मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
ऐक्केचाळिसावे व बेचाळिसावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - ऐक्केचाळिसावे व बेचाळिसावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१८८६-८७
जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते,
असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असत.
श्री गोंदवल्यास स्थिर राहू लागल्यावर पुष्कळ प्रपंची लोक आपली बायका माणसे घेऊन त्यांच्या दर्शनाला व गोंदवल्यास राहण्यासाठी येऊ लागले. पंढरपूरचा रस्ता गोंदवल्यावरून असल्याने अनेक साधू, संन्यासी, बैरागी लोक जाता - येता गोंदवल्यास मुक्काम करीत. भिक्षेची व पाण्याची सोय जेथे चांगली असेल तेथे हे लोक वस्तीला रहात. याशिवाय पंढरीला जाणारे पुष्कळ वारकरीसुद्धा गोंदवल्यास एक रात्र राहून पुढे जात. या सर्व लोकांचा परामर्श श्री घेत असत. हे लोक अर्थात गावच्या मारुतीमंदिरामध्येच उतरत. अगदी बालपणापासून श्रींची रामरायावर पराकोटीचा अनुराग होता. श्रीरामचंद्रांच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की, जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायांच्या इच्छेनेच घडत असते असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असत. "अमुक एक गोष्ट मी केली " या वाक्याने श्रींनी आपली जीभ कधी विटाळली नाही. कोणी काही विचारले असता "राम काय करील ते खरे" किंवा "रामाच्या इच्छेने जे घडेल ते खरे " हेच त्यांचे सुरुवातीचे आणि शेवटचे सांगणे असे. गोंदवल्यास श्रींच्या घरातील जागा अपुरी पडू लागली. शिवाय तेथे राहण्यासाठी येणार्‍या प्रापंचिक लोकांना उपासनेचे केंद्र आवश्यक होते, म्हणून आपल्या घराच्या समोरच्या भागामध्ये त्यांनी रामासाठी प्रशस्त राममंदिर बांधण्याचे ठरविले. मंदिराचा नकाशा श्रींनी स्वतःच तयार केला. प्रत्यक्ष काम करणार्‍या गवंडी, सुतारापासून तो दर्शनास येणार्‍या कोणाही सामान्य माणसापर्यंत प्रत्येकजण आपली अक्कल चालवून फरक सुचवीत असे. श्रीदेखील प्रत्येकाच्या सूचनेला मान डोलवीत. प्रत्यक्ष बांधण्याच्या वेळेस मात्र आपल्याला पाहिजे तसे करवून घेत. मंदिर बांधण्याच्या कामी श्रींनी गावातलेच गवंडी व सुतार यांना बोलावले. श्रींच्याजवळ साठलेले द्रव्य मुळीच नव्हते आणि त्यांनी कधीही कोणाजवळ पैशाची याचना केली नाही, परंतु रोज त्यांच्या दर्शनाला येणारे लोक आपण होऊन त्यांच्या समोर जे द्र्व्य ठेवीत त्याच्यावर सर्व व्यवहार चाले. एकदा असा प्रसंग आला. की, गुरुवारचा दिवस उजाडला. कामावरच्या माणसांना आठ दिवसांची मजुरी द्यावयाची होती. दगड, माती, चुना संपला होता आणि श्रींनी आदले दिवशी सर्व गावकर्‍यांना जेवण घातल्यामुळे त्यांच्यापाशी एकही पैसा खोलीसमोर जमा झाले. श्रींनी आपली कफनी झाडून दाखविली आणि म्हणाले, "अरे गोसाव्याजवळ पैसे कुठले आले ! मला कोणी देईल तेव्हा मी तुम्हाला देणार." तो बाजाराचा दिवस असल्याने मजुरांना, "आताची भाकरी मीच तुम्हाला देतो, ती खाऊन तुम्ही इथेच नामस्मरण करीत बसा. पाहू राम काय करतो ते." दुपारी ३॥ च्या सुमारास म्हसवडचे बापूसाहेब माने श्रींच्या दर्शनाला आले. ऊस विकून झालेला फायदा श्रींना अर्पण करायचे ठरवून रु. १०१ श्रींच्या पुढे ठेवून प्रसाद घेऊन निघून गेले. ते गेल्यावर श्रींनी मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली व दगड, माती, चुना आणण्यासाठी मुकादमाजवळ पैसे दिले. श्री म्हणाले, "रामरायाने आपली लाजराखली."

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP