मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|अध्यात्मपर पदे| भाग ४ अध्यात्मपर पदे भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ अध्यात्मपर पदे - भाग ४ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग ४ Translation - भाषांतर १५८१( राग-बिहार; ताल-धुमाळी. )पिंड ब्रह्मांड मांडणी । उभारणी पाहे खांजणी भांजणी ॥ध्रु०॥तेणें तूं सुटसी मन । संगत्यागें चुके संसारायातना ॥१॥सदा श्रवण मनन । निरंजनीं असावें अनन्यपणें ॥२॥सोहं हंसा विचारीं । ब्रुह्मारिम ऐसें सद्दढ घरीं ॥३॥दास म्हणे रे गती । बहुजन होते सज्जनसंराती ॥४॥१५८२( राग-जयजयवंती; ताल-दादरा. )चंचळ चळत असे । निश्चळ चळत नसे । सकळ कळत दिसे । प्रचित सूचित मना ॥ध्रु०॥जाणत जाणत सीण । सीणत सीण कठीण । कठीण कठीण हीन । मीपण मीपणा नको ॥१॥दिसत नासत आहे । प्रत्ययें शोधूनि पाहे । राहेल कांहिं न राहे । पाहेत तो धन्य होय ॥२॥असार सार मेळविलें । पाहतां येकचि जालें । दास म्हणे निवडिलें । जाणते तयांनीं मले ॥३॥१५८३( चाल-डफगाणें. )गगन निश्चळ पोकळ । चहुंकडे अंतराळ । तरी मग आकाश पाताळ । कां म्हणावें ॥१॥पृथ्वीकरितां पडिलें नांव । येरवीं नांवा नाहीं ठाव । कळावयाचा उपाव । नाना मतें ॥२॥फिटली आशंका तत्काळ । आकाशाचें नांव पाताळ । आहे पृथ्वीचें चडळ । तोंचिवरी ॥३॥जंवरी आहे हा भूगोळा । तंवरी आकाश पाताळ । नस्ताम ब्रह्मांड अंतराळ । चहुंकडे ॥४॥ब्रह्मा सारिखें गगन । आत्म्यासारिख पवन । पद जाणती सज्जन । विवेकाचें ॥५॥जड चंचड निश्चळ । तीन प्रकार केवळ। जड चंचळ निश्चळ । जैसें तैसें ॥६॥तत्त्वें तत्त्व धांडोळावें । सार असार शोधावें । निश्चळ प्रत्ययें बोघावें । आपणासी ॥७॥आपला आपला समजला । तोचि समजाविल लोकांला । निर्बुजला त्याच्या बोला । ताळा नाहीं ॥८॥पिंडज्ञान तत्वज्ञान । आत्मज्ञान ब्रह्मज्ञान । संगत्यागें समाधान । सहज चि ॥९॥सोहं सोहं हंसा हंसा । याचा अर्थ आहे कैसा । नाना प्रकारीं तमासा । विचाराचा ॥१०॥गाण विहंगमें गेला । घबाड अवचित पावला । देव जवळि च फावला । चहुंकडे ॥११॥१५८४( राग-कफी; ताल-दादरा; चाल-साजिरें हो० )आतां काय हो करणें आतां कैसें करावें । अनुमानेन बचके पाणी किति घरावें ॥ध्रु०॥मेरुगिरीवर विघिहरिहरभुवन भासत नाहीं । इंद्रलोक यमधर्मलोक ही अनुमानेना कांहीं ॥१॥सिंधुमंडळ भूमिमंडळ मेघमंडळें कैसीं । रविशशीग्रहो तारामंडळें शून्यमंडळ तैसीं ॥२॥विधि भूगोळ लांबी रुंदी कांहींच अनुमानेना । पृथ्वीसेवटीं कडे तुटले आवणी जीव नाना ॥३॥दास म्हणे जगदीशलीळा हें कांहींच न कळे । देवदया जरि होइल हो तरि कांहींयेक कळे ॥४॥१५८५( राग-कल्याण; ताल-त्निवट्ल चाल-अरे नर सार० )रे चंचळ पळपळ चळतसे ॥ध्रु०॥होत जात जिव जात भूमंडळीं । जुळे वितुळे तसे ॥१॥होति जाति किति वाढति मोडति । प्रचित येत असे ॥२॥दास म्हणे दिसंदिस कळतसे । जाणतया विलसे ॥३॥१५८६( चाल-अनंत गुन या रामाचे० ) अकळ करणी देवाची देवाची । पाहों जातां बुद्धि काची ॥ध्रु०॥कवण जाणे गुणसीमा गुणा० । सीमाचि होती निःसीमा ॥१॥माणुस हें दों दिसांचें दि० । जाणायास सामर्थ्य कैचें ॥२॥जीवनाचें तन होतें तन० । तन चि नाचों लागातें ॥३॥तनासी केलीं नवद्वारें नव० । समजों लागती विकार ॥४॥ऐसे पाहतां जीव किती । अनंत मेदें वर्तती ॥५॥दास म्हणे हें नवल नवल । उथळ म्हणों तरी खोल ॥६॥१५८७( राग-गौडी ) हित पाहें पाहें पाहोन समजोन राहें । विद्या वैमव सकळ कांहीं जाईजणें हें न राहे ॥ध्रु०॥आयुष्य जातें अनहित होतें हिशेब हा समजावा । मायाजाळें गोबुन काळें तोडुन टाकीं गोवा ॥१॥काय आणिलें काय नेसी कोण समागम केला । जन्मवरी कष्टकष्टें चि मेला सकळहि व्यर्थ गेला ॥२॥देहामिमानें व्यर्थ गुमानें स्वहितचि बुडविलें । दास म्हणे हें उचित नव्हे येऊनि काय केलें ॥३॥१५८८( चाल-नामामध्यें उ० )सगुण पाहताम नाशिवंत । पंचभूतें दिसती अंतवंत ॥ध्रु०॥सांगती सकळ तें मानेना । कर्मकचाटीं भजानीं देव नाना ॥१॥प्रचितीवेगळें कामा नये । नाना उपाय वाउगा व्यर्थ जाय ॥२॥जीवीचें जीवन कोण जाणे । लोक बोलती नेणतां दैन्यवाणे ॥३॥भजन करिती पाषाणाचें । वायोस्वरूप तें बहुत देवांचें ॥४॥चंचळ निश्चळ निवडे मना । बहु निश्चय एक तो घडेना ॥५॥रामदास म्हणे तत्त्वझाडा । होतां घडतो सकळ निवाडा ॥६॥१५८९( चाल-हे दयाळुवा० )वय जातें ते वय जातें रे । वय जातें रे दुःख होतें रे ॥ध्रु०॥बहु आलें रे बहु आलें रे । आलें रे परि गेलें रे ॥१॥काय तुझें रे काय तुझें रे । मन घालुन तें बुझे रे ॥२॥होत जातें रे होत जातें रे । दास म्हणे येथें काय राहतें रे ॥३॥१५९०( राग-कल्याण; ताल-धुमाळी; चाल-कल्याण मागणें० )बहु गुणी अनंत बहु गुणी ॥ध्रु०॥मुळापासुनी सकळ चेतवी । अनंत पार अपार दाटला ॥१॥गुण विचारुन निर्गुण पाहे । दास म्हणे आदेश तयाला ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP