१५६१
( राग-गौडी; ताल-धुमाळी. )
समजत जा रे समजत जा रे । भ्रांति त्यजाअ रे सारी । निर्भ्रम तें पद सुंदर आहे । चिंता शोक निवारी ॥ध्रु०॥
अर्थेंविण तें भूस त्यजावें । धान्यचि सेवित जावें । कोणीतरि हो आप्त परावें । सारचि शोघुनि घ्यावें ॥१॥
अनुमव नाहीं प्रत्यय नाहीं । तेथें कांहींच नाहीं । बडबड बडबड व्यर्थचि करणें । जिंकियले रिपु साही ॥२॥
दास म्हणे रे गुणगणें रे । हें तों अघटित आहे । पहात पहात पाहत पाहें । निःसंग होउनि राहें ॥३॥

१५६२
( चाल-नामामध्यें उ० )
सकळांमध्यें उत्तम अन्नोदक रे । अन्नोदकें वांचती सर्व लोक रे । लोकांमध्यें हा चालतो विवेक रे । विवेकानें इहलोक परलोक रे ॥ध्रु०॥
अन्न जालें त्या जीवनापासूनी रे । जीवनाची हे जाली मेदिनी रे । जीवनें हीं पिकें होतीं भिजोनि रे । पीक होतां आनंद होतो मनीं रे ॥१॥
मेदिनीचें कारण हें जीवन । जीवनाचें कारण तें दहन । दहनाचें कारण तो पवन । पवनाचें कारण तें गगन रे ॥२॥
होत जात तितुकें नासताहे । प्रत्ययानें तूं विचारूनि पाहें । खळखळ चंचळरूप साहे । दास म्हणे हें निश्चळ न साहे रे ॥३॥

१५६३
( राग-देस; ताल-दादरा )
हंस आळसले क्षीर नीर सेवूं लागले । सारासार विचार नेणती ज्ञाते वंगळले ॥ध्रु०॥
सुषुप्ति उन्मनी एक चि मानावी मनीं । नित्यानित्यविवेक नेणती पडिले अनुमानीं ॥१॥
ज्ञानी अज्ञानी एकचि मानावे कैसे । वेडयाचे वचनीं शाहणा कैसा विश्वासे ॥२॥
दास म्हणे कळे कळल्यावांचूनि नाकळे । खडुळ तें स्थापावें तदुपरि उदक निवळे ॥३॥

१५६४
( राग-सोहनी; ताल-धुमाळी )
तरीच जन्म हा सफळ । नाहीं तरी सकळ निर्फळ ॥ध्रु०॥
बंद प्रबंद बहुविध छंद । कीर्तन घमंडी करावी । निरूपण श्रवण मनन निजध्यासें । पावन वाट घरावी ॥१॥
जड चंचळ निश्चळ वोळखावें । सारासारचि शोधुनि घ्यावें । मुळापासुनि शेवटवरी । माईक सकळ त्यजावें ॥२॥
पुस्तकज्ञानें होतचि नाहीं । प्रत्यय नीट पहावा । दास म्हणे समजेल विचारें । तेणें तुटेल गोवा ॥३॥

१५६५
( राग-बागेश्री बहार; ताल-दादरा )
न तुटे न फुटे देव जाणोनि घ्यावा । देव०। न चळे न ढळे देव सत्य जाणावा ॥ध्रु०॥
चंचळ चळतें माइक पंचभूतिक । मा०। जाणते जाणती ज्ञानी सारासारविवेक ॥१॥
सार विचार पाहे तोचि मला । पाहे तो०। नित्यानित्यविवेकें योगी शोमला मला ॥२॥
दास म्हणे निरंजन आधीं शोघावा । आधीं०। जनतत्त्व सांडुनि मुख्य सारांश घ्यावा ॥३॥

१५६६
( राग-खमाज; ताल-धुमाळी. )
अबोला कोण तो बोला ॥ध्रु०॥
अंतरवासी जननिवासी । नेणतां बैसेल झोला ॥१॥
सज्जनसंग आणि वीतराग । विवेकें विवेक तोला ॥२॥

१५६७
( राग-भूप; ताल-धुमाळी. )
अंतर शोधितां अंतर देव चि जाला । विवेकें पाहतां प्रत्यया आला ॥ध्रु०॥
अंडज जारज स्वेदज उद्भिजादिक । चालवी अनेक जगज्जनक एक ॥१॥
रामदास म्हणे योगें योगचि केला । बुद्धियोग देउनी देवें वियोग नेला ॥२॥

१५६८
( राग-कानडा; ताल-दादरा. )
परतर अंतर वेघें । मग न लिंपसि खेदें ॥ध्रु०॥
सांडुनियां घर गेले देशांतर । मेलों हे मिथ्या उत्तर ॥१॥
व्यक्ति मिन्न मिन्न समान दर्शन । सज्जन जाणती ज्ञान ॥२॥
भक्त जरी होणें तरि समजणें । चुकवि जन्म मरण ॥३॥

१५६९
निश्चळ तें काय चंचळ तें काय । सर्व जनासि उपाय विचारें पाहे ॥१॥
आकार तो कोण निराकार कोण । पाहें निरूपण हरेल शीण ॥२॥
कैसें आहे सार कोणतें असार । सारासार विचार पाववी पार ॥३॥
अहें सोहं दोनी विचारावीं मनीं । आत्मनिवेदनी तो समाधानी ॥४॥
देवभक्तभेटी वियोगाची तुटी । मिळोन गेले शेवटीं नाहीं अटाटी ॥५॥

१५७०
( राग-कानडा; ताला-त्निताल )
सगट गडकावितां नये । निवडुन सारचि घे ॥ध्रु०॥
सार असार मिश्रित जालें । म्हणोनि विवेकीं ये ॥१॥
हितकारक तें शोधुनि घ्यावें । तेणें होतो जय ॥२॥
दास म्हणे हें समजत जावें । अलाक्षासी लय ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP