ध्यानदीप - श्लोक ४१ ते ६०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


भूत प्रतिबंधाचें उदाहरण तेथें असेंदिलें आहे कीं कोनी एक मनुष्याची आपल्या म्हैशीवर फार प्रीति होती. पुढें त्याने संन्यास घेतला. वेदांत श्रवणाचे वेळीं ती म्हैस वरचेवर त्यांचे डोळ्यापुढें उभी राहत असे त्यामुळें तत्त्वविचारास अडथळा येऊन त्याची समजुत चांगली पडेना ॥४१॥

म्हनुन गुरुंनीं त्याच्या त्या म्हैशीवरील प्रीतीलाच अनुसरुन त्या म्हैशीमध्यें व्यापुन असणारेंच तुं ब्रह्मा आहेस असा उपदेश केल्यानें त्यास तो उपदेश चांगला ठसला. ही गोष्ट लोकांत प्रसिद्ध आहे. ॥४२॥

आतां वर्तमान प्रतिबंध विषयासक्ति बुद्धिमांद्या, श्रुतिविरुद्ध कुतर्क आणि विपरीत भार्वन विषयीं दुराग्रह हीं वर्तमान प्रतिबंधाची उदाहरणें समजावीं ॥४३॥

शि०ह्म वर्त मान प्रतिबंधाने निवारण्याचे उपाय कोणते ? गुरु त्यास उपाय दुसरे नाहीत. शमदमादिक साधनंचा अभ्यास आणि श्रवण मनन निदिधयसन यांची योजना यथायोग्य रीतीनें केली असतां त्या प्रतिबंधाचा क्षय होऊन ब्रह्माप्राप्ति होते ॥४४॥

शिष्य आतां भावी प्रतिबंधाची एक उदाहरण द्यावें गुरु वामदेव आणि भरत यांची कथा तू एकिलीच असशील पहिल्याला साक्षात्कार होण्यास एक जन्म घ्यावा लागला आणि दुसर्‍यास तीन जन्म घ्यावे लागले. यांचे कारण असें कीं, हा भावि प्रतिबंध जन्मातंर दिल्यावाचुन राहत नाहीं. कारण तो प्रारब्धशेष आहे त्या अर्थी तें भोगालेंच पाहिजे ॥४५॥

शि०- असें आणखी कोणच्या तरी प्रसिद्ध ग्रंथांत सांगितलें आहे काय ? गुरु- असें गीतेंतच सांगितलें आहे गीतेंत योगभ्रष्टास मुक्त होण्यास पुढील जन्म घ्यावे लागता असें जें सांगितलें तो भावी प्रतिबंधच समजला पाहिजे ॥४६॥

शि०- मग एकुन या जन्मीं केलेला विचार निष्फलच ह्माणा. गुरु -छी ! विचार केलेला कधीं फुकट जाईल काय ? ह्माचा विचार या गीतेंतील श्लोकांवरुन तुला चांगला समजेल "प्राप्य पुण्यकृतां लोकान " या श्लोकापासुन " ततो याति परां गतिम " या श्लोकांन्तापर्यंत तुला त्याचा अभिप्रायच सांगतो ह्मणजे झालें. योगभ्रष्ट पुरुष आत्मतत्त्व विचाराचे बुळानें पुण्य लोकांस जाऊन तेथें यावद्गोग सुख अनुभवुन पुनः या लोकीं शुचि र्भुत व तेजस्वी आई बापांच्या पोटी जन्मास येतो किंवा ब्रह्मातत्त्व विचारानें स्वतः विरक्त होऊन योग्याच्या घरींच जन्म घेतो. हें जन्म फार दुर्लभ आहे कारण, तेथें पुर्वदेही संबंधी जो बुद्धिस योगाचा संस्कार असतो तो जशाचा तैसाच उठुन तो पुढें तसाच प्रयत्न करीत जातो. याचें कारण असें कीं तो योगभ्रष्ट पुर्व संस्काराच्या स्वाधीन होऊन शेवटीं ब्रह्माप्राप्ति होईपर्यंत तसाच बोलतो ॥४७-४८-४९-५०॥

आणखी एक दांडगा प्रतिबंध आहे तो तुला सांगतों योग करतां करतां ब्रह्मलोकप्रीप्तीची इच्छा झाली म्हणजे तत्त्वविचार किती ही केला तरी त्यास साक्षात्कार होत नाही. ॥५१॥

शि०- मग त्याला साक्षात्कारची मुळींच अशा नाहीं कीं काय ? गु०- त्याला साक्षात्कार मुळींच होत नाहीं असं नाहीं तरी तेवढ्या इच्छेमुळें मोठ्या गोत्यांत पडला कारण वेदांत विज्ञान सृनिश्चितार्था या श्रुतीप्रमाणें त्यास ब्रह्मालोकप्राप्ति झाल्यानंतर कल्पांती ब्रह्मादेवाबरोबरच मुक्ति व्हावयाची ॥५२॥

परंतु हे जें तीन प्रतिबंध सांगितलें ते तत्त्वविचारास आड येणारे आहेत. पण हा तत्त्वविचाराही कित्येकांना प्रारब्धवशात करितां येत नाहीं. यास 'श्रवाणायापिबहुभि; य श्रुतीचें प्रमाण आहे ॥५३॥

शि०- मग अशा पुरुषांस मुक्ति कशी मिळाली ? गु०- म्हणुनच आज तुला ब्रह्माची उपासना सांगत आहों. ज्याची बुद्धि अत्यंत मंद असल्यामुळे किंवा गुरुशास्त्रादिक सामग्री अनुकुल नसल्यामुळे ज्यास तत्त्वविचार करणें मुष्कील आहे त्यांनें अहोरात्र ब्रह्माची उपासना करावी. ॥५४॥

शि०- होय पण निर्गुण ब्रह्माची उपासना कशी करावी ? गु०- जशी सगुणाची करावी तशीच निर्गुणाची करावी उपासना म्हनजे प्रत्ययाची आवृत्ति ती जशी सगुण्वर चालते तशी निर्गुणाविषयींही होतें ॥५५॥

शि०- होय पर्ण वाणी आणि मनाला अगम्य अशा ब्रह्माची उपासना कशी करावी? गु०- असं ब्रह्मा जाणावें तरी कसं तें सांग ॥५६॥

शि०- जाणण्यास कोणती जड आहे तें वार्नास व मनास अगोचर आहे असे समजणें हेंच त्याला जाणणें गु०- अशा प्रकारचें ब्रह्मा आहे असें समजण्यास जसें येतें तशीच त्यांची उपासनाही करण्यास कोणची नड आहे ? ॥५७॥

शि०- ब्रह्मा जर उपासनेस विषय होईल तर त्याला सगुणत्व येतें तसं ज्ञानास विषय झाल्यानेंहीं सगुणत्व येईल शि०- लक्षणा वृत्ति ह्मणोनें जी वाक्यार्थं करण्याची रीत आहे. तिला अनुसरुन जाणल्यास त्यास सगुणत्व येत नाही. गु०-मग तशा लक्षणानें लक्षित जें ब्रह्मा त्याची उपासना केली असतांही सगुणत्व येत नाही. ॥५८॥

शि०- तर मग " तदेवं ब्रह्मा त्वं विद्धि नेदं नेदं यदिदं उपासते " या श्रुतीनें उपासानेचा निषेध कां केला ? गु०- अरे उपासनेचा जसा श्रुतीनें निषेध केला आहे, तसा श्रुति , तसा ज्ञानाचाही निषेध शरुतीनें केला आहे ॥५९॥

"अन्यदेव तद्विदितादथेविदितादधीति ही श्रुति तुला माहीत आहेच शि०- त्या श्रुतींत जाणलेलेंही नव्हे आणि न जाणले लेंही श्रुति तुला माहीत आहेच शि०- त्या श्रुतींत जाणलेलेंही नव्हे आणि न जाणलें लेंहीं नव्हे असं ब्रह्मा सांगितलें तसेंच तें जाणलें म्हणजे झालें गु०- मग उपासनाही तशीच करावी. ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP