्यकाली । नवधीनसोडीबळीं । चतुरेकरीदेवकार्य ॥३६॥

रणमंडपामाझारी । युद्धमखाचेविस्तारी । यूपीबांधूनखड्गधारी । आलंभनकरितेंविधीनें ॥३७॥

हिंसापापतेणेंनसे । कालीबोलून ऐसें । शिरेंखड्गेंकापीतसे । उष्णरक्तपानकरी ॥३८॥

दैत्यवधिलेपाहून । अंबाबोलेसंतोषोन । चंडमुंडाआलीसघेऊन । चामुंडातूंविख्यातहो ॥३९॥

एवंदीधलेवरदान । उरलेकरितीपलायन । रडतीसांगतीवर्तमान । शुंभासुरासैनिकते ॥४०॥

कालीतेथेंप्रगटली । सेनासर्वचाविली । चंडमुंडाचेरक्तप्याली । हसेंविक्राळसुघोरा ॥४१॥

व्यर्थराजनयुद्धतीशी । नाशीलसर्वदैत्याशी । पलायनकरीवेगेशी । पाताळाशींचलावें ॥४२॥

अथवाजावेंशरण । तरीतीकरीलरक्षण । मुळप्रकृतीआद्याजाण । देवकार्यापातली ॥४३॥

ऐकूनीबोलेअसुर । उगेरहातुम्हीकातर । पाताळीनिघासत्वर । प्राण आशाअसेजरी ॥४४॥

दैवम्हणेनिस्वस्थबसणें । हेंनकरितीशाहणे । अदृष्टतेंदेखिलेंकोणे । बुजगावणेंभयार्थते ॥४५॥

पुढेंघेऊनीयाजाते । गहूंठेवूनीसुपाते । नफिरवितांचक्रहातें । पिष्टकदांनव्हेची ॥४६॥

तेवीउद्योगसाधन । सिद्धासिद्धीदैवाधीन । युद्धासिकरितांआव्हान । उगाकेवीशूरराहे ॥४७॥

त्रैलोक्यसर्वभोगून । स्त्रीभेणेंपलायन । अथवाजाणेंशरण । दैन्यपणेंकेवींहोय ॥४८॥

लोभकरुनीप्राणाचा । नाशकीजेयशाचा । पदरपसरोनीदीनवाचा । केवींकीजेसांप्रत ॥४९॥

अवश्यनचुकेलिखित । रक्तबीजाआज्ञापित । जावेशूरासैन्यासहीत । वधोनियेईंदुष्टेसी ॥५०॥

रक्तबीजम्हणेसुरारी । चिंतानकीजेअंतरीं । बांधून आणितोंसुकुमारी । कालिकेसीवधूनिया ॥५१॥

व्यासम्हणेभूपती । एवंवदोनीतयाप्रती । रक्तबीजघोराकृती । सैन्यसमवेतपातला ॥५२॥

श्लोकदोनशेंएकावन । चंडमुंडगेलेयमसदन । प्राकृतेंयेथेंवर्णन । करीमायमाझीही ॥५३॥

देवीविजयेपंचमेअष्टमः ॥८॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP