ध्यानदीप - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


गुरु.- एथपर्यंत मागील सर्व प्रकरणांत ज्ञान म्हणजे काय तें महा वाक्यापासुन कसें प्राप्त होतें व त्यापासुन मुक्तीची सिद्धि कशी होते, याजविषयीं बरेंच प्रतिपादन केलें, आतां या प्रकरणीं मुमुक्षुस बुद्धिमाद्यांदि प्रतिबंधामुळे ज्ञान न झाल्यास त्याणें तें होण्याविषयीं कोणतें साधन करावें हें आह्मीं सांगणार. ते साधन खाली लिहिलेल्या गुरुशिष्यांचा संवादवरुन लक्ष्यांत येईल

शिष्य०- तें कृपा करुन सांगाल तर मी फार आभारी होईन.

गु०- ह्माणतात.ज्याप्रमाणें संवादि भ्रमानेंच प्रवृत्त भ्रमानेंच प्रवृत्त झालेल्या पुरुषास इष्टर्थलाभ होतो त्याप्रमाणें तत्वाची उपासना केली असतां जीवांस ज्ञान होऊन मोक्षप्राप्ति होते शि०- असं कोठें सांगितलें आहे. १ गु- उत्तर तापनीय उपनिषदामध्यें उपासना अनेक प्रकारच्या सांगितल्या आहेत. शि०- संवादिभ्रम म्हणजे काय ? हें मला कृपा करुन सांगा गु०- त्याचें लक्षण आचर्यानें वार्तिकांत चांगलें सांगितलें आहे तेंच मी सांगा. गु त्याचें लक्षण आचार्याचें वार्तिकांत चांगलें सांगितलें आहे तेंचे मी तुला सांगतो. कल्पना कर कीं, एक दीपाची प्रभा आणि एक मण्याची प्रभा अशा दोनप्रभा दुर पडलेल्या पाहुन दोन पुरुषा ते मणीच आहेत असें समजुन ध्यावयास गेले इथें दोघांनाहीं मिथ्याज्ञान सारखेंच आहे तथापि मणि असं समजुन मन्याकडे धांवणार्‍या पुरुषांस मात्र मणी मिळतो व दुसर्‍यास मिळत नाहीं. म्हणुन दोघांच्या फलप्राप्तीमध्यें अंतर पडतें ॥२॥

शि० हें आम्हांला स्पष्ट करुन सांगा गु०- एका मंदिराच्या एका खिडकींत दिवा असुन त्याची प्रभा बाहेर पडली आहे तसेंच दुसर्‍या खिडकींत मणी असुन त्याचीही प्रभा बाहेर पडली आहे ॥३॥

ह्मा दोन्हींही प्रभा दुरुन दोघां पुरुषांनी पाहिल्य आणी ते दोन्हीं मणीच आहेत असें समजुन दोघें दोह दोहोंकडें धांवलें तर तेथें दोघांसही जाहलेली जी मण्याची कल्पन ती मिथ्याज्ञानच आहे. परंतु दीपप्रभेकडे ॥४॥

धांवणार्‍या पुरुषतास मणि मिळत नाही. आणि मणी प्रभेकडे धांवणाराला तो मिळतो एवढेंच काय तें अंतर ॥५॥

एथें दीपप्रभेवर जी मण्याची कल्पना झाली त्यास विसंवादि भ्रम ह्मणतात आणि मणीप्रभेवर जी मण्याची कल्पना ती संवादभ्रम होय ॥६॥

हें प्रत्यक्ष ज्ञानाचें उदारहण झालें आतां अनुमान आणी आगम ह्मा दोन्हीं प्रमाणांविषयींची उदाहरणें ऐक. दुर वाफ उठलेलीं पाहुन तो घुर असें समजुन तेथें अग्नि शोधायाला गेलेल्या मनुष्यास दैवशात अग्निमिळाला तर तो संवादिभ्रमच ॥७॥

तसेंच गोदावरीचें पाणी गुंगोदक असें समजुन आपली शुद्धि व्हावी असें समजुन त्याच्या संप्रोक्षणानें शुद्धि पावतो ॥८॥

आणि संनिपातज्वर झालेला मनुष्य भ्रांतीनें नारायणाचें स्मरण करुन मरण पावला असतां स्वर्गीस जातो. हाही संवादिभ्रमच आहे ॥९॥

याप्रमाणें प्रत्यक्ष अनुमान आणि आगम विषयां संवादि भ्रमाची उदाहरणें कोट्यावधी आहेत ॥१०॥

हा संवादिभ्रम सर्व उपासनेस लागु आहे येरव्ही मृत्तिका काष्ठ पाषाण या देवता कशा होतील व स्त्रियादिकांची अग्र्नित्व बुद्धीनें उपासना कशी घडेल ? ॥११॥

या संवादिभ्रमाचें थोडक्यांत लक्षण सांगतों विषरीत ज्ञानापासुन काकतालीय न्यायानें जो ईप्सित फलप्राप्ति होते त्यास संवादिभ्रम असें म्हणतात ॥१२॥

शि०- हें संवादिभ्रमाचें लक्षण समजलें. पण हें मोक्षप्राप्तीस कसं साधन होतें ? गुरु०- हा जो वर संपादोभ्रम सागितला तो जरी स्वतः भ्रम आहे तरी त्यापासुन इष्टफलसिद्धि होते. याप्रमाणें ब्रह्मातत्वाची उपासनाही मोक्षरुप फल देते ॥१३॥

शि०- आपण म्हणतां कीं ब्रह्मात्त्वांची उपासन करावी. ती काय ब्रह्मा जाणून करावी की न जाणुन करावी ? जाणुन जर म्हणाल तर ज्ञान झाल्यवर उपासनेची ग्रज नाहीं. न जाणुना जर म्हणाल तर उपासना कशी होईल ? गु०- ब्रह्मांअचे जरी प्रत्यक्ष ज्ञान नाहीं तरी गुरुमुखापासुन ब्रह्मा अखंडैकरसात्मक आहे अव तें तुं आहेस आसा उपदेश श्रवण करुन उप्तन्न होणार्‍या परीक्ष ज्ञानानें ब्र्ह्माहमस्त्मि अशीउपासना करित येते. ॥१४॥

शि०- ज्या ब्रह्मातत्वाची उपासना करावयाची तद्विषयक जें परिक्ष ज्ञान त्यांचें स्वरुप मला सांगा. गु०- विष्णु आदिमुर्तीचें प्रतिपादन ज्या शास्त्रांत केलें आहे त्यापासुन उप्तन्न झालेल्या ज्ञानापासुन या उपासनेंतही प्रत्यग्व्यक्तीचा जरी उल्लेख नाहीं तरी केवळ ब्रह्मा आहे असें जें सामान्य ज्ञाना तेंच येथें परोक्ष ज्ञान समजावें ॥१५॥

शि०- तुम्हीं जो विष्णुमृर्तीचा दृष्टांत दिलास तें परिक्ष ज्ञान कसें होतें ? गु०- शास्त्रावरुन विष्णूच्या मुर्तीचें चतुर्भुजत्वादिरुप प्रत्यक्ष नेत्रांस दिसत. नाहीं. तेव्हा तें परिक्ष ज्ञानच ह्मटलें पाहिजे ॥१६॥

शि०- तर मग तें विष्णुमूर्तीचें ज्ञान भ्रांति कशावरुन नव्हें ? कारण तें प्रत्यक्ष झालें नाही. गु०- केवळ तें परीक्ष आहे एवढ्यात दोषामुळे तें भ्रांतिज्ञान होत नाहीं. भ्रातिज्ञानास विषयांची असत्यता पाहिजे पण येथें तर ज्यावर आम्हीं पुर्ण विश्वास ठेवितों अशा शास्त्रानें ती मुर्ति प्रत्यक्ष पाहुन आह्मास तसें वर्णन दिले तेव्हा ते भ्रांति म्हणतां येत नाहीं ॥१७॥

एथेंही शास्त्रावरुन सच्चिदानंदरुप ब्रह्माचे भन होऊनही प्रत्यक साक्षींचेंप्रत्यक्ष ज्ञान नसल्यामुळें तें ब्रह्मा प्रत्यक्ष होत नाहीं ॥१८॥

परंतु शास्त्रंच्या सांगण्यावरुन सच्चिदानंदरुपाचा निश्चय झाल्यामुळें तें परिक्षा ज्ञान तत्त्वज्ञानचें समजलें पाहिजे. तो भ्रम नव्हे ॥१९॥

शि०- "सत्वं ज्ञानमंनंतं ब्रह्मा" इत्यादि वाक्यांपासुन झालेलें ज्ञान परोक्ष होतें तसें महावाक्यापासुन अपरोक्षही होतें मग तुमची उपासना कशाला पाहिजे ? ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP