ध्यानदीप - श्लोक १२१ ते १४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


एकापेक्षां गुणोपासना बरी, एक श्रेष्ठ आहेच आहे. अडाण्याच्या व्यवहारापेक्षा कर्मानुष्ठान बरें त्याहीपेक्षा सगुणोपसाना बरी, त्याहीपेक्षा, निर्गुण उपासना श्रेष्ठ ॥१२१॥

याप्रमाणे ब्रह्मासाक्षात्कारापर्यंत एकावर एक अशा ह्मा पायर्‍या आहेत. तुझी निर्गुण उपासना चांगली दृढ झाली म्हणजे त्यापसुन ब्रह्मज्ञान होतें ॥१२२॥

ज्याप्रमाणें संवादि भ्रमापासुन फलकाल आला असतां फलप्राप्ति होतो त्याप्रमाणें निर्गुण उपासना पक्क होऊन मोक्ष प्राप्तेची वेळ आली म्हणजें ब्रह्मासाक्षात्कार होतो ॥१२३॥

शि०- संवादिभ्रमानें प्रवत्त झलेल्या पुरुषाला इंद्रियार्थसंनिकर्षापासुन पुढें ज्ञान होतें पण तो भ्रमच ज्ञान होऊं शकत नाही. गु०- उपासनेची ही गोष्ट तशीच आहे ती तरी स्वतः ज्ञान कोठें आहे ? महावाक्यापासुन होणार्‍या अपरोक्ष ज्ञानाला ती कारण आहे. ॥१२४॥

शि०- निर्गुण उपासना जशी अपरोक्ष ज्ञानास कारण आहे. तशी मूर्तिध्यानमंत्रादिही ज्ञानास कारण आहेत. मग उपासनेची एवढी प्रतिष्ठा कशाला ? गु०- होय तूं ह्मणतोस तें खरें अहे. पण दोहोंमध्यें भेद इतकाच कीं निर्गुण उपासना ज्ञानास अगदी जवळची पायरी आहे. बाकीचीं मंत्रादिसाधनें दुरच्या पायर्‍या आहेत. ॥१२५॥

शि०- जवळची पायरी ह्मटलें त्याचा अर्थ काय ? गु०- त्याचा अर्थ हाच कीं निर्गुण उपासना पक्क झाली म्हणजे हळुहळू सविकल्प समाधि तो पक्क झाला म्हणजे अनायसानें निर्विकल्प समाधि हळुहळु सविकल्प समाधि साधतो. तो पक्क झाला म्हणजे अनायासानें निर्विकल्प समाधि होतो ॥१२६॥

तो झाल्यानंतर असंग जी आत्मवस्तु तीच तो पुरुष होतो. ही भुमि पुनः चांगली दृढ झाल्यावर त्यास महावाक्यापासुन तत्त्वज्ञान होते ॥१२७॥

तसें झाल्यानंतर मी निर्विकारी असंग नित्य स्वप्रकाश आणि परिपुर्ण आहे अशी जीं शस्त्रोक्त ब्रह्माची लक्षणें तीं त्याच्या बुद्धिंत लवकरच ठसतात ॥१२८॥

याकरितांच अमृतबिद्धिदी उपनिषदांत योगाभ्यास सांगितला आहे. याप्रमाणें निर्विकल्प समाधिरुप दृष्टफल प्राप्तीच्या संबंधानेंही इतर साधनापेक्षां निर्गुण उपासना श्रेष्ठ आहे ॥१२९॥

एवढें निर्गुण उपासनेंचे फल असुन तिचीउपेक्षा करुन जे तीर्थयात्रा जपादिक कर्में करितात त्यांना " पिंड समुत्सृज्य करं लेढि " ( हातांतील लाडु टाकुन हात चाटीत बसणें ) ही ह्मण लागु पडते. ॥१३०॥

शि०- विचार सोडुन जे लोक उपासना करितात त्यासि देस देखील ही ह्मण लागु पडत नाहीं काय ? गु०- नाहीं कोण ह्मणतो त्यासही ती तशीच लागुं पडते जशी तईर्थयात्रेपेक्षा उपासना श्रेष्ठ तसा उपासनपेक्षां विचार श्रेष्ठ परंतु आह्मी जो योग ( उपासना ) सांगितला. तो विचारक्षम पुरुषास नव्हे ज्यांस विचार नाहीं त्यास तो सांगितला ॥१३१॥

शि०- क्रित्येकांस विचार कां होत नाहीं. ? गु०- त्याचें चित्त कामक्रोधादिकांनी गांजलें गेलें आहे त्यांस विचार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळे तत्त्वज्ञान होत नही. म्हणुन त्यास योगच मुख्य आहे. तेणेंकरुन बुद्धिजाडय नाहींसें होतें ॥१३२॥

आणि ज्यांच्या चित्तांत कामक्रोधादिक नसल्यामुळें आयतें वैराग्य असुन केवळ आत्म्याविषयीं अज्ञान मात्र आहे त्यांना सांख्यं नामक विचार मुख्य सांगितला त्यापासुनच त्यांना लवकर मिळते ॥१३३॥

यास गीतावाक्य प्रमाण "यत्संख्यैः प्राप्यते स्थानं " या श्लोकाचा अभिप्राय असा आहे कीं जें फल सांख्य पासुन मिळतें तेंच योगापासुन मिळतें ते दोन्हींही फलत्वेकरुन एकच आहेत. असें ज्याला समजते. त्यासच शास्त्रसिद्धांत समजला ॥१३४॥

श्रुतीचेंही तसेंच प्रमाण आहे " तस्कारण सांख्ययोगाधिगम्यं " या श्रुतीचा अर्थ तें जगत्कारण ब्रह्मा सांख्य किंवा योगापासुन समजतें. शि०- योग आणी सांख्य हे दोनही मुक्तीस जर साधन आहेत तर त्या शास्त्रांत सांगितलेलें सर्वच प्रमाण म्हणुन समजलें पाहिजे. गु०- तसें नव्हे त्यांत श्रुतिविरुद्ध जे विचार ते अभास ह्मानून गाळावे ॥१३५॥

शि०- उपासना करणाराला ज्ञान न होतां मरण आलें तर मोक्षसिद्धि कशी होते ? गु०- ज्याची उपासना या जन्मीं पक्क झाली नाहीं त्याला अंतकालीं किंवा ब्रह्मालोकीं तत्वज्ञान होऊन मुक्ति मिळते ॥१३६॥

मरणकालीं जी मुक्ति होते त्यास प्रमाण जो जो भाव स्मरुन प्राणी देह सोडितो, तो तो भाव त्याला प्राप्त होतो असें गीतेंत सांगितलें आहे यच्चित अस्तेन याति असेंही शास्त्र आहे. ॥१३७॥

शि०- तुह्मी ह्मणतां कीं निर्गुण उपासना पक्क झाली तर त्यास मरणकाळीं मुक्ति होते पण त्याविषयीं जी प्रमाणें दिलींत त्यापासुन पुनर्जन्म होतो असें सिद्ध होतें तर त्या विरोधाचा परिहार कसा ? गु०- तें खरें आहे पण सगुणोपसानेनें अन्तकाळींअ जसा सगुणासाक्षात्कार होतो तसा निर्गुणोपासनेंनेंही निर्गुणासाक्शात्कार जाहलाच पाहिजे जसा सगुणासाक्षात्कार होतो तसा निर्गुणोपासनेनेंही निर्गुणसाक्षात्कार जाहलाच पाहिजे ॥१३८॥

शि०- तर त्याला निर्गुणारुपाची प्राप्ति होईल. मुक्ति कशी मिळेल गु०- अरें निर्गुणरुपाची प्राप्ति आणि मुक्ति यांत नाममांत्रांचा भेद आहे. परंतु दोन्हींचा अर्थ एकच आहे. मुक्ति ह्मणजे स्वरुपावास्थिती ती एथें प्राप्त होतेंच ज्याप्रमाणें संवादि भ्रमाला भ्रम हें नाममात्र आहे. ॥१३९॥

शि०- निर्गुण उपासना ही मानसिक क्रिया आहे तेव्हा ती मुक्तीला साधन कशी होईल ? गु०- तो जरी साक्षात साधन होत नाही. तरी मुळ अविद्येस भस्म करुन टाकणारे ज्ञान तिजपासुन उप्तन्न होतें. यास दुसरा दृष्टांत नको . सगुण उपासनेनें जशी तारक ब्रह्मा बुद्धि होते तसेंच निर्गुण उपासनेंनें ब्रह्माज्ञान होतें ॥१४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP