TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
छप्पन्नावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - छप्पन्नावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


"हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले."
१९०१
"हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले."
श्रींनी रामनवमीसाठी बेलधडीस यावे अशी ब्रह्यानंदांनी त्यांना आग्रहाची विनंती केली. त्याप्रमाणे एप्रिल महिन्यात श्री कर्नाटकात गेले. ब्रह्यानंदांचे गुरुदेव येणार म्हणून वकील, डाँक्टर, सरकारी अधिकारी गदगच्या स्टेशनवर हजर होते. तेथून त्यांची प्रसिद्ध वकील जनार्दनपंत यांच्या घरी उतरण्याची सोय केली होती. श्री. भाऊसाहेब केतकर सरकारी अधिकार असल्याने तेही श्रींच्या बाजूला बसले होते. श्री त्यांच्याकडे वळून म्हणाले, "भाऊसाहेब, तुम्ही इकडे कुठे ? आपल्याला भेटून २५ वर्षे झाली, तुमच्याबरोबर मी म्हसवडला आलो होतो. तुम्ही रोज गीता वाचता का ?" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "होय, बहुतेक वाचतो." तेव्हा श्री म्हणाले, "म्हणूनच इतक्या वर्षांनी पुन्हा आपली भेट झाली." जुनी ओळख निघाल्यामुळे भाऊसाहेबांना फार आनंद झाला. ते श्रींना लगेच म्हणाले, "आता आपण सर्व मंडळींसह, मी आलो असतो, पण या मंडळींनी मला येथे आणले आहे, तेव्हा त्यांच्याबरोबर राहणे योग्य होईल, परत जाताना तुमच्याकडे येऊन जाई." त्याप्रमाणे बेलधडीला जाऊन रामनवमी झाल्यावर भाऊसाहेबांकडे गदगला आले. त्यांच्याकडे हनुमान जयंती झाली. ब्रह्यानंदांनी तेथे कीर्तन केले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ( भाऊसाहेबांच्या ) झालेल्या पुनर्भेटीला उद्देशून भाऊसाहेब म्हणाले, "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते तसे मला झाले." भाऊसाहेब पति-पत्नीनी एकदम ठरवले की आता पेन्शन घेतल्यावर गोंदवल्यासच येऊन राहायचे व श्री सांगतील तसे वागायचे. गदगहून श्री यावंगल येथे गेले. तेथे दत्तमंदिराची स्थापना श्रींच्या हस्ते झाली. पुष्कळ अन्नदान झाले. मंदिरास पाणी मिळावे म्हणून विहीर खणली होती. खर्च खूप अला व पाणीही मचूळ लागले. मंदिराचे मुख्य शिवदीक्षित यांनी श्रींना प्रार्थना केली की, विहिरीमध्ये दत्ताचे थोडे तीर्थ घालावे. श्री स्वतः विहिरीवर गेले व पोहरा विहिरीत सोडला. पाण्याने भरल्यावर त्यात दत्ताचे तीर्थ स्वतः घातले व पुन्हा पोहरा विहिरीत सोडला. श्रींनी पुन्हा पोहरा विहिरीतून बाहेर काढला. चूळ भरली व म्हणाले, "पाहा,
पाणी किती गोड आहे,"

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-05T19:29:58.4900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

संसार

  • पु. १ जग ; विश्व ; सृष्टि ; इहलोक ; संसृति ; मानवी जीवित , अस्तित्व ; जगाची स्थिति . संसार म्हणजे डोळयापुढें दिसणारें सर्व जग किंवा दृश्य सृष्टि असा अर्थ आहे . - गीर ८०१ . शिवशिव कदनाची विवसी संसारीं । कवणु नेघे । - भाए २२९ . २ प्रपंच ; व्यवहार ; कुटुंबपोषणादि कार्य ; गृहकृत्य ; घरकाम . ३ विस्तार ; पसारा . नवल ऐके धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी । - ज्ञा ५ . ५४ . [ सं . सम् ‍ + सृ ] संसार उभारणें - गृहस्थाश्रम चालविणें ; गृहव्यवस्था पाहणें . मुक्ताबाईनें एखाद्याचा संसार नसता का उभारला . - नामना २१ . संसार करणें - १ गृहकृत्य करणें ; घरांतील सर्व कामधाम , व्यवहार पाहणें . २ ( बे . ) ताडाचें पान कापून ताडी मोघ्यांत पाडणें . संसार मांडणें - संसारास सुरवात करणें . संसारास पाणी घालणें , संसारावर पाणी घालणें - संसाराचा नाश करणें . म्हणती आतां संसारा घालूं पाणी । परी अन्न देऊं चक्रपाणी । - ह १६ . ११६ . संसार वृथा करणें , संसार वृथा जाणें - संसाराचा नाश करणें . तुकयाची ज्येष्ठ कांता । मेली अन्न अन्न करितां । येणें लज्जा वाटे चित्ता । संसार वृथा गेला कीं । संसार हांकणें - संसार चालविणें ; प्रपंच योग्य रीतीनें करणें . संसाराची मात्रा करणें - सर्व प्रपंचाचा नाश करणें ; बिघाड करणें ; सर्व आशांचा मोड करणें . सामाशब्द - 
  • ०ओझें न. प्रपंचाचा भार , जबाबदारी ; संसाराची काळजी . म्हणे संसारओझें माझें शिरीं । कैसी परी होईल । 
  • ०कष्ट पुअव . प्रपंचातील दुःखें , त्रास , मेहनत , जबाबदारी . 
  • ०चक्र न. प्रपंचाचा गाडा ; संसारयात्रा ; नेहमीं संसारांत येणारे निरनिराळे प्रसंग , अनुभव वगैरे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जुळी मुले झाली असतां शांति करावी काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site