मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्त विजय| अध्याय तिसरा श्रीदत्त विजय अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अवधूत मंत्र अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा श्रीदत्त उपनिषद - अध्याय तिसरा स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय. Tags : dattapothiदत्तपोथीमराठी अध्याय तिसरा Translation - भाषांतर प्राप्त व्हावया ब्रह्मज्ञान । अति गुह्य आहे अनुष्ठान । सोऽहम् हंसाचे साधन । सावधान जो साधी ॥१॥प्राणाचेनि गमनागमने । सोऽहम् हंसाचेनि स्मरणे । सावधाने जो साधू जाणे । तेणे पावणे हे स्थान ॥२॥त्यासीच पवनजयो घडे । तोचि आज्ञाचक्रामाजी चढे । तेथोनिही मार्ग काढी पुढे । अति निवाडे अचूक ॥३॥सोऽहम् हंसा ब्रह्म । ऐसे करावे गायन । कूटस्थी ठेवावे मन । ब्रह्मपद तो पावे ॥४॥कूटस्थी ठेविता मन । प्राण करी उर्ध्वगमन । तेथोनी पुढे महाशून्य । मार्ग आपैसे मिळतसे ॥५॥समूळ नासता देहभान । निर्विकल्प होई मन । हेचि समाधि साधन । सोऽहम् ध्यानी साधावे ॥६॥होता चिदाकाश दर्शन । स्थिर करावे तेथे मन । हे परब्रह्माचे साधन । सावधान साधावे ॥७॥जाहलिया आनंद पद प्राप्त । चिदाकाशचि दिसे समस्त । चिदाकाशी चित्त । अति सावचित्त ठेवावे ॥८॥चिदाकाश चित्त चिंतन । हेही सांडोनि भेद ध्यान । स्वये चिदात्मा होऊन । परमानंदी राहातसे ॥९॥प्रथम शून्य रक्त वर्ण । त्याचे नांव अधः शून्य । उर्ध्व शून्य श्वेत वर्ण । मध्य शून्य श्यामवर्ण ॥१०॥महाशून्य नीलवर्ण । त्यात स्वरुपचि केवळ । चारी वाचा कुंठीत झाली । सोऽहम् ज्योत प्रकाशली ॥११॥रक्त वर्ण त्रिकूट जाण । श्रीहाट श्वेत वर्ण । गोल्हाट श्याम वर्ण । औटपीठ नील वर्ण ॥१२॥वरी भ्रमर गुंफा आहे । दशमद्वारी दत्त राहे । भेदिता नवद्वाराते । दत्त दर्शन होतसे ॥१३॥निर्विचार निर्विकल्प निश्चिंत । होवोनी राहावे सावचित्त । चित्त होता कल्पनातीत । ब्रह्मज्ञान होतसे ॥१४॥ॐ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP