मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्त विजय| अध्याय पांचवा श्रीदत्त विजय अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अवधूत मंत्र अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा श्रीदत्त उपनिषद - अध्याय पांचवा स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय. Tags : dattapothiदत्तपोथीमराठी अध्याय पांचवा Translation - भाषांतर सोऽहम् गायत्री पुण्य । सोऽहम् अजपा पूर्ण । सोऽहम् ध्यानी मन उन्मन । उन्मनी जाण ते मुद्रा ॥१॥सोऽहम् हंसा ब्रह्म । ऐसे करी जो गायन । परमहंस पदवी पावोन । जीवन्मुक्त होत असे ॥२॥कल्पनेचा करावा अंत । कल्पना न करावी चित्तात । होता आपण कल्पनातीत । ब्रह्मज्ञान होत असे ॥३॥अंतरी नोहे विचार । नर नव्हे तो शंकर । तयापासी सिद्धी सर्व । तिष्टत राहाती सर्वदा ॥४॥विचार येत वा जात । त्याजकडे राहावे पाहात । ऐसे करिता शांत । मन आपैसे होत असे ॥५॥नुरता कल्पना जाण । निर्विकल्प होई मन । आत्मज्ञान ब्रह्मज्ञान । आपैसे जाण होतसे ॥६॥ऐसे श्रीदत्त उपनिषद । श्रीदत्त सांगती दत्तावधूतास । यावरी ठेविता विश्वास । ब्रह्मज्ञान होतसे ॥७॥ॐ निरंजनाय विदमहे । अवधूताय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात ॥८॥दत्तात्रेयो हरि कृष्णो । मुकुंदो आनंददायका । मुनी दिगंबरो बालो । सर्वज्ञो ज्ञानसागरा ॥९॥दिगंबर मुने बाला । समर्था विश्वस्वामीने । परमहंसा महाशून्या । महेश्वासा महानिधे ॥१०॥ॐ हंस हंसाय विदमहे । परमहंसाय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात ॥११॥ॐ शून्य शून्याय विदमहे । परमशून्याय धिमही । तन्नो परब्रह्म प्रचोदयात ॥१२॥ॐ दत्तात्रेयाय विदमहे । योगीश्वराय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात ॥१३॥ॐ स्वामी समर्थाय विदमहे । परम अवधूताय धिमही । तन्नो महादत्त प्रचोदयात ॥१४॥सर्व देवी देवता स्वरुपाय । महादत्त अवधूताय । प्रज्ञापूर निवासाय । नमन माझे तुजलागी ॥१५॥हे दत्तात्रेया गुरुवर्या । मजवरती करी तू दया । सदभक्तासी सदया । अन्नवस्त्राते देई तू ॥१६॥तैसेचि देई सदगुण । देई सदगुरु दर्शन । करुणामय ज्यांचे जीवन । लोकोद्धारार्थ अवतरले ॥१७॥ॐ ॥ इति श्रीदत्त उपनिषद ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP