मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|नाटकातील पदे| पुण्यप्रभाव नाटकातील पदे संगीत गर्वनिर्वाण पुण्यप्रभाव भावबंधन राजसंन्यास पुण्यप्रभाव राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. Tags : poemram ganesha gadakariकविताराम गणेश गडकरीवाग्वैजयंती पुण्यप्रभाव Translation - भाषांतर (१)प्रभुपदास नमित दास मंगलमात्रास्पदा । वरदा सदवनिं लवयदवलंव न करि हरि दुरिता सौख्य वितरि ॥धृ॥चरणकमल-। दलिं विहरत कविमंडल । दुर्लभ तें दिव्य स्थल ।पंकनिरत । राम रत । धन्य तरी ॥१॥(२)नच संभव ज्या कांहीं होत अकारण तेंही । कालहि त्या नाहीं ॥धृ०॥कलिका नाहीं खुलली, करपत तों अकालीं ।हरपत मोहर कां वनिं बाई ॥१॥(३)शिशुपणाहूनि परिचित जनांसि वधुनि दुःखि हो स्वसुख असुखमय कठुतर वाटे । मोदहि विषसम ॥धृ०॥मंद सदा आनंद विषादें । ह्रदयिं विरति खर वसवि निज धाम ॥१॥(४)व्याकुळ हें मन होई कां सतत कां त्यास छळ हा ॥धृ०॥जगतिं न रंगेत विचारी परी तरंगे । नच त्या कांहि विसावा हा ॥अनलज्वाल । जाळिते अशी जिवाला पसरी अंतरीं या दाहा ॥१॥(५)दशा आता अशापरी अजुनि जाईना । उपत्य कांहीं ना । मना तें साहीना ॥धृ०॥प्रयास हा करि महा । योग तरी न पहा । तिळभर मान कसा तो राहीना ॥१॥(६)अनुकार जना ने कालान्तरिं थोर पदा । छळि विहास हा असला । आधी जरि त्या सदा ॥धृ०॥हा निश्चय कधिं न ढळे । प्राणान्तहि आला जरि । न मन तिळमात्र चळे । ये त्याप्रति यश तोवरि । करिन यत्न परि । कल्पान्त घडला तरि । ही तापवीन तनु ॥१॥(७)फसवित पुरुषाप्रति स्त्री खनि कपटाची ॥धृ०॥दोषमात्र पूर्ण गात्र । विश्वासा कधिं न पात्र । मोहपाश वागुराचि ॥१॥(८)प्रभुसम पतिपद अबलांना । न दैवत लोकीं तयांना । शुभगति पतिप्राणा ॥धृ०॥निजपतिवांचुनि इतर जनांशी । दर्शन भाषण सुकृतासि नाशी । ईशपदीं रतिही पापचि त्यांसी । भयद खरविषसमाना ॥१॥(९)हालत वातें मृदु शान्ति ही । भासे हासे कीं चंद्रालोक तनुलकान्ति ॥धृ०॥दशदिशा पुष्पपरागें दरवळुनि ह्सत जणुं असती ॥१॥(१०)दावी निजकान्ति । वियतीं । शीतलमाया शान्त निशापति ॥धृ०॥शान्त वैभवा कोमल किरणां । वितरि तरलतर धवलावरणा । दाहि दिशाप्रान्तीं ॥१॥विविध विरोधी भावांवरतीं । पसरी जणृं हा मुनि एकान्तीं । ज्ञानमया शान्ति ॥२॥(११)नाचत ना गगनांत । नाथा । तारांची बरसात ॥धृ०॥आणित होती । माणिकमोती । वरतुनि राजस रात ॥१॥नाव उलटली । माव हरपली । चंदेरी दरियांत ॥२॥ती ही वरची । देवाघरची । दौलत लोक पहात ॥३॥(१२)विनाश कां सहगामीच सदा भोगसुखाला ॥धृ०॥सुवास वाहात राही । नाश तदा पुष्पाचा । विचार हा करि आनंदकालिं खिन्न मनाला ॥१॥(१३)गौरवा प्रसरी प्रभूच्या भव्य पट हा नभाचा ।जीवकोटिप्रचुर भू करि कुंठिता तेवि वाचा ॥धृ०॥भ्रमति अवकाशांत अणु हे अलक्ष्यरूपें ।पवन त्यांतुनि शीघ्र फिरतां नाद चाले तयाचा ॥१॥विस्मयाकुल मनुजमतिला तदा भास होई ।हुंकृतिध्वनि कोशवासी विश्व करि हाच साचा ॥२॥(१४)भुलूनिया खलजनालापा । जरि दिला ताप निष्पापा । तरि निरयनिरति न दुरापा ॥धृ०॥या सदर्पा । बघुनी सर्पा । जात कोपा ॥१॥तनु सकंप नय कुजनिं उचित जरि घडत न तरि मलिन करी सत्प्रतापा ॥२॥(१५)दुदैवें हेतु झाला तुम्हां द्याया ताप हा ॥धृ०॥उपकार आजवरि केला । तो अकालिं विलया गेला । अपकारमात्रें याला । स्मरावें आतां पहा ॥१॥(१६)अंतरिं खेद भरे, दीनवदन बोलेना । शून्य़ आलोक शून्य जग शून्य़ हृदय डोलेना ॥धृ०॥शुभदर्शन चरणाचें, नच आतां म्हणुनी । देह हा जड जाहला शोकविकल हालेना ॥१॥व्यर्थ जीवित यावरी । वज्र पडेना कां शिरीं । हें अपयश आजि या प्राक्तनीं हत आलें ना ॥२॥(१७)करा करूणामया क्षमा । विषमा जरि गमे कृति हतकामा तरि सुखधामा सुपरिणामा ॥धृ०॥क्षणचि हृदय हें भरतां विकारीं । मोदभरें तव कृति न स्वीकरी । विसरुनि तें; अघ हें सहाया दे या शमा ॥२॥(१८)प्रलयाची जी हतदशा । आली ती कां आतां ? ॥धृ०॥रविकिरणां वाटे भय याया । बघुनिया ऐशा एकान्ता ॥१॥(१९)भारसंचय पहा नियमि चंचलपदा । जातमात्रास या कर्मबंधापदा ॥धृ०॥शकटभर जड यथा । महोक्षहि पाहतां ॥ सुटत न कष्टतां । चक्रपद्धति कदा ॥१॥पूर्वकृत संचिता । जीव हा ओढितां ॥ नियतिरेखांकिता । मात्र गति तापदा ॥२॥(२०)अघटित कृतिसी करिसी कां ॥धृ०॥या पापातें कवण अशि । महती आशा वद करवि ॥ जाळि अंतरंग जें । तदुपरि आत्मनाश चिरन्तनचि करि सुकृत लव नुरवि ॥१॥(२१)कधि वदे प्रणय का कठोर बिकटहि वचना । रुचतसे तया मृदुरचना । ध्वनि तिथें कलह तो माना ॥धृ०॥कळे न वळे न कुणासि जें । वच असेंहि वदतां लाजे । कुलीन त्याप्रति जग समजे । पतित इतर जन मनीं गणा ॥१॥(२२)सदा हृदयीं या रंगे । तरंगे । प्रसन्न अंतरंगे । कदा न भाव भंगे ॥धृ०॥मूर्तिसुंदरा । मदनमदहरा । गुणां नटवि नटवरा । कुणा भुलवि न मधुरा । प्रणयरागें ॥१॥प्रेमविव्हाला । हतबल अबला । प्रिया शंरण पदतला । प्रिया हृदयिं द्या स्थला । न तरि भागे ॥२॥(२३)अतिशय छळी दीन मनासि कां ? तापद असा हा ॥धृ०॥विषमय गमे कां हृदयहि या संतत सुखाचा विहार ॥१॥(२४)रंग अहा भरला । सुबक भला । नाचत चंचल हा वरवरला ॥धृ०॥भुलवुनि खुलवुनि हांसत खेळत । भारूनि केलें गुंग जीवाला ॥१॥हंसवी फसवी नटवी माया । शोभत बाई ज्याची त्याला ॥२॥बांधुनि नजरा जादूगारा । दाखवितां हा खेळ कुणाला ॥३॥(२५)चतुरा चातुरी । तुमची न्यारी । भुलावणी खरीखुरी ॥ परि मारी । जिव्हारीं । दुधारी सुरी ॥धृ०॥भोळा भाव भुलाया टाकुनिया फांसा ।केला डाव असा अवचित कां हो खासा ? हा देव पावला आज कुणाच्या नवसा ?रुसला कान्हा काय जिवाच्या रासा ?तुटली सारी कां दिलदारी इतक्यावारी ? (२६)आतां न करी हा चाळा । टाकि छंद बाळा ॥धृ०॥शान्तिसुखाची झोप कशाची । भीति मजसि ही जाची घाली आळा ॥१॥धीर मला दे मंजुळ नादें । हास परतवी वीरा निर्दय काळा ॥२॥(२७)बोल ब्रिजलाला रे कांहीं हंसुनी बोल । भ्यालें जनाला । भ्यालें मनाला । सुटला माझा तोल ॥धृ०॥करि उरिं धडपड रहा मनिंच तूं । हांसुनि भिरभिर वद नयनांनीं । नवलाखाचा बोल ॥(२८)रणवीर कुमारा निकट बिकट रण हो झणि सिद्ध तया । यदपि वय न तव, उघडि नयन निज, हरुनि भया मज दे अभया ॥धृ०॥प्रसंग घोर पाहुनिया भीत माता । तुझाच एक धीर तिला आतां । तात तुझे त्यजुनि मला दूर जाता । प्रभुस्वरूप तूंच जगीं, तूंच त्राता ॥(२९)धिक् जगति शतघा शुभ्यशा । त्या वीरकर्मा या परि जरि नरवर कृति करिति अधमाधमा ॥धृ०॥अनाथ अवलाजनालागिं छळितें जें । शिशुबरि शस्त्र धरूनि जें हुदयीं लवहि न लाजे । तरि त्या धिक् ॥१॥(३०)अनुचित वचनें ऐशीं । सतीतें व्यर्थ वदुनि अवगणुनि तिस जोडितसां का यापरि पातकराशी ॥धृ०॥पतिव्रतेच्या मंगळधामा । पतिव्रतेच्या शुभ नामा । अभद्रवचनीं विषसम विषमा । विडंबितां कां जोडोनिया पापासी ॥१॥(३१)जडताच गडे शोभते असा प्रसंग ये तदा । त्वरा, रुचे न तापदा । कुलीनतेसि ती कदा ॥धृ०॥मंद पडत पद तरी । ओढ जिवा फार जरी । जड-पदाहि थोर पाहिं दाविती विषादा ॥१॥(३२)मार्ग दुजा नच जगांत । अतुल पातक ना तरी आतां । घडवित पितरां निरयपात ॥धृ०॥थोर कुलीं जन्म ज्यास । सौख्यलेश नाही त्यास । कष्टदशा त्याला । अशिच नशिबाला । ना तरी कुल तें विलया जात ॥१॥(३३)निज बाळा रे गाणें गाते आई । करि आतां जो जो गाई ॥धृ०॥तुज जन्म दिला बाळा त्यांची स्वारी । लाखांत शिपाई भारी ।बघ गर्दी ही बुरुजांची तुजभंवती । दगडांची त्यांची छाती ॥कळिकाळाशीं झगडणार खंबीर । हे तुझेच हिरवे वीर ॥(चाल) जीवांच्या जळत्या ज्योती । आकाशीं तारा होती । मोलाची माणिकमोतीं ॥त्या डोळ्यांनी देवराय तुज पाही करि आतां जो जो गाई ॥१॥दो दिवसांची ही दुनियेची वसती । सारखीच असती नसती ॥तुज ऐसा हा बाळ नऊ नवसाचा । हातचा कि रे जायाचा ॥ऋणानुबंधाच्या तुटल्या आतां गांठी । मग कुठल्या भेटीगांठीं ॥(चाला) हें देवाघरचें लेणें । नशिबानें देणें घेणें घेणें । कुणितरी कुणास्तव रडणें । तीं रडणारीं रडतील धाईधाई । करि आतां जो जो गाई ॥२॥(३४)नीज गुणी बाळ झणीं शान्त यावरी । गांऊ किती कुंठित मति नीज झडकरी ॥१॥हृदयाचा केला हो पाळणा नवा ।बांधाया ममतेचा पाश मग हवा ।हृत्तरंग हलवि तया करुनि मृदुरवा ।ब्रह्मसगुण बाळरूप रमत अंतरीं ॥२॥(३५)जिवास वसुनि हा धाय । दयाघना । घडि घडि छळित कसा अजुनि रुजत ना । हृदय करिल हें काय ॥धृ०॥वसतिस्थिल एक तरी असती दशा विविध तयां । भिन्नकार्य जीवजात भिन्नगतिहि जगतीं या । खिन्नता न उचित विरहिं, दुर्जय जरि माया । फसवीत मोहजालें ॥(३७)पुण्यमया तव मूर्ति पहातां खनि जी केवल तेजाची ।इंद्रहि झाकिल नेत्रसहस काय कथा मग इतरांची ? ॥देवी त्रिपुरेश्वरी प्रतिष्ठा करि कां देहीं या साची ।दर्शनमात्रें जाळुनिं टाकी विश्वें सारीं पापाचीं ॥(३८)प्राणनाश नच परि जन्म नवा । या मरणें मिळवी मिरवी तेविं जन दिव्य पुण्यप्रभवा ॥धृ०॥हतलाभाहुनि त्याग सुखाचा शतपट बरवा ॥(३९)हृदय कापितसे तापद वच व्यापि तसें विप जिवासि ॥धृ०॥देवि, उदार मनें दे आज्ञा या जनासि ॥(४०)नाथ भय न राहि । तिळहि कांहीं दुरित हरिल तो हरि लवलाही ॥धृ०॥साक्ष नदीय पटुनि झणि अंतरिं । जरि संकट घन धीर ये तरिहि ॥(४१)अभागी जीवा शोक्र आतां पुरे हा ॥धृ०॥नशिबीं आले । त्यापरी झालें । मन का वृथा हें मनाशीं झुरे ॥१॥रडणें एकच जाणें नातें न आतां जगाशीं उरे ॥२॥(४२)निरोप द्यावा आतां बाळा । टाकुनि जाते माता ॥धृ०॥माझें माझें म्हणुनि आजवर जें लेणें ल्यालें ।बाळ गुणाचें हाय कुणाचें आज परी तें झालें ॥१॥हे तारांनो, उचंबळूं द्या करुणारसरंगा ।अखंड वाहो नवतेजाच्या पुण्याईची गंगा ॥२॥घटकेचा संसार संपला लटका ठावठिकाणा ।वनदेवींनो पदरीं घ्या हा माझा राजस राणा ॥३॥अनाथ दुबळा देह पडे हा आई नाहीं त्याला ।फुलत्या फुलवंतीची यावर मायापांखर घाला ॥४॥भुतें जागतां उठतां दचकुनि हृदयींचा हा ठेवा ।काळ्या रातीं जित्या फुलांचा खडा पहारा ठेवा ॥५॥कळतें तुम्हां सारें कांहीं अहां फुलांच्या माता ।लोभ असूं द्या इथून पुढतीं बोलत नाहीं आतां ॥६॥(४३)घडे नाथा प्रमाद जरी आतां क्षमाच तरी हो तया । झुरे देह म्हणुनियां नुरे धीरच हृदया । हा जीव शरण चरणीं या । भ्रमुनिया दमुनिया श्रमुनिया ॥धृ०॥हा सतत असो प्रेमभर असा । शुभ आनंदलाभ तसा हा । दासी सदाची करी याचना । प्राण पहा वाही । अचल करुनि मति पदिं सदया । तरि दया । करूविला ॥हे प्रभुवर धृतिबल वितरी लोकीं त्यागास्तव खरतर । सुखी तरी विहित शुभसमया ॥धृ०॥आर्यावर्ती आर्या । मान्य गणाया । दे नयपर सुमति पुरुषां । विनवित सविनय ॥ N/A References : N/A Last Updated : November 16, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP