पंचम स्कंध - अध्याय पांचवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । आलापाहूनीदैत्यपती । शंखवाजवीभगवती । सन्मुखयेऊनतियेप्रती । सस्मितवाक्यबोलिला ॥१॥

म्हणेदेवीयासंसारीं । पुरुष असोवानारी । सदासुखाचीइच्छाकरी । संयोगजन्यसुख ऐसें ॥२॥

कनिष्ठमध्यम उत्तम । चौथेंसुखसर्वोत्तम । नाविकांचाक्षणिकसंगम । सुखकनिष्ठयाकरितां ॥३॥

बंधूमित्राचासंगम । तेंसुखजाणमध्यम । विरोधहोतांनिर्गम । तयासुखाचाम्हणूनी ॥४॥

मातापितापुत्रसंगम । तेंसुख असेंउत्तम । दातृत्वयेथेंपरम । उत्तमम्हणवेंतयानें ॥५॥

स्त्रीपुरुषाचासंगम । तेंसुखसर्वोत्तम । प्रीतीवाढेअनुपम । अत्युत्तमयाकरितां ॥६॥

जरीमजमहावीरासी । प्रेमयुक्तरतहोसी । सुखसर्वोत्तमलाभसी । कामरुपींबलीमी ॥७॥

देवसमस्तजिंकिले । हरिहरहीपळविले । त्रैलोक्यसर्ववश्यकेलें । स्वामिनीहोयसर्वांची ॥८॥

तूंझेंरुपलावण्य । मोहिलोमीपाहून । कदांनमोडीनवचन । वशवर्तींराहीनसदा ॥९॥

देवाचेटाकीनवैर । तुझाजाणहाकिंकर । नकीजेकदांअव्हेर । शरणतुजस्मरार्तमी ॥१०॥

ब्रम्हादिकांनाहींनमलो । परीतुजपुढेंदीनवदलों । पदीतुझ्याशरण आलों । कामज्वरशांतवी ॥११॥

व्यासम्हणेनृपती । एकूनीहांसेभगवती । पुरुष इच्छाममचित्तीं । नसेपरमपुरुषाखेरीज ॥१२॥

त्याचेचमीइच्छित । निर्मितेंसर्वजगत । विश्वात्मामजदेखत । त्याचीचप्रकृतीशिवामी ॥१३॥

सदासांनिध्य असेंत्यांचे । तेणेंमीचैतन्यसाचें । तयावांचूनरुपकैचें । जडपूर्वीमीएकली ॥१४॥

चुंबक असतांसमोर । लोहींचैतंन्यसाचार । तेवीपुरुषसदासमोर । चैतन्यतेणेंममांगी ॥१५॥

तुमूर्खपशूपामर । जेइच्छिशीमूत्रागार । हेंतोंमहाबंधकर । नजाणसीकामांधा ॥१६॥

सुखासाठीकरीशम । देववैरटाकीदुर्गम । सुखरोहेनिर्मम । अथवाजाईपाताळी ॥१७॥

बोलिलासीमधुरवचन । तेणेंदेतेंजीवदान । सुखेंफिरेवैरसोडून । सत्पदींसन्मैत्री ॥१८॥

मरावेंजरीअसेंमनीं । उभाठाकेसमरंगणी । अवश्यतुजमारुनी । जाईन आपुल्यानिजठाया ॥१९॥

महिषम्हणेंतूंसुकुमार । नटाकवतीतुजवरीशर । मजलागीकीजेवर । अथवाजायघराकडे ॥२०॥

मित्रमजलाम्हणसी । तेणेंसोडिलेंतुजसी । महापापस्त्रीहत्येसी । बलात्कारेंसुखनाहीं ॥२१॥

आतांमजनवरिसी । पुढेंतूंचिपस्तावशी । जेवीझालेंमंदोदरीसी । तेवीतुज अनुताप ॥२२॥

विचारितांमहिषासुर । सांगेकथामनोहर । कौतुकेंऐकेसाचार । सर्वज्ञातीमहामाया ॥२३॥

सिंहालदेशीचंद्रसेन । नृप असेभाग्यवान । गुणवतीनामकर्मेकरुन । भार्यातयाचीसुरुपा ॥२४॥

कन्याझालीसुंदर । संतोषेतोनृपवर । जातकपाहुनीसत्वर । नामठेविलेंमंदोदरी ॥२५॥

दशवर्षातीसुकुमारी । नृपतेव्हांलग्नविचारी । माताम्हणेमंदोदरी । विवाहतुझाहोतसे ॥२६॥

तीम्हणेमीलग्ननकरी । दुःख असेंकीसंसारी । पराधीनपणेंसासरी । जाचणींबहुहोयतेथें ॥२७॥

परतत्रांमोक्षनाहीं । संसारीह्यासुखनाहीं । मननसेंमाझेंविवाही । कुमारपणेंराहींनमी ॥२८॥

भावनाहींजाणुन । उगाराहिलाचंद्रसेन । पुढेंतीझालीतरुण । सख्यातीसिसमजाविती ॥२९॥

कदांनायकेवचन । उत्तरदेईसांगेज्ञान । एकदांतीरम्य उद्यान । सखीसहप्रवेशली ॥३०॥

तेसमईंकोसलपती । पातलासहजदैवगति । पाहूनियातिजप्रती । प्रार्थिलीतेणेंसखीमुखें ॥३१॥

नायकिलेंतिणेंवचन । नृपझालाबहुखिंन । घरागेलावीरसेन । मंदोदरीघराआली ॥३२॥

इंदुमतीतिचिभगिनी । विवाहयोग्यहोतानृपानी । स्वयंवररचिलेंसुखानी । नृपसर्वपातले ॥३३॥

इंदुमतीनेवरिलावर । तेव्हांझालीकामातुर । मद्रदेशीचानृपचतुर । चारुदेष्णतिणेंवरिला ॥३४॥

तोनृपशठजार । अन्याभोगीनिरंतर । पश्चात्तापेंतापलीफार । मंदोदरातेधवा ॥३५॥

व्यासम्हणतीपारीक्षिता । अंबाऐकूनिवार्ता । म्हणेमंदायुद्धकरीआतां । अथवाजायपाताळीं ॥३६॥

ऐकुनीवाक्यमहिष सज्जकेलेंधनुष्य । बाणसोडीआशीविष । अंबेवरीतेधवा ॥३७॥

देवीछेदीबाणजाल । स्वयेवर्षेंमेघतुल्य । मध्येपातलामहाबल । दुर्धरकरीबाणवृष्टी ॥३८॥

तयाचेबाणछेदिले । स्वबाणेंत्यासीमारिले । त्रिनेत्रमारिलात्रिशूले । तवधावेअंधकासुर ॥३९॥

गदाघायेंकेसरी । ताडिलातेणेंवेगेशिरी । नखेंतयासीविदारी । सिंहखाईतन्मांस ॥४०॥

पन्नासदिवसजोसमरी । श्रीहरीसीयुद्धकरी । तयासीक्षणार्धेंकेसरी । फाडूनभक्षीकालयोगें ॥४१॥

एवंपाहूनिमरणास । महिषकरीविस्मयास । क्रोधेंताडिलेंसिंहास । नखेंमारीहरीतया ॥४२॥

महिषझालाकेसरी । नखेंदोघांसविदारी । देवीतयासीशरमारी । गजरुप असुरहोय ॥४३॥

शुंडेंतघेऊनगिरिशिखर । झुगारिलेंदेवीवर । तिळापरीकरुनीचूर । हास्यकरितजगदंबा ॥४४॥

सिंहमस्तकीउडोन । गजाकरीविदारण । तवतोशरभझालादारुण । सिंहवधाकारणें ॥४५॥

अष्टपदतयापाहिले खड्गमाथाप्रहारिलें । तेणेंमहिषरुपकेलें । शृंगेहाणीचंडीप्रत ॥४६॥

महिषदेवीचासमर । प्रवर्तलामहाघोर । शूरांवीरांभयंकर । पाडकाय इतरांचा ॥४७॥

पुच्छाचेकरीभ्रमण । पदाघातेंकरीताडन । नाचेकुदेशब्ददारुण । करीगर्जेपुनःपुनः ॥४८॥

पुच्छेंउपडीपर्वत । बळेंशृंगेभिरकावित । जेवीचेंडूफळीखेळत । तेवींपर्वतभिरकावी ॥४९॥

हस्यकरीवारंवार । आनंदवाटेंतयाफार । म्हणेचंडीहोईस्थीर । क्षणएकमजपुढें ॥५०॥

रुप आणियौवन । तेणेंतुजगर्वजाण । वाक्यमाझेमोडून । सिद्धझालीसरणासीं ॥५१॥

क्षणमात्रेतुजवधीन । देवांसमस्तागिळीन । जेपुढेंस्त्रीकरुन । मारुंइच्छितीमजलागी ॥५२॥

चंडिकाम्हणेवलगना । क्षणएककरीदारुणा । उभाराहेरणांगणा । मारितेतुजहयारे ॥५३॥

नकरीगर्वाचिभाषणें । माजलासतूमीजाणें । करुनीमिष्टमधूपानें । पाठवीनयमपुरा ॥५४॥

व्यासम्हणेनृपती । एवंवदोनीभगवती । स्वर्णचषकघेऊनीहातीं । पानकरीअत्यानंदें ॥५५॥

पुनःपुनःपानकरी । आनंदभरेंहस्यकरी । नेत्रजाहलेअरुणापरी । जयशब्देकरितीसुर ॥५६॥

मगघेऊनशूलकरी । धांवेवेगेंमहीषावरी । तोहीनानारुपेंधरी । प्रहारकरीदेवीशी ॥५७॥

ह्रदईंबसलाशूलघात । दैत्यपडिलामूर्छित । एकमूहूर्तेंपुन्हाउठत । पाईंताडितदेवीशी ॥५८॥

मगसहस्त्रारसुदर्शन । दक्षिणकरींघेऊन । अंबिकाबोलेगर्जोन । असुराप्रतीतेवेळीं ॥५९॥

टोणग्याहेसुदर्शन । पाहेंतवशिरोकृंतन । मदांधाक्षणएकथांबून । जाईअतांयमसदना ॥६०॥

एवंतयासीजागऊन । सोडीअंबासुदर्शन । तत्काळकंठछेदून । चक्र आलेंमाघारी ॥६१॥

भळभळाउष्णरुधिर । गळेंजेवींगिरिपाझर । कबंधचीतोमहाअसुर । फिरुनगरगरापडियेला ॥६२॥

गतप्राणझालादेवारि । सैन्यभक्षीतोकेसरी । क्रोधेंबुभुक्षिताचेपरी । पलायनपरदैत्याचे ॥६३॥

करुनियाहाहःकार । पलायनकरितीअसुर । पाताळींगेलेसत्वर । प्राणभयेंउरलेते ॥६४॥

रणभूमीतेटाकुन । देवींमांडिलेंरत्नासन । बैसलीअंबाजाऊन । पुढेंबैसेकेसरी ॥६५॥

ब्रम्हाइंद्रहरिहर । पुढेंकरुनसर्वसुर । अनंतकरितीनमस्कार । प्रदक्षिणाकरिताती ॥६६॥

आनंदाश्रूआलेनयनीं । रोमांचितशरींरेहोऊनी । सदगदकंठेकरुनि । स्तवनकरितीनम्रत्वें ॥६७॥

तेंअदभुतस्तवन । पुढेंहोईलनिरुपण । श्रमपरिहारजाणोन । अध्यायव्याससंपवी ॥६८॥

तेवीयेथेहीवाणी । विरामकरीवर्णनी । रामेंतिजलानमूनी । लेखणीकर्णींठेवितसे ॥६९॥

सत्यायेंशीश्लोकएकशत । महिषाचाझालाअंत । येथेंवर्णिलेंप्राकृत । सुरस आख्यान अंबेनें ॥७०॥

देवीविजयेपंचमेपंचमः ॥५॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP