मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र| तिसरे व चौथे वर्ष श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र कौटुंबिक स्थिती पहिले वर्ष दुसरे वर्ष तिसरे व चौथे वर्ष पाचवे वर्ष सहावे वर्ष सहावे वर्ष आठवे वर्ष व नववे वर्ष दहावे वर्ष अकरावे वर्ष बारावे वर्ष तेरावे वर्ष चौदावे वर्ष पंधरावे व सोळावे वर्ष सतरावे व अठरावे वर्ष एकोणिसावे वर्ष विसावे वर्ष एकविसावे वर्ष बाविसावे वर्ष तेविसावे वर्ष चोवीसावे वर्ष पंचविसावे वर्ष सव्विसावे वर्ष सत्ताविसावे वर्ष अठ्ठाविसावे व एकुणतिसावे वर्ष तिसावे वर्ष एकतिसावे वर्ष बत्तिसावे वर्ष तेहतिसावे वर्ष चौतिसावे वर्ष पस्तिसावे वर्ष सव्विसावे वर्ष सदतिसावे वर्ष अडतिसावे वर्ष एकुणचाळिसावे वर्ष एकोणिसावे वर्ष ऐक्केचाळिसावे व बेचाळिसावे वर्ष त्रेचाळीसावे व चव्वेचाळिसावे वर्ष पंचेचाळीसावे व सेहेचाळीसावे वर्ष सत्तेचाळिसावे वर्ष अठ्ठेचाळिसावे वर्ष एकुणपन्नासावे वर्ष पन्नासावे वर्ष एक्कावन्नावे वर्ष बावन्नावे वर्ष त्रेपन्नावे वर्ष चोपन्नावे वर्ष पंचावन्नावे वर्ष छप्पन्नावे वर्ष सत्तावन्नावे वर्ष अठ्ठावन्नवे वर्ष एकुणसाठावे वर्ष साठावे वर्ष एकसष्ठावे वर्ष बासष्टावे वर्ष त्रेसष्टावे वर्ष चौसष्टावे वर्ष पासष्टावे वर्ष सहासष्टावे वर्ष सदुसष्टावे वर्ष अडुसष्टावे वर्ष मानसपूजा श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - तिसरे व चौथे वर्ष आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली. Tags : brahmachaitnya maharajgondavaleparamarthaगोंदवलेपरमार्थब्रह्मचैतन्य महाराज तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । Translation - भाषांतर १८४८-४९तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता ।बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ॥श्रीमहाराज तीन वर्षांचे झाल्यावर घरातल्या माणसांची नजर चुकवून एकटेच बाहेर कुठे तरी जात. त्यांच्या सुईणीचे त्यांच्यावर फार प्रेम होते. पुष्कळ वेळा ते तिच्या घरी जाऊन ’मला भूक लागली आहे, मला खायला दे ’ असे सांगत. तिनेदेखील मोठया प्रेमाने दूध-भात किंवा दहीभात त्यांना खायला घालावा आणि कडेवर घेऊन घरी पोचवावे. श्रींना चौथे वर्ष लागल्यावर आजोबांनी त्यांना धुळाक्षरे काढायला शिकविली आणि विशेष म्हणजे नातवानी एका दिवसात ती शिकून घेतली. एकदा असे झाले की, रात्री ११ वाजले तरी श्रींना झोप आली नाही म्हणून आजोबांनी "अनन्याश्र्चिन्तयन्तो मामू ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ हा गीतेतील ( ९ / २२ ) श्र्लोक म्हटला. श्रींनी लगेच त्यांच्या पाठोपाठ तो श्र्लोक म्हटला. श्रींनी लगेच त्यांच्या पाठोपाठ तो श्र्लोक जसाच्या तसाच पण बोबडया वाणीने म्हणून दाखविला. आजोबा म्हणाले, " अरे, तू तर एकपाठीच आहेस !" दुपारी पंत विठठलमंदिरात पुराण श्रवणास बसत. तेथे हा बालक आपणास सर्व काही समजते म्हणून श्रवणास बसे. सायंकाळी जेवण झाल्यावर आजोबा आपल्या नातवास पुराणातील देवभक्तांच्या प्रेमळ गोष्टी सांगत. गोष्टी संपताच भजन सुरू होई. तेव्हा हा छोटा गणपतीही आपल्या पायातील वाळ्यांच्या आवाजाने दुड्दुड नृत्य करीत व टाळ्यांच्या गजरात बोबडया बोलाने "लाम किष्ण हाली ’ असे म्हणे, तोच त्याला पंतांनी घेऊन कुरवाळावे असे नित्यशः चाले. तैशी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गावा न येता । बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ॥ ही ज्ञानेश्र्वर महाराजांची ओवी डोळ्यांपुढे उभी राहते. पूर्व संस्काराने ज्याच्या बुद्धीवर हरिभक्तीचे द्दढतर संस्कार उमटलेले आहेत त्याला अशा अलौकिक बुद्धीची काय किंमत ? पंतांनी स्नान केले की हा स्नान करायला जाई. त्यांनी संध्या केली की, याची सुरु होई. त्यांच्या पूजेच्या अगोदर हा शंख घंटा काढून तयार. जसा काही मुलगा मोठा देवभक्त ! हे त्याने कौतुक पाहून आजा-आजीच्या नेत्रांतून प्रेमाश्रूंचे लोट वाहात व हा बाळ आपल्या बापापेक्षा सवाई निघून आपल्या कुळाचे यश दिगंत गाजवील, असे त्यांना नित्य वाटे. N/A References : N/A Last Updated : February 03, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP