मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|चतुर्थ स्कंध| अध्याय पाचवा चतुर्थ स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा चतुर्थ स्कंध - अध्याय पाचवा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय पाचवा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । गुप्तपाहूनिगुरुशीं । देवभेणेंप्रल्हादासी । पुढेंकरुनशुऋपाशी । शरण आलेदैत्यसर्व ॥१॥क्रोधेंशुक्रम्हणेतया । जावेआतांतयाठायां । मजपूर्वींअवमानुनिया । किमर्थपातलाजावेगें ॥२॥प्रल्हादेंधरिलेचरण । बोलेअतिनम्रहोऊन । अपराधघडलानेणून । स्वामीक्षमाकरावी ॥३॥आपलेचरणीं आहेमन । परीवंचिलेबृहस्पतीन । गतीनसेतुजवांचून । अंगिकारकरावा ॥४॥कृपाउपजलीमानसी । भार्गवसांगेदैत्याशीं । भिऊंनकामानसीं । साह्यकरीनतुमचे ॥५॥परीऐकाएकवचन । ब्रम्हदेवेंकथिलेंजाण । अवश्यभावींटाळीलकोण । लक्षउपायकेलीया ॥६॥ दहायुगेंत्रिलोकसंभव । भोगिलेतुह्मीविभव । आतांभोगतीलदेव । कालयोगेंजाणपा ॥७॥सावर्णीमनुचेवेळीं । इंद्रहोईलस्वयेंबळी । विपरीतकालयेवेळीं । तुह्मांअसेप्रल्हादा ॥८॥इंद्रभयेंकरुन । खररुपतवपौत्रेंकरुन । असतांमघवातयापाहून । विचारीतखोंचूनी ॥९॥ह्मणेंखररुपकिमर्थकेलें । त्रैलोक्यभोगिसीबळें । नलाजसीकांबळें । उत्तरदेतपौत्रतुझा ॥१०॥ लज्जेचेकायकारण । भावींप्रबलइंद्राजाण । तूंजेवीकमलींलीन । कीटरुपेंहोतासीं ॥११॥तेवीमीहीखर । दैवजाणबलवत्तर । एवंवदोनपरस्पर । इंद्रगेलास्वभुवनीं ॥१२॥व्यासम्हणेशुक्रवचन । प्रल्हादेंतेव्हांएकोन । दैत्यांसींम्हणेनिश्चयान । दैवप्रबळनसेची ॥१३॥परीदैत्यनमानिती । प्रल्हादापुढेंघालिती । काव्यबळेंयुद्धकरिती । देवासवेंतेधवा ॥१४॥शतवर्षेंपर्यंत । संग्रामकेलाअदभूत । प्रल्हादासीजययेत । पराजयइंद्राते ॥१५॥गुरुवाक्येंपुरंदर । देवीस्तवकरीमधुर । विनयपूर्वनम्रकंधर । प्रेमयुक्तश्रद्धेनें ॥१६॥जयदेवीमहामाये । शूलहस्तेंजगन्मये । शत्रुनाशिनीभक्ताभये । खड्गहस्तेंनमोस्तु ॥१७॥शंखचक्रगदाकमल । हातींधरिशीनिर्मल । तवनामभुवनमंगल । भुवनेश्वरीसुविद्ये ॥१८॥अनंतशक्तिदर्शन । मुख्यतूंचनिधान । दशतत्वांचीखूण । तूंचएकमहाबिंदू ॥१९॥आकाशादितत्वेंपांच । शब्दादिगुणतेहीपांच । तत्वोत्पंनगुणसाच । तत्वतेंहीशास्त्रम्हणे ॥२०॥ज्याकार्यांचेंजेंकारण । तेंचीओळखींतत्वखूण । नसतांजरीश्ब्दगुण । वाचिकप्रगटमगकैंचे ॥२१॥ वाणीपासाववेदझाले । वेदयोगेंजगनिर्मिलें । अवघ्यांचेंकारणवहिलें । शब्दगुणतत्वतो ॥२२॥स्पर्शगुणजरीनसतां । श्वासोश्वासकेवीघेता । जडासीमगचैतन्यता । कोठूनहीसंचरती ॥२३॥चलनवलन अकुंचन । देहीवायूचेसंसरण । स्पर्शत्याचेकारण । म्हणोनितत्वह्मणविलें ॥२४॥रुपजरीनसतें । तेजमगनोळखतें । आकारादीकांहींनहोतें । सृष्टिकारणहेंतत्व ॥२५॥रसापासूनकेवळ । भरलेंएकार्णवजळ । गुणप्रगटतांतात्काळ । जगस्थिताजाहली ॥२६॥गंधजरीनसतां । सृष्टिभेदनसंभवता । मेध्यतैसीअमेध्यता । भासमाननहोती ॥२७॥सृष्टिव्यापारकारण । असतीहेपांचगुण । राहतीसंमिश्रहोऊन । कार्यचालेंसृष्टीचे ॥२८॥पांचगुणाचेंकारण । पंचभूततत्वेंजाण । एवंदहाचीओळखण । आत्मरुपिणीपरांबा ॥२९॥दशेंद्रियेंदशप्राण । द्शदेवतांदशदिशांजाण । महाबिंद्रूतेंहेंमन । आत्मरुपातेथेंही ॥३०॥रक्तशुक्लएकवटलें । बिंदूंरुपतेंचिझाले । शुभ्रतेंनिर्विकल्पठेलें । सविकल्परक्तिमा ॥३१॥सत्वरजजैंसमरसें । अवघेजगतेव्हांभासे । तांबडेमिळतांपांढर्यासरिसें । भासेजेवीरंगगोरा ॥३२॥महाबिंदूऐसेंमन । कल्पनाकुंडलिनीजाण । मीजीव ऐसेंभान । कल्पनाहीदाखवी ॥३३॥ऐसीतूंकुंडलिनी । जाहलीसस्वयेंजीवरुपिणी । निर्विकल्पहोतामनीं । सश्चिदानंदरुपिणीतूं ॥३४॥मनवाचेसीनेणवें । तेंसद्रूपतुझेंम्हणवें । व्याप्तजेचैतन्यस्वभावें । चिद्रूपतुझेंतेंचिहें ॥३५॥स्वसुखींसर्वनिमग्न । चराचरहेंदृश्यमान । हेंचितुझेंआनंदघन । रुपसत्यपरांबे ॥३६॥प्रसादकरीआम्हांवरी । येऊनसंकटीवारी । तुजवांचूननिर्धारी । नाशीलकोणदुःखातें ॥३७॥व्यासह्मणेनृपती । ऐकतांचिदेवस्तुती । प्रगटलीतेथेंदिव्यमूर्ती । सिंहारुढाचतुर्भुजा ॥३८॥अभयदेऊनितयांशीं । आलीदैत्यसमीपेशीं । भयभीतपाहूनसर्वांसीं । स्तुतीकरीप्रल्हाद ॥३९॥ठेविलीअसतांपुष्पमाला । दृष्टिभ्रमेसर्पभासला । तेवींभ्रांतियोगेतुला । जगद्रूपेंपाहती ॥४०॥जंगम आणिस्थावर । तुजपासूनविस्तार । निमित्तमात्रविधिहरिहर । यांशींतूंचिनिर्मिलें ॥४१॥सर्वांचीतूंचिमाता । भेदनाहींतवचितां । देव आणि दैत्या । तूंचिनिर्मिलेह्मणोनी ॥४२॥ गुणीअथवादुरगुणी । मातेसीसारखेदोनी । जैसेंनिर्मिलेंइच्छेनी । आहोंततैसेंसुततुझें ॥४३॥ भेदकायदेवदैत्यांत । स्वार्थदोघेहीइच्छित । गृहदारादिकीमोहित । देव असुरदोघेही ॥४४॥ कश्यपापासांवदोघेही । विरोधकरिसीकिमर्थ आई । गुणेंघडिलेंसर्वही । गुणातीतकेविदेव ॥४५॥क्रोधादिदेहींवसती । परस्परहेभांडविती । कल्पिलीतुवांचिहीयुक्ती । युद्धपाहावेंम्हणूनी ॥४६॥कलहजरीतुजनावडता । तरीविरोधकोठूनिहोता । दोघेंहीबंधूतत्वता । कलहलाविलामायेनें ॥४७॥धर्मजाणतापुरंदर । दैत्यझालेपामर । जाणतोधर्मनिकर । इंद्रकेवीजाणेंमी ॥४८॥केलेंसागरमंथन । निघालेंजैंसुधारत्न । कलहस्थापीनारायण । निर्मिलासापालकतूं ॥४९॥रुपकरुनसुंदर । स्रुधापाजुनीकेलेअमर । सिंहिकासुतेंस्रुधासीकर । लाभतांशिरच्छेदिलें ॥५०॥हेंधर्माचलक्षण । ठकवीआम्हांनारायण । लक्ष्मीघेतलीआपण । रत्नेंसर्व इंद्रासी ॥५१॥एवंअनयकरुन । देवास्थापीनारायण । पाहेधर्माचेंलक्षण । कोणाआम्हींसांगावें ॥५२॥कैसाधर्मकायलक्षण । कोठेंकार्यसाधूपण । खरेमीमांसाभाषण । अकृत्यसर्वजगांमाजी ॥५३॥कामलोभेंकोणासोडिले । गुरुभार्येचेहरणकेलें । चंद्रेंजाणोनीस्वबळें । पातकभयनसेतया ॥५४॥गुरुभोगीअनुजकामिनी । गर्भ अंधकेलाशापुनी । इंद्रेंभोगिलीगौतमकामिनी । तरीदेवधर्मज्ञ ॥५५॥आपराधावांचूनिछिन्न । राहूशिरकरीभगवान । पौत्रमाझाधर्मनिपूण । छळेंघालीपाताळीं ॥५६॥ एवंजाणूनीमानसीं । रक्षींवामारीआम्हांसी । अनन्यशरण आलोतुजसी । इच्छितकरीपरांबे ॥५७॥व्यासह्मणेऐकूनवचन । देवींदैत्यासीबोधून । रसातळांतेपाठवून । स्वयेंजाहलीअंतर्हित ॥५८॥देवदैत्यस्वस्थझाले । देवीवाक्येंवैरटाकिलें । जरीहेंआख्यानश्रवणकेलें । परमपददेतसे ॥५९॥तीस आणि एकशत । श्लोकेंसुरसचरित । देवदैत्यभांडत । वैरटाकिलेंदेवींवाक्यें ॥६०॥देवी. चतुर्थेपंचमः ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP