मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|संतमहिमा| अभंग १ ते १० संतमहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४४ संतमहिमा - अभंग १ ते १० संत नामदेवांनी संतांचा महिमा इतका रसाळ वर्णन केला आहे, तो एकमात्र त्यांनीच करू जाणे! Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तकसंतमहिमा अभंग १ ते १० Translation - भाषांतर १ब्रह्ममूर्ति संत जगीं अवतरले । उद्धरावया आले दीनजनां ॥१॥ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घे वदनीं दोष जाती ॥२॥हो कां दुराचारी विषयीं आसक्त । संतकृपें त्वरित उद्धरतो ॥३॥अखंडित नामा त्याचा वास पाहे । निशिदिनीं ध्याय सत्संगती ॥४॥२संतांचा महिमा कोण जाणे सीमा । सीणला हा ब्रह्मा बोलवेना ॥१॥संतांची हे कळा पाहतां न कळे । खेळोनियां खेळ वेगळाची ॥२॥संतांचिया पारा नेणें अवतारा । म्हणती याच्या पारा कोण जाणे ॥३॥नामा म्हणे धन्य धन्य भेट जाली । कल्पना निमाली संतापायीं ॥४॥३कर्दळी फळ कर्पूर परिमळें भिन्न । परि दोहींचे जन्म ते एकत्र जाण ।आत्मा कीं परमात्मा अभेद कीं भिन्न । चंद्र सोमकांत शून्य महाशून्य ॥१॥सूर्य सूर्यकांतु प्रकाश एकु । साधुसंत आरति रावो ना रंकु ॥२॥भ्रमरांच्या रुंजी मकरंद उधळती । असाध्य साधनीं लागल्या ज्योती ।लयाचें लक्ष हरपली स्थिति । म्हणोनि साधुचरणीं नित्य पंचारती ॥३॥गोदेचा उगमु तो ठाईंच्या ठाईं । आणिकें उदकें तीं चाली प्रवाहीं ।तैसी साधुसंत कृपा उन्मत देहीं । सागरा भेटली क्षीरसिंधु तेही ॥४॥सागराचेम उदक जगा विनवित । निवळुनि मागुतें पूर्ण भरित ।तैसें अंतरीचें नीर ओघें हे साधुसंत । परि सागरा अंतरीं न वर्णवे मुक्त ॥५॥तेथें अनुपम्या ऐकिजे शब्दाचि रचना । हें जाणतेनो जाणा अमृतखुणा ।हें रत्न कीं माणिक ऐसें अनुमाना । तें पानबुडिया परसोबा लाधले निधाना ॥६॥दुधावरील साय वरी साखर मेळवणी । जैसी जिव्हा लोधली मधु लागुनि ।तेथील गौलता तें रहस्य लागलें ध्यानीं । तें परसोबा लाधलें येरां मूर्खां भुलवणी ॥७॥तापलें लोहो तेणें शेखियेले जीवन । तैसें अंतरीम निवालें आपोआप आपण ।परसा भागवत हें सकळांचें जीवन । विष्णुदास नामा त्याचे चरणीचे रजरेण ॥८॥४वैष्णवा घरीं सर्वकाळ । सदा झणझणिती टाळ ॥१॥कण्या भाकरींचे खाणें । गांठीं रामनाम नाणें ॥२॥बैसावयासी कांबळा । द्वारीं तुळसी रंगमाळा ॥३॥घरीं दुभे कामधेनु । तुपावरी तुळसीपानु ॥४॥फराळासी पीठ लाह्या । वेळोवेळां पडती पायां ॥५॥नामा म्हणे नलगे कांहीं । चित्त रंगलें हरीचे पायीं ॥६॥५रविरष्मि धरोनि स्वर्गीम जाऊं येईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥वैतरणी उतरोनिन वैकुंठा जाऊं येईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥२॥स्वप्नींचा ठेवा साचहि होईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥३॥मायबाप बंधू भगिनी मिळे योनी । परि साधुची मिळणी भाग्ययोगें ॥४॥तर्पे व्रतें दानें गोविंद पैं भेटे । परि साधु तंव न भेटे भाग्येंविण ॥५॥नामा म्हणे केशवा बरा साधुसंग । या वेगळा भवरोग न तुटे न तुटे ॥६॥६आजी महासुखें सृष्टी भरली भाग्यवंती । जालीसे विकृती पापा तापा ॥१॥चालिले देखोनि वैष्णव जगजेठी । उभविती वैकुंठी गुडिया देव ॥२॥आले आलेरे हरीचे डिंगर । वीर वारीकर पंढरीचे ॥३॥ज्याची चरणधुळी उधळें गगनपंथें । ब्रह्मादिकां तेथें जाली दाटी ॥४॥एकमेकांपुढे उडविती माथें । म्हणती आम्हातें लागो रज ॥५॥भक्ति प्रेमभाव भरले ज्यांच्या अंगीं । नाचती हरिरंगीं नेणताती लाजू ॥६॥हर्षे निर्भर चित्तीं आनंदे डोलती । ह्रदयीं कृष्णमूर्ती भेटों आली ॥७॥कोंदलें हरिरुप देखती विश्वाकार । सुटले पाझर नयन कमळीं ॥८॥गुढिया रोमांकुरीं सात्त्विके दाटले । गर्जती विठ्ठले नामघोष ॥९॥मोरपिसा कुंचे भाट गरुड टके । भार ते नेटके मिरविताती ॥१०॥तेथें केशवचें नामें तनु हे तुळिका केली । पायघडी घातली हरिच्या दासा ॥११॥७ध्वजा कुंचे गरुडटके । वैष्णव चालिले नेटिके ॥१॥आलें वैष्णवांचें दळ । भेणें पळे कळिकाळ ॥२॥तुळसी मंजरेचे भाले । देखोनि यमदूत पळाले ॥३॥ऐकोनी नामाचा गजर । प्रेमें डुल्लतसे शंकर ॥४॥नामा म्हणे भक्ति गाढी । सेवा न सोडी अर्ध घडी ॥५॥८आला वैष्णवांचा मेळ । पळाला हो कळिकाळ ॥१॥आले आले हरिदास । कळिकाळावरी घाला कास ॥२॥कल्मशा पडियेला धाक । तो हि देऊं न शके हांक ॥३॥पैल नामा केशवाचा । सवें मेळूं वैष्णवांचा ॥४॥९भक्त केशवाचे आले । दूत यमाचे पळाले ॥१॥भक्त हरीचे चालिले । हातीं हरिनामाचे भाले ॥२॥तळपे शांतीचें ओढण । घेती स्वानंदें उड्डाण ॥३॥नामा म्हणे निजदास । कळिकाळाचे भरंवसे ॥४॥१०यम सांगू गेला वैकुंठा । देवा सांभाळा जी आपुल्या मठा ।आम्ही नवजाऊं तयाचिया वाटां । वैष्णव दूत नागवती ॥१॥कुंभिपाक पडला ओस । दूतां लागला त्रास ।देवा कोपेल महेश । म्हणोनी सांगावया आलों ॥२॥देवा तुम्ही एक वोखटें केलें । गंगेसि मृत्यूलोकासी पाठविलें ।तेणें थोर कार्य नाशिलें । हा प्रसाद गौतमाचा ॥३॥ऐसें वैष्णवदूतीं गांजिलों । तुजप्रति सांगावया आलों ।देवें पाहिजे मना आणिलों । माझें साह्य करावेम स्वामी ॥४॥विशेष शिंपी नामा । तो पंढरीये पुरुषोत्तमा ।हाचि बोल ऐकूनि प्रेमा । त्याच्या शिवाणा न जावें ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP