मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्त विजय| अध्याय दुसरा श्रीदत्त विजय अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अवधूत मंत्र अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा श्रीदत्त उपनिषद - अध्याय दुसरा स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय. Tags : dattapothiदत्तपोथीमराठी अध्याय दुसरा Translation - भाषांतर नाभीपासूनी उन्मेष वृत्ती । होय सोऽहम् शब्दाची आवृत्ती । तेचि सदैव धरिता चित्ती । ब्रह्म हाता येतसे ॥१॥धरिता सो सांडिता हम् । अखंड चाले सोऽहम् सोऽहम् । याचे धरिता ध्यान । ब्रह्मज्ञान होतसे ॥२॥हकारेण बहिर्याती । सकारेण विशेत्पुनः । हंसहंसेत्यमुं मंत्र । जीवो जपति सर्वदा ॥३॥अजपा नाम गायत्री । योगिनां मोक्षदा सदा । अस्या संकल्पमात्रेण । सर्व पापैः प्रमुच्यते ॥४॥कुंडलिन्यां समुदभूता । गायत्री प्राण धारिणी । प्राणविद्या महाविद्या । यस्यां वेद स वेदवित् ॥५॥सोऽहम् जपता लक्ष । हाता येई अलक्ष । कोटी जपे दत्त । प्रसन्न जाणा होतसे ॥६॥निर्विकल्प म्हणजे कल्पनातीत । त्यासी राहावे चिंतित । निर्गुण परब्रह्म अद्वैत । स्वरुप जाणा होतसे ॥७॥सोऽहम् हंसा तत् त्वम् असी । ते तू ब्रह्म आहेसी । सोऽहम् ध्याने ऐसी । अवस्था सहज होतसे ॥८॥स्वरुपी राहिल्या वृत्ती । अवगुण अवघेची जाती । सर्व परब्रह्म मती । देव सर्वत्र संचला ॥९॥निरंतर स्वरुपी राहता । स्वरुपची होईजे तत्त्वता । लक्षणे अंगी बाणता । मग वेळ नाही ॥१०॥वृत्ती ऐसी वाढवावी । पसरोनी नाहीच करावी । पूर्ण ब्रह्मास पुरवावी । ब्रह्म सर्वत्र दिसतसे ॥११॥अभ्यासाचा मुकुटमणी । वृत्ती राहावी निर्गुणी । स्वरुपी वृत्ती लक्षणी । स्वरुपची जाणा होतसे ॥१२॥बाह्य भलतैसे असावे । अंतरी स्वरुपी लागावे । स्वरुपी सदैव राहावे । ब्रह्म स्वरुप म्हणोनिया ॥१३॥स्वरुपी स्वरुपची झाला । मग तो पडोनी राहिला । अथवा उठोनी पळाला । तरी तो ब्रह्म होत असे ॥१४॥ॐ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP