मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|संतमहिमा| अभंग ११ ते २० संतमहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४४ संतमहिमा - अभंग ११ ते २० संत नामदेवांनी संतांचा महिमा इतका रसाळ वर्णन केला आहे, तो एकमात्र त्यांनीच करू जाणे! Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तकसंतमहिमा अभंग ११ ते २० Translation - भाषांतर ११यम सांगे दूतां कानीं । तुम्ही जातां मेदिनी ।विष्णुभक्त चुकवुनि । येर बांधोनि आणा ॥१॥दूत सांगतां यमा । दिंडीपुढे चाले नामा ।ते नागविती आम्हां । विष्णुदूत म्हणोनी ॥२॥जे नेणती धर्मवेला । वाचे न उच्चारिती गोपाळा ।तयांसि जाचवावेम वेळोवेळां । एकविस कुळांसहित ॥३॥जे न करिती हरीची भक्ती । तयांसीं जाचवावें पुढता पुढतीम ।रघुनाथनाम ज्याच्या कंठीं । त्याच्या वाटे नवजावे ॥४॥दिंडी पताका गजर टाळघोषांचा । नाद उमटतो अंबरींचा ।तेथें पाड नाहीं काळाचा । शिंपी नामा तळपतो केशवरायाचा ॥५॥१२सांडोनि नित्य नेम कर्म । बोलती कळिकाळाचें वर्म ॥१॥नामधारक नामाचे । जाले डिंगर केशवाचे ॥२॥टाल मृदंग वाजती । टके पताका शोभती ॥३॥कंठीं तुळसीच्या माळा । वज्र पंजराचा टिळा ॥४॥शंख चक्र मुद्रा धरणें । अंगीं मिरवती भूषणें ॥५॥संतरज उधळलें । तेणें सर्वांग डवरलें ॥६॥सहस्त्रनामें गर्जित । तेणें पळाले यमदूत ॥७॥नामा म्हणे ते माझे सखे । स्वामी विठोबासारखे ॥८॥१३वैष्णवांचे घरीं मांडिला पाहुणेर । नामाचा वोगर वाढियेला ॥१॥घ्यारे ताटभरी जेवा धणीवरी । आनंद गजरीम रामनाम ॥२॥होईल पाईरव दुर्जना न सांगावें । एकांति सेवावें नामा म्हणे ॥३॥१४सर्वांभूतीं पाहे एक वासुदेव । पुसोनियां ठाव अहंतेचा ॥१॥तोचि संतसाधु ओळखावा निका । येर ते ऐका मायाबद्ध ॥२॥देखिलिया धन मृत्तिकेसमान । नवविधा रत्नें जैसे धोंडे ॥३॥काम क्रोध दोघे घातले बाहेरी । शांति क्षमा घरीं राबवित ॥४॥नामा म्हणे नाम गोविंदाचें वाचे । विसंबेना त्याचे क्षणमात्र ॥५॥१५नावडे निजांगना शेजेवरी रुचेसी । कीं पतिसेजे जेविं व्यभिचारिणी अप्रीत जैसी ॥१॥गांधी विष संग्रहीत भक्ष्णाची नाहीं प्रीत । चकोरा देखत सिद्धी अमावस्या ॥२॥याचपरी संत वर्ते प्रपंच देह कर्मां । समुळ बुडे ब्रह्मी ब्रह्मपणें ॥३॥पोसणा पुत्र लटकेंचि बाबा म्हणे । स्वपियातें अंतरुनि पिंडदान करणें ॥४॥बहुरुपी स्त्रियेचे कटाक्ष इतराम दावी । आपण जाणत जीवीं हें मी नव्हे ॥५॥शत्रुसभे नाना उपचार होती । ते न लगती कांहीं चित्तीं भूपा ॥६॥नामा म्हणे ह्रदयभानीं योगी निरंजन मनीं । मिथ्या विनोद कानीं क्षणिक जैसा ॥७॥१६आशा नाहीं ज्याला । देव कां मारी तयाला ॥१॥जेव्हां सुखाची उन्नति । मोह पायासी लागती ॥२॥सर्वां चित्तीं समभाव । सर्व मानीं वासुदेव ॥३॥नामा म्हणे अंगीं प्रेम । मुखीं विठोबाचें नाम ॥४॥१७धन्य महाराज जन्मले संसारीं । जे ध्याती अंतरीं नारायणा ॥१॥नारायण गाय नारायण ध्याय । धन्य त्यासी माय प्रसवली ॥२॥प्रसवली तया कुळाचा उद्धार । तो तरे निर्धार नामा म्हणे ॥३॥१८प्रतिदिनीं स्वधर्म करी । हरिमूर्ति नमस्कारी ।भावें भजन वसे शरीरीं । तोचि भक्त हरीचा ॥१॥अनंत जन्मींचे कांट । तेणेंचि केलें सपाट ।स्वधर्मे करोनियाम नीट । शुद्धपक्ष हरि हरि ॥२॥तेंचि तापसा सामर्थ्य । तेणेंचि जोडिलें तीर्थ ।त्याचे धरोनि मनोरथ । हरिभजन पथीं लागला ॥३॥देवो त्याचा अंकिला । सत्वा न ढळे तो कष्टविला ।अकर्मीं तोचि भला । त्याचें धन्य जीवित्व ॥४॥तोचि सफळ सकळीं । सदा निर्मळ सर्वकाळीं ।जो हरिनामें वाजवी टाळी । तोचि समर्थ त्रिभुवनीं ॥५॥नामा हरिरंगी रंगला । संत चरणीं अनुरंगला ।तेणें विठ्ठल संतोषला । येऊनि राहिला ह्रदयकमळीं ॥६॥१९वैष्णवांमाजीं एक बळी । पृथु जाला दुजा महीतळीं ।हरि नांदे प्रल्हादाजवळी । नारदें वनमाळी दान घेतला ॥१॥विभीषणें पूजिला लंके हरी । भीष्में देखिला द्वारकेभीतरीं ।अर्जुनें केला साहकारी । सारथि हरि पांडवांचा ॥२॥उद्धवेम तप केलें समर्थ । अक्रूर नित्य वंदनार्थ ।गाई गोपिका गोपाळांत । तो स्तन पीत यशोदेचें ॥३॥नंदा वसुदेवा लाधलें । बळि देवें ऐसेंचि पुण्य केलें ।उग्रसेनें तप साधिलें । रत्न साधिलें रुक्मणीनें ॥४॥गरुड हनुमंत शेषादिक । नित्य जाले हरिचे सेवक ।चरणींच्या उदका शिवादिक । नित्य मस्तक खालाविती ॥५॥ऐसा दुर्लभ हरिराजा । वर्णितां होती चतुर्भुजा ।जड जीवाम तारिल केशवराजा । उभारोनि भुजा सांगे नामा ॥६॥२०सदा विचरती जनीं वनीं रानीं । मुखीं चक्रपाणि जपतसे ॥१॥विरक्तीची मात असे कोण्या गुणें । नामाचें चिंतन योगिराज ॥२॥तेव्हां योगियासी कीर्तनाचे ध्यास । मुक्ती चारी त्यास हात जोडी ॥३॥पंढरीस उभा राहे पांडुरंग । तीर्थ चंद्रभागा नामा म्हणे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP