TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
सहासष्टावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सहासष्टावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


"खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे."
१९११
"खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे."
श्री कर्‍हाडला वासुनाना देव व बापुराव चिवटे यांच्या विनंतीवरुन राममंदिराच्या स्थापनेसाठी गेले. त्यावेळी संकेश्वर मठाच्या शंकराचार्यांचा मुक्काम तेथे होता. रामाच्या स्थापनेचा मुहूर्त चागला नव्हता असे शंकराचार्यांच्या ज्योतिषांनी श्रींना सांगितले, त्यावर श्री म्हणाले, " असे कसे होईल, मी अज्ञ, पण राम असे होऊ देणार नाही, तरी आपण पुन्हा पंचांग बघावे" त्यावर जोतिषाने पंचांग पाहून गणित मांडले, तेव्हा तो स्वत:च चकित  झाले. साडेतीन मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त निघाला. श्रींनी स्वामींच्या सर्व परिवारास राममंदिरात भोजनास बोलावले. स्वामींच्या विनंतीवरुन श्रींनी स्वामीणी हत्तीचे दान देण्याचा संकल्प सोडला व म्हणाले, " कोणालाही सांगून हत्ती आणावा, माझ्याकडे किंमत तयार आहे,; तोपर्यंत मठाला एक कालवड देतो, तिचा स्वीकार करावा." बिदरहळ्ळीच्या रामस्थापनेसी ब्रह्मानंदांच्या खास आमंत्रणावरुन प्राणाच्या कराराबरोबर मी आलो आहे. येथे भागवतांनी  व ब्रह्मानंदानी १३कोटी जप केला आहे. शिवाय दोन ठिकाणी रामाची स्थापना होणार आहे. ‘देह गेला तरी हरकत नाही.’ असे समजून मी जेथे आलो आहे. असे एका पत्रात श्रींनी लिहिले बिदरहळ्ळीस चार दिवस राहून श्री कुर्तकोटीला गेले तेथेही चार दिवस राहून श्री सोलापूरला आले. भाऊसाहेब जवळगीकर यांनी बांधलेल्या राममंदिराची स्थापना झाली. येथेच श्री नको म्हणत असताना काढलेला फोतो श्रींशिवाय आला; नंतर फोटोग्राफर्ने श्रींना साष्टांग नमस्कार घालून श्रींची क्षमा मागितली. मग दुसर्‍या दिवशी फोटोला बसण्यास श्री बसण्यास श्री पंढरपूरला आले. कलेक्टरने श्रींना पत्र पाठवून "बडव्यांचा आपापसातील तंटा मिटवून बंद पडलेली महापूजा पुन्हा चालू करावी. " अशी विनंती केली. श्रींनी देवाच्या वस्त्रांची, दागिन्यांची, भांड्यांची पुन्हा मोजदाद करुन नवीन यादी तयार केली. तिच्यावर सर्व बदव्यांच्या सह्या घेतल्या व सर्वांना प्रेमाने वागण्यास सांगून तंटा मिटविला व तसे कलेक्टरला कळविले. पंढरपूरला श्री काही दिवस राहून गोंदवल्यास परतले. जाताना गणपतरावांच्या तोंडातून प्रेमाने हात फिरवून श्री म्हणाले, "वाईट वाटून घेऊ नकोस. पुन्हा आलो म्हणजे तुझ्या घरी मीठ भाकरी खायला येईल." गोंदवल्यास आल्यावर १७ मे १९११ त्यानंतर आटपाटी, यावंगल, सातारा येथेही दत्तमंदिराची स्थापना झाली. तसेच खातवल, उकसान,नरगुंद येथे विठ्ठमंदिराची स्थापना श्रींच्या हस्ते झाली. श्रींना, आता दम्याचा विशेष त्रास जाणवू लागला. पण रामापुढे भजनाला उभे राहिले म्हणजे एखाद्या तरुणाप्रमाणे रामापुढे नाचू लागत. " आपण रामापुढे भजन करु लागलो म्हणजे मारुतीरायालाही स्फुरण चढून तो देखील नाचायला लागतो. पहा; आज तो पखवाजवावीत आहे. मारुतीरायाच्या पायापाशी कान लावा म्हणजे तो मृदृंग वाजवत असल्याचे समजेल." असे श्री म्हणाले. अनेकांनी तेथे आला. भजनाने उपासनेला जोर चढलो. खर्‍यो भजनाला ताल सूर लागत नाही, त्याला प्रेमळपणा लागतो. भावनेने भजन म्हणावे. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि आपलए म्हणणे एकतो आहे, असे मनापासून घडावे, श्रींनी या वर्षी अनेक ठिकाणी राममंदिराची स्थापना केली, त्यांची नावे अशी : १) जुन्या इंदूरमध्ये पुलाच्या पलीकडील राममंदिर २) हर्दा येथील राममंदिर - काशीनाथ भैय्या सावकार यांनी बाधून दिले. ३) पंढरपूर येथील राममंदिर - आप्पासाहेब भडगावकर यांनी बांधून दिले. ४) कूर्तकोटी येथील राममंदिर - डॉ कूर्तकोटी यांच्या मालकीचे शिवालय होते, त्यात एका बाजूला रामाची मूर्ती स्थापन केली. ५) कुरवळी येथे - दामोदर बुवांकडून राममंदिर बांधवले. ६) गिरवी येथील - राममंदिर येसूकाकांनी बांधून दिले. ७) मांडवे येथील राममंदिर - विष्णुकाकांनी बांधले व स्वत: चालविले. ८) गोमेवाडी येथील - राममंदिर सावळाराम देशापांडे यांनी बांधून दिले. ९) आटपाटी येथील - राममंदिर यज्ञेश्वर बुवांनी बांधले. १०) कागवाड येथील - राममंदिर विष्णुपंतांनी बांधून दिले. शंकर शास्त्री यांनी उपासना वाढवली. १२) हुबळी येथील राममंदिर - चिदंबर नाईक यांनी बांधून दिले. १३) मोरगिरी येथील राममंदिर - वामनबुवा पेंढारकर यांनी बांधून दिले. १४)पाटण येथील राममंदिर, १५)मांजरडे येथील राममंदिर, १६) विखळे येथील राममंदिर, १७) अश्वत्थपूर येथील राममंदिर स्थापना - ब्रह्मानंदांच्या हस्ते झाली. १९) चिंतामणी येथील  राममंदिर - श्रींनी रामाची स्थापना केली. त्यावेळी श्रींनी अत्यंत आर्तपणे पुढील अभंग म्हटला.
ये रे ये रे रघुनाथा । तुझे चरणी माझा माथा ।
तूचि माझा माता पिता । तुजविणे नाही त्राता ।
जीव झाले कष्टी फार । कृपा करी रघुवीर ।
तुझे चरणी माझा माथा । कृपा करी रघुनाथा ।
दीन दास येई काकुळती । तुजविणे नाही प्रीति ॥
यावे यावे रघुनाथा । तुमचे चरणी माथा माथा ।
श्रींनी हा अभंग सांगत असताना सर्व माणसांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-05T19:43:15.1430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

batch file

  • बैच फाइल ऐसी फाइल जिसमें निदेशों को क्रमानुसार संचित कर दिया जाता है और कम्प्यूटर निदेश का क्रमशः पालन करता जाता है 
RANDOM WORD

Did you know?

श्रीदत्तपुराणटीका and more books for shree dattaray
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site